Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati Teachers Constituency : शिक्षक मतदारसंघात चुरस वाढली; 4 उमेदवारांचे नामांकन दाखल, संख्या पोहोचली 6 वर

विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान करणाऱ्या शिक्षक मतदारांसाठी विशेष नैमित्तिक रजेची तरतूद करण्यात आली आहे. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होणार असून, २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 04, 2026 | 08:44 AM
४ उमेदवारांचे नामांकन दाखल

४ उमेदवारांचे नामांकन दाखल

Follow Us
Follow Us:

अमरावती : विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नामांकन प्रक्रिया वेगात सुरू आहे. शनिवारी नामांकन दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी 4 उमेदवारांनी प्रत्येकी एक नामांकन अर्ज दाखल केला. त्यामुळे आतापर्यंत नामांकन दाखल करणाऱ्या उमेदवारांची संख्या 6 झाली आहे. शनिवारी 7 व्यक्तींनी एकूण 15 नामांकन अर्ज घेतले.

शनिवारी नामांकन दाखल करणाऱ्यांमध्ये अशोक वामन हिवाळे (अपक्ष), दिलीप भीमराव कडू (अपक्ष), गाजी मोहम्मद जाहेरोश (वंचित बहुजन आघाडी) आणि आशीष मनोहर अंबुलकर (अपक्ष) यांचा समावेश आहे. रविवारी शासकीय सुट्टी असल्याने नामांकन अर्जाची विक्री आणि दाखल करण्याची प्रक्रिया बंद राहणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार नामांकन दाखल करण्याची अंतिम मुदत ६ ऑक्टोबर आहे. ७ ऑक्टोबर रोजी नामांकन अर्जाची छाननी होईल, तर ९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे.

अमरावती मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतमोजणी २७ ऑक्टोबर रोजी होणार असून, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

शिक्षक मतदारांना मतदानासाठी रजा

विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान करणाऱ्या शिक्षक मतदारांसाठी विशेष नैमित्तिक रजेची तरतूद करण्यात आली आहे. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होणार असून, २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने २२ सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासह इतर पदवीधर व शिक्षक मतदारसंघांमध्ये द्विवार्षिक निवडणुका होत आहेत. पात्र मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ मधील कलम १३५-ब अंतर्गत विशेष नैमित्तिक रजेची तरतूद आहे.

खाजगी संस्थांना दोन तासांची विशेष सवलत

खाजगी आस्थापनांमध्ये कार्यरत शिक्षक मतदारांना ही रजा लागू होणार नाही. अशा मतदारांना मतदानाची संधी मिळावी, यासाठी संबंधित खाजगी संस्थांना दोन तासांची विशेष सवलत देण्याचे निर्देश देण्यात आली आहेत. विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी नयना गुंडे यांनी शिक्षक मतदारांनी आपल्या मताधिकाराचा प्राधान्याने वापर करावा, असे आवाहन केले आहे.

‘स्वतःचं अपयश लपवण्यासाठी..,’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी रामदास कदमांचं मोठं वक्तव्य; ठाकरे बंधूंवर निशाणा

Web Title: Competition heats up in the teachers constituency 4 candidates file nominations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 08:44 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.