मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर छगन भुजबळ यांचं मोठं विधान
मुंबई : राज्य मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. यामध्ये माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे ते प्रचंड नाराज असल्याचे दिसून आले. त्यानंतर आता त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या भेटीवर भुजबळ यांनी भाष्य केले. ‘ओबीसींचा आशीर्वाद, पाठिंबा मिळाला. त्यामुळे महायुतीचा विजय झाला. मुख्यमंत्र्यांनी 8-10 द्या त्यानंतर नवा मार्ग शोधून काढू’ असे आश्वासन दिल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे.
हेदेखील वाचा : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी; छगन भुजबळ मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यात भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीतील तीनही पक्षांचे सरकार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात स्थापन झाले आहे. यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील अनेकांचा शपथविधी सोहळाही पार पडला. पण, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. त्यानंतर आता त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
या भेटीवर ते म्हणाले, ‘ओबीसीचा महायुतीच्या विजयात मोठा वाटा आहे. अनेक गोष्टींवर आम्ही मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा केली. माझ्यासोबत माजी खासदार समीर भुजबळ हेदेखील होते. राज्यात ज्या घडामोडी झाल्या त्यावर चर्चा केली. आमची ही चर्चा सकारात्मक झाली. मुख्यमंत्री फडणवीसांनी सर्व म्हणणं ऐकून घेतले. ओबीसीचा आशीर्वाद, पाठिंबा मिळाला. त्यामुळे मोठा विजय झाला. ओबीसीचे नुकसान होईल, असे आम्ही चुकून इच्छित नाही. नाराजी दूर करावीच लागले. मुख्यमंत्र्यांनी 8-10 द्या त्यानंतर नवा मार्ग शोधून काढू, शांततेने मार्ग काढू, असे आश्वासन दिल्याचेही त्यांनी सांगितले.
अनेक नेत्यांचा पत्ता कट
छगन भुजबळ, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, दिलीप वळसे-पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी माध्यमांसमोर आपली भूमिकाही स्पष्ट केली. पण, आता ते मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला गेल्याने चर्चांना उधाण आले आहे.