Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वेळ पडल्यास मीदेखील उमेदवारीवर पाणी सोडेन; असं का म्हणाले प्रदेशाध्यक्ष बावनकुळे?

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. राज्यामध्ये आचारसंहिता लागू झाली असून पक्षातील अंतर्गत हालचाली वाढल्या आहेत. यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वक्तव्य केले आहे. त्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 16, 2024 | 10:46 AM
BJP state president Chandrashekhar Bawankule on vidhansabha elections

BJP state president Chandrashekhar Bawankule on vidhansabha elections

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : केंद्रीय  निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर केली आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल हाती येणार आहे. त्यामुळे राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून पक्षांची देखील जोरदार तयारी सुरु आहे. अद्याप पक्षांचे जागावाटप आणि युतींमधील फॉर्म्युला समोर आलेला नाही. त्यापूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य चर्चेत आले आहे. विधानसभा निवडणूकीमध्ये वेळप्रसंगी उमेदवारीवर पाणी सोडण्यास तयार असल्याची भूमिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली आहे. तसेच मी या निवडणुकीत स्वतःसाठी उमेदवारी मागितलेली नाही उमेदवारी मागणारही नाही, असे बावनकुळे म्हणाले आहेत. त्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.

काय म्हणाले बावनकुळे?

15 वर्षे या मतदारसंघाचा आमदार होतो. पाच वर्षांपूर्वी मी निवडणूक लढवणार होतो. मात्र, तेव्हा पक्षाने सांगितले की पक्षाचे काम करा. आताही पक्ष अध्यक्ष म्हणून मी पक्षाचे काम करत आहे. केंद्रीय निवडणूक समिती काय निर्णय करेल, मला माहिती नाही. मात्र, कामठी विधानसभा मतदारसंघात कोणत्याही उमेदवार दिला तरी त्याला निवडून आणण्याची जबाबदारी बजावेल. मी या निवडणुकीत स्वतःसाठी उमेदवारी मागितलेली नाही उमेदवारी मागणारही नाही. वेळ पडल्यास पक्षासाठी त्याग करण्याची आपली तयारी असल्याचेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

काही जागांची अदलाबदल होऊ शकते

पुढे ते म्हणाले, जागावाटपासाठी सीटिंग गेटिंग हे सूत्र जवळपास निश्चित आहे. मात्र, काही मतदारसंघांमध्ये अदलाबदल होऊ शकते. (मुख्यत्वे अजितदादा यांच्यासोबत) त्यांचा मागच्या 2019 च्या निवडणूकीमध्ये अनेक ठिकाणी आमच्या विरोधात लढला होता. अनेक मतदारसंघ जिथे दोन्ही पक्ष (भाजप आणि राष्ट्रवादी) तुल्यबळ आहे, तिथे जो पक्ष मजबूत असेल, त्याप्रमाणे काही जागांची अदलाबदल होऊ शकते. सध्या शिंदे गटाकडील आमदारांच्या मतदारसंघाबद्दल आम्ही चर्चा करत नाही. अजितदादांकडे असलेल्या आमदारांच्या मतदारसंघबद्दलही आम्ही चर्चा करत नाही. मात्र, तिन्ही पक्षाचे आमदार असलेल्या मतदारसंघांना वगळून उरलेल्या मतदारसंघावर तिन्ही पक्ष चाचपणी केली जात आहे. जो त्यामध्ये पुढे दिसेल त्या पक्षाला त्या मतदारसंघात उमेदवारी मिळेल, असे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

Web Title: Bjp state president chandrashekhar bawankule did not demand the constituency in the assembly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2024 | 10:46 AM

Topics:  

  • Chandrasekhar Bawankule

संबंधित बातम्या

Buldhana :चिखलीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन
1

Buldhana :चिखलीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन

Chandrashekhar Bawankule : महसुली सप्ताहाचा शुभारंभ, 13 हजार प्रकरणे निपटवण्याचा संकल्प
2

Chandrashekhar Bawankule : महसुली सप्ताहाचा शुभारंभ, 13 हजार प्रकरणे निपटवण्याचा संकल्प

आता गावात बिबट्या शिरताच वाजणार अलार्म; चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली खास टेक्नॉलॉजीची माहिती
3

आता गावात बिबट्या शिरताच वाजणार अलार्म; चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली खास टेक्नॉलॉजीची माहिती

Nagpur : उद्धव ठाकरेंच संपुर्ण सरकार घोटाळेबाज होतं; चंद्रशेखर बावनकुळे यांची सणसणीत टीका
4

Nagpur : उद्धव ठाकरेंच संपुर्ण सरकार घोटाळेबाज होतं; चंद्रशेखर बावनकुळे यांची सणसणीत टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.