
CJP Agitation At Shivaji Park Mumbai On October 2 :
मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारताच अभिजीत दिपके यांनी थेट ट्विटर एक्सवर एक पोस्ट शेअर करत जेलभरो आंदोलनाची घोषणा केली आहे. अभिजीत दिपके यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर करत “ज्ञानू, मस्ट गो….” अशी पोस्ट केली आहे. त्यासोबतच त्याखाली ‘ जेल भरो आंदोलन २ ऑक्टोबर, दुपारी ४ वाजता, शिवाजी पार्क’ असही लिहित त्यांनी जेलभरो आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे ज्ञानेश कुमारांच्या अडचणी वाढणार असल्याचे दिसत आहे.
Manoj Jarange Patil: ‘मेलो तरी चालेल,मी…’, मनोज जरांगे आक्रमक, चौकशांवरून सरकारवर गंभीर आरोप,
अभिजीत दिपके यांनी येत्या २ ऑक्टोबरला दुपारी चार वाजता मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये आंदोलनाची घोषणा केली आहे. यावेळी आम्ही जेलभरो आंदोल करणार आहोत. या ट्विटमध्ये त्यांनी सेव्ह डेमोक्रॅसी हा हॅशटॅगही त्यांनी वापरला आहे. या दोन ओळींच्या ट्विटमध्ये दीपकेंनी आंदोलनाची घोषणा केली आहे. पण त्यांच्या याच दोन ओळींमुळे ज्ञानेश कुमारच नव्हे तर मुंबई पोलिसांनाही घाम फोडला आहे.
सीजेपीच्या या निर्णयामुळे मुंबईतील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावरही दबाव वाढण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार 2 ऑक्टोबरपूर्वी राजीनामा देतात का, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, मुंबईत ठाकरे बंधूंकडूनही महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत महामोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
या महामोर्चात इतर पक्षांच्या नेत्यांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मोर्चाची सुरुवात कुठून होणार, तो कुठपर्यंत जाणार आणि किती वाजता निघणार, याबाबतची सविस्तर माहिती राज ठाकरे लवकरच जाहीर करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
एकीकडे सीजेपीकडून आंदोलनाची घोषणा, तर दुसरीकडे ठाकरे बंधूंकडून महामोर्चाची तयारी सुरू झाल्याने मुंबईतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. आगामी काळात या दोन्ही आंदोलनांना कसा प्रतिसाद मिळतो आणि त्यातून कोणत्या राजकीय घडामोडी घडतात, याकडे लक्ष लागले आहे.