माझा फोन टॅपिंग केला जातोय, त्याचे सर्व पुरावे माझ्याकडे..; राहुल गांधींचा खळबळजनक आरोप
राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत धक्कादायक दावे केले आहेत.”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशावरून माझा टॅपिंग केला जात आहे. मी फोनवर कोणाशी बोलतो आणि माझ्या इतर हालचालींची सर्व माहिती पंतप्रधान मोदींपर्यंत पोहचवली जात होती. याचे सर्व पुरावे माझ्या फोनमध्ये आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा माझ्यासोबत खुल्या चर्चेसाठी यावे, या चर्चेतून परकीय शक्तींच्या सांगण्यावरून कोण काम करत आहे आणि गद्दार कोण आहे हे उघड होईल. माझ्याकडे बरीच माहिती आहे जी मला माहित आहे आणि माझ्या फोनमध्ये आहे.”
राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चर्चेचे आव्हान देत म्हटले की,मला मोदींना थेट प्रश्न विचारायचे आहेत. ते या चर्चेसाठी टेलिप्रॉम्प्टरही आणू शकतात आणि आपल्या पसंतीचा न्यायाधीश नियुक्त करू शकतात. मोदीजी, तुमच्याच पाळीव मीडियाच्या दिवाळीच्या कार्यक्रमातही टेलिप्रॉम्प्टर वापरत आहात, ही जनता तुमची आहे, मंच तुमचा आहे, वातावरण तुमचे आहे—तरीही तुम्हाला स्क्रिप्टची गरज होती. माझ्यासोबतच्या चर्चेतही टेलिप्रॉम्प्टर घेऊन या आणि तुमच्या पसंतीचा न्यायाधीश नियुक्त करा. फक्त या. देशाला जाणून घ्यायचे आहे—खरा गद्दार कोण आहे?” असं म्हणत त्यांनी मोंदीवर टिकाही केली आहे.
गेल्या काही वर्षांपासून मला संसदेत बोलण्याची संधी दिली जात नाही. संसदेत माझा मायक्रोफोन बंद केला जातो. मला महत्त्वाच्या विषयांवर बोलू दिले जात नाही. मी शेतकरी कायदे, मतचोरी, विशेष सखोल पुनरावलोकन (SIR), चीन, माजी लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांचे पुस्तक आणि एपस्टाईन प्रकरणाशी संबंधित मुद्द्यांवर संसदेत बोलण्याच्या प्रयत्नांचा उल्लेख केला. पण अनेकदा फोन बंद करण्यात आला. याच कारणांमुळे आता मला पंतप्रधान मोदींसोबत सार्वजनिक व्यासपीठावर समोरासमोर चर्चा करायची आहे.
Pune Revenue Dept Action: पुण्यातील बांधकाम क्षेत्रात मोठी खळबळ! महंमदवाडीतील नामांकित गृहप्रकल्पां
मोदी जी, अपने ही गोदी मीडिया के दिवाली मिलन में भी टेलीप्रॉम्प्टर? लोग आपके, मंच आपका, माहौल आपका – फिर भी स्क्रिप्ट चाहिए थी। लगता है दबाव में घबरा गए हैं। ख़ैर, कोई बात नहीं। मुझसे बहस में भी टेलीप्रॉम्प्टर ले आइए, जज भी अपनी पसंद का बैठा लीजिए। बस आइए तो सही। देश जानना चाहता है – असली देशद्रोही कौन है? — Rahul Gandhi (@RahulGandhi) November 13, 2026






