Vijay Wadettiwar Attacks On Sharad Pawar: पाठित खंजीर खुपसण्याचा इतिहास...; काँग्रेसचा शरद पवारांवर जहरी टिका

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने मतदारसंघ पुनर्रचना (Delimitation) विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये तीव्र नाराजी असून आघाडीत फूट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.
Vijay Wadettiwar Attacks On Sharad Pawar:
पाठित खंजीर खुपसण्याचा इतिहास...; काँग्रेसचा शरद पवारांवर जहरी टिका
Published on: 
Updated on: 
  • सीमांकन विधेयकावर मोदी सरकारला पाठिंबा देण्याचा शरद पवार गटाचा निर्णय

  • काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा शरद पवारांवर जोरदार हल्ला

  • शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसण्याच्या इतिहासाचा निषेध

  • शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर कृतघ्नतेचा आरोप

Congress Vijay Wadettiwar Attacks On Sharad Pawar: मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून महाराष्ट्रात राजकीय राजकारण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या गटाने मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेससह इंडिया आघाडी चांगलीच आक्रमक झाली आहे. पण त्याचवेळी इंडिया आघाडीतही फूट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवारांवर जोरदार हल्ला चढवला आहे.

Vijay Wadettiwar Attacks On Sharad Pawar:
Pramod Mittal : जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबाला लागली उतरती कळा; प्रमोद मित्तल यांच्या लंडन मेफेअरमधील 'त्या' 357 कोटींच्या बंगल्याचा वाद काय?

" शरद पवार यांनी संपूर्ण आयुष्य पुरोगामी विचारधारेला पुढे नेण्यासाठी समर्पित केले आहे. अशा नेत्यांकडून धर्मांध, जातीयवादी देश उद्ध्वस्त करणाऱ्या शक्तींशी हातमिळवणी करून त्यांच्या सोबत जातील असं कधीच वाटल नव्हतं. पण पवारांचा पाठीत खंजीर खुपसण्याचा इतिहास आहे. हे महाराष्ट्रातील आणि देशातील लोकांना माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचा जन्म सत्तेसाठी झाला आहे आणि सत्ता घेऊनच हे जग सोडणे हे त्यांचे ध्येय आहे." अशी घणाघाती टिका शरद पवारांनी केली आहे.

शरद पवार यांनी या वयात जो निर्णय घेतला आहे आणि घेत आहेत, त्यावर आमचा विश्वास बसत नाहीये. राज्यसभेच्या उमेदवारीदरम्यान त्यांनी आम्हाला पाठिंबा मागितला होता. आम्ही सर्वांनी मिळून त्यांना राज्यसभेवर पाठवलं, कारण पवारांच्या माध्यमातून फुले शाहु आंबेडकरांचा विचार राहिला पाहिजे, अशी आमची भावना होती. पण त्यांनीच तो विचार संपवला हे त्यांनी दाखवून दिलं. भाजपाला साथ द्यायचा निर्णय बाप-लेकीने मिळून घेतला आहे. सत्तेसाठी जगायचे आणि सत्ता घेऊन मरायचे एवढेच यांच्या डोक्यात असते. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष सत्तेसाठीच बनला आहे. . अशी घणाघातही वडेट्टीवार यांनी केला.

Vijay Wadettiwar Attacks On Sharad Pawar:
Coconut Importance: प्रत्येक शुभकार्याची सुरुवात नारळानेच का केली जाते? जाणून घ्या यामागील धार्मिक आणि आध्यात्मिक कारण

विजय वडेट्टीवार म्हणाले की, "या डिलीमिटेशन नंतर देशात जी परिस्थिती निर्माण होईल, देशात उद्याच्य लोकशाही संपवण्यात ज्यांचा ज्यांचा वाटा आहे त्यात त्यांचे नाव येऊ नये, अशी आमची इच्छा होती. पण आता त्या यादीत त्यांचे नाव येईल असे आम्हाला दिसत आहे. देशात हुकुमशाहीसाठी हे डिलीमिटेशन विधेयक आणले जात आहे. पण शरद पवार यांच्या पक्षाने त्याला पाठिंबा देण्याचा जो निर्णय घेतला, हे अत्यंत दुर्दैवी आहे. सत्तेशिवाय जगणे, या पक्षाला मान्यच नाहीये. त्यांना कुठलाही विचार नाही, हे सिद्ध झाले आहे."

काँग्रेस नेते म्हणाले, "हा आमच्या हायकमांडचा विचार होता. आमचे राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनाही असेच वाटत होते, म्हणूनच आम्ही त्यांना पाठिंबा दिला. ३६ आमदार असूनही आम्ही त्यांना पाठिंबा दिला, पण ते अशाप्रकारे आमच्या पाठीत खंजीर खुपसतील म्हणून नाही. आता आम्हाला आमची चूक कळली आहे.

शरद पवार गट इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार नाही.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, "आज इंडिया अलायन्सची बैठक बोलावण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गटातील कोणीही या बैठकीला उपस्थित राहणार नाही, अशी माहिती आम्हाला मिळाली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे; आता हे स्पष्ट झाले आहे की त्यांनी मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे."

Q

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार यांच्यावर टीका का केली आहे?

A

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने केंद्र सरकारच्या मतदारसंघ पुनर्रचना (Delimitation) विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार यांच्यावर पुरोगामी विचारधारेपासून दूर गेल्याचा आरोप करत टीका केली आहे.

Q

विजय वडेट्टीवार यांनी राज्यसभा निवडणुकीबाबत कोणता संदर्भ दिला?

A

वडेट्टीवार यांनी म्हटले की, राज्यसभेच्या उमेदवारीदरम्यान शरद पवार यांनी पाठिंबा मागितला होता आणि फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार जिवंत राहावा या भावनेतून आम्ही सर्वांनी मिळून त्यांना राज्यसभेवर पाठवले होते.

Q

या घडामोडींमुळे राज्यातील आघाडीवर काय परिणाम होत असल्याचे दिसत आहे?

A

परिसीमन विधेयकाला पाठिंबा देण्याच्या निर्णयामुळे काँग्रेससह इंडिया आघाडीतील पक्ष आक्रमक झाले असून, महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीत फूट पडल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.