Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वाची लढाई; निम्मे आमदार सुनेत्रा पवारांच्या बाजूने

प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांची नावे न घेता रोहित यांनी हे सर्व नेते सुनेत्रांच्या पक्षावर ताबा मिळवू पाहत असल्याचा आरोप केला. यापैकी एका नेत्याला केंद्रात मंत्री, तर दुसऱ्याला महायुती सरकारमध्ये अर्थमंत्री होण्याची इच्छा आहे, असे ते म्हणाले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 04, 2026 | 12:04 PM
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वाची लढाई; निम्मे आमदार सुनेत्रा पवारांच्या बाजूने

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वाची लढाई; निम्मे आमदार सुनेत्रा पवारांच्या बाजूने

Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेदांची चर्चा
  • सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावरून पक्षात खलबत
  • जवळपास निम्म्या आमदारांचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा असल्याची चर्चा
  • ज्येष्ठ नेत्यांची नाराजी दूर करण्याचे आव्हान
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार गटात नेतृत्वावरून आणि पक्षाच्या भवितव्यावरून अंतर्गत संघर्ष तीव्र झाला आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर ज्येष्ठ नेत्यांची नाराजी दूर करण्यासोबतच संघटनेवरील नियंत्रण कायम ठेवण्याचे आव्हान उभे राहिले आहे. पक्षातील अंतर्गत मतभेदांदरम्यान जवळपास निम्म्या आमदारांचा पाठिंबा सुनेत्रा पवार यांना असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नेतृत्वबदल पक्षातील आणि वर्चस्वाच्या लढाईबाबतच्या चर्चाना नवे वळण मिळाले आहे.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आणि दिलीप वळसे-पाटील यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीवेळी सुनेत्रा पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार अनुपस्थित असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले. सूत्रांच्या माहितीनुसार, ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाचे सध्याचे कामकाज, नेतृत्वशैली आणि संघटनात्मक व्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली.

राष्ट्रवादीवर ताबा मिळवण्याचा पटेल, मुंडे, तटकरेंचा प्रयत्न

प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांची नावे न घेता रोहित यांनी हे सर्व नेते सुनेत्रांच्या पक्षावर ताबा मिळवू पाहत असल्याचा आरोप केला. यापैकी एका नेत्याला केंद्रात मंत्री, तर दुसऱ्याला महायुती सरकारमध्ये अर्थमंत्री होण्याची इच्छा आहे, असे ते म्हणाले. सुनेत्रा यांना सामाजिक क्षेत्राचा अनुभव असला, तरी राजकारणातील मर्यादित अनुभवाचा फायदा पक्षातील अन्य नेते घेत आहेत. त्यामुळे त्यांना बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावाही रोहित यांनी केला.

अजितदादांप्रमाणे सुनेत्राताईंचीही कोंडी करण्याचा प्रयत्न

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पक्षातील नेत्यांमधील अंतर्गत मतभेदांवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप केले आहेत. आधी ज्या नेत्यांनी अजित पवार यांना त्रास दिला, तेच नेते आता सुनेत्रा आणि पार्थ यांच्याविरोधात कट रचत असल्याचा दावा त्यांनी केला. या नेत्यांनी पुन्हा एकदा आपला रंग दाखवत पक्षात सुनेत्रा आणि पार्थ यांना बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे रोहित पवार म्हणाले.

शरद पवारांनी संधी दिली अन् मोठं केलं

दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतलेल्या सर्व नेत्यांना शरद पवार यांनी संधी दिली आणि मोठे केले. मात्र, नंतर याच नेत्यांनी पवारांचा विश्वासघात केला. त्यानंतर अजित यांनी या नेत्यांसोबत मिळून नवा पक्ष स्थापन केला. मात्र, छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांच्याव्यतिरिक्त अन्य नेत्यांनी अजित पवार यांना त्रास दिला, असा दावा रोहित पवार यांनी केला. ही बाब स्वतः अजित पवार यांनी आपल्याला सांगितल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

FAQ

1. राष्ट्रवादी काँग्रेसमधील सध्याचा वाद कशावरून आहे?
पक्षाच्या नेतृत्वावर, संघटनात्मक नियंत्रणावर आणि पक्षाच्या भवितव्यावरून अंतर्गत मतभेद वाढल्याची चर्चा आहे.

2. सुनेत्रा पवार यांना किती आमदारांचा पाठिंबा असल्याची चर्चा आहे?
पक्षातील जवळपास निम्म्या आमदारांचा पाठिंबा सुनेत्रा पवार यांना असल्याची चर्चा आहे.

3. सुनेत्रा पवार यांच्यासमोर कोणते आव्हान आहे?
ज्येष्ठ नेत्यांची नाराजी दूर करण्यासोबतच पक्षाच्या संघटनेवरील नियंत्रण कायम ठेवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: Battle for supremacy within ajit pawar nationalist congress party nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 12:04 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.