महाराष्ट्राची अर्थव्यवस्था डबघाईला; प्रत्येकाच्या डोक्यावर 'इतक्या' हजारांचे कर्ज
नागपूर : विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला अवघ्या 16 जागांवर समाधान मानावे लागले. आता या पक्षाच्या गटनेतेपदासाठी मोठी चुरस दिसून येत आहे. गटनेतेपदाची निवड 17 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली. 16 डिसेंबर रोजी विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत असून, काँग्रेस आमदार गटनेत्याशिवायच सभागृहात दिसणार आहेत. विशेष म्हणजे काही तरुण आमदारांची नावेही गटनेतेपदासाठी पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेदेखील वाचा : Cabinet Expansion : मंत्रिमंडळाचं खातेवाट कधी होणार? महायुतीच्या मंत्र्याने पत्रकार परिषदेत सांगूनच टाकलं
महाविकास आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने भास्कर जाधव यांना, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जितेंद्र आव्हाड यांना आपापल्या पक्षाचे गटनेते म्हणून नियुक्त केले. मात्र, काँग्रेसला अद्यापही गटनेता निवडता आलेला नाही. मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर आता भाजपवर विरोधाचे आसूड ओढले जात आहे. या महाविकास आघाडीतील काँग्रेसला गटनेता निवडीसाठी विलंब होत आहे. या पदासाठी पक्षांतर्गत मोठी स्पर्धा असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
काँग्रेसच्या गटनेतेपदाची जबाबदारी मिळावी, यासाठी काँग्रेसच्या आमदारांमध्ये स्पर्धा लागलेली आहे. आजपासून विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत आहे. विधानसभेत मविआतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते विधानसभेत दिसतील.
काँग्रेसला गटनेत्याशिवायच करावी लागणार एन्ट्री
काँग्रेसला गटनेत्याशिवायच एन्ट्री करावी लागणार आहे. गटनेतेपदासाठी विलंब होत असल्यामागे नाना पटोले व विजय वडेट्टीवार यांच्यातील स्पर्धा कारणीभूत असल्याची चर्चा रंगली आहे. विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी पार पाडली तर नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचीही जबाबदारी पार पाडली. त्यामुळे या दोघांशिवाय इतर आमदारांची गटनेतेपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. यात आमदार विश्वजित कदम आणि लातूरचे आमदार अमित देशमुख यांची नावेदेखील चर्चेत आहेत. कदम आणि देशमुख यांनी राज्याच्या मंत्रिमंडळातही काम केले आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Cabinet expansion : CM देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्राला झुकतं माप; १० मंत्री घेणार आजच शपथ