Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delimitation Bill Parliament: लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी केंद्र सरकारच्या हालचाली सुरू

Delimitation Bill संसदेचे पावसाळी अधिवेशन १३ ऑगस्ट रोजी तहकूब झाले असले, तरी त्याचे औपचारिक सत्रावसान झालेले नाही. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 13, 2026 | 06:15 PM
Delimitation Bill, Indian Parliament, Narendra Modi, LokSabha, Special Session

Delimitation Bill, Indian Parliament, Narendra Modi, LokSabha, Special Session

Follow Us
Follow Us:
  • परिसीमन विधेयक पुन्हा मांडण्याच्या हालचाली
  • विशेष अधिवेशनाची शक्यता
  • दोन तृतीयांश बहुमताच्या जवळ सरकार पोहोचल्याचा दावा
Delimitation Bill Parliament: लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेचे अर्थात परिसीमनाचे (डिलिमिटेशन) विधेयक पुन्हा संसदेत मांडण्यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. या विधेयकाला मंजुरी मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या दोन तृतीयांश बहुमताच्या जवळ सरकार पोहोचल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

एप्रिल २०२६ मध्ये केंद्र सरकारने परिसीमन आणि महिला आरक्षणाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयके संसदेत मांडली होती. मात्र, लोकसभेत आवश्यक दोन तृतीयांश बहुमत न मिळाल्याने ही विधेयके मंजूर होऊ शकली नाहीत. मतदानावेळी विधेयकाच्या बाजूने २९८, तर विरोधात २३० मते पडली होती. मंजुरीसाठी ३५२ मतांची आवश्यकता असल्याने सरकारला माघार घ्यावी लागली होती. त्यामुळे मोदी सरकारसाठी हा राजकीय धक्का मानला गेला होता.

Rahul Gandhi Phone Tapping Allegation: माझा फोन टॅपिंग केला जातोय, त्याचे सर्व पुरावे माझ्याकडे..; राहुल गांधींचा

विशेष अधिवेशनाबाबत चर्चा

संसदेचे पावसाळी अधिवेशन १३ ऑगस्ट रोजी तहकूब झाले असले, तरी त्याचे औपचारिक सत्रावसान झालेले नाही. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. परिसीमन विधेयक मंजूर करण्यासाठी सरकार बहुमताची जुळवाजुळव करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, विशेष अधिवेशनाबाबत केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

लोकसभेच्या जागा ८५० पर्यंत वाढणार?

प्रस्तावित परिसीमनामुळे लोकसभेतील जागांची संख्या ५४३ वरून कमाल ८५० पर्यंत वाढवण्याची चर्चा आहे. महिला आरक्षणाच्या ३३ टक्के अंमलबजावणीशीही या प्रक्रियेचा संबंध आहे. मात्र, लोकसंख्येच्या आधारावर जागांचे पुनर्वाटप झाल्यास दक्षिण भारतातील राज्यांचे राजकीय प्रतिनिधित्व तुलनेने कमी होण्याची भीती विरोधकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे विशेष अधिवेशन बोलावण्याचा निर्णय, दोन्ही सभागृहांतील संख्याबळ आणि विरोधकांची भूमिका या मुद्द्यांवर पुढील राजकीय घडामोडी अवलंबून असतील. एप्रिलमध्ये अडलेले विधेयक पुन्हा मंजूर करून घेण्याचे आव्हान मोदी सरकारसमोर आहे.

Devendra Fadnavis ambitions for PM Post: दिल्लीच्या तख्ताकडे देवेंद्र फडणवीसांची नजर…! बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

एनडीएचे संख्याबळ वाढल्याचा दावा

दरम्यान, बदललेल्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) संख्याबळ वाढल्याचे वृत्त आहे. १० नोव्हेंबरच्या वृत्तानुसार, लोकसभेत एनडीएकडे ३१९, तर राज्यसभेत १५३ सदस्य आहेत. त्यामुळे दोन्ही सभागृहांमध्ये आवश्यक विशेष बहुमत मिळवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जाते. घटनादुरुस्ती विधेयक मंजूर होण्यासाठी प्रत्येक सभागृहात उपस्थित राहून मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी दोन तृतीयांश मते आवश्यक असतात. त्यामुळे केवळ आघाडीचे संख्याबळ पुरेसे ठरणार नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: केंद्र सरकार कोणते विधेयक पुन्हा संसदेत मांडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे?

    Ans: लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेचे अर्थात परिसीमनाचे (Delimitation) विधेयक पुन्हा संसदेत मांडण्यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्याचे सांगितले जात आहे.

  • Que: एप्रिल २०२६ मध्ये परिसीमन विधेयकावर झालेल्या मतदानात काय घडले होते?

    Ans: एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या मतदानात विधेयकाच्या बाजूने २९८ आणि विरोधात २३० मते पडली होती; मात्र घटनादुरुस्ती मंजुरीसाठी आवश्यक असलेली ३५२ मते न मिळाल्याने विधेयक मंजूर होऊ शकले नव्हते.

  • Que: या विधेयकाच्या मंजुरीसाठी संसदेत कोणती हालचाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे?

    Ans: सरकार दोन तृतीयांश बहुमताच्या जवळ पोहोचल्याचा दावा केला जात असल्याने, हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

Web Title: Central government moves to reintroduce delimitation bill special parliament session likely as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 06:15 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.