...नाही तर एमआयएममध्ये जाईन, बीडमधील बड्या नेताचा थेट महायुतीला इशारा
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातील ३६ मंत्र्यांचा शपथविधी आज नागपूरमध्ये पार पडला. मात्र आता प्रतिक्षा आहे ती खातेवाटपाची, कोणाकडे कोणत्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी दिली जाते, याची उत्सुकता राज्यातील जनतेला आहे. दरम्यान मंत्र्यांच्या शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत खातेवाटपारवर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यातील जनतेने महायुतीला मोठ्या बहुमताने निवडून दिलं आहे. बहुमत मिळाल्याने आमची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. राज्यात विरोधक कमी संख्येने असले तरी आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार नाही. आजच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर करण्यात येईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. विरोधकांची संख्या कमी असले तरी महत्त्वाच्या प्रश्नांना उत्तर देणार असल्याचे सांगत विरोधकांनी प्रश्न मांडावेत, असा सल्ला अजित पवार यांनी दिला.
येणाऱ्या काळात आमचं सरकार जनतेच्या विश्वासाला पात्र राहिल, असं आश्वासनं देत अजित पवार म्हणाले, ‘दोन ते तीन दिवसांत मंत्रिमंडळाचं खातेवाटप होणार आहे. मागच्या अडीच वर्षात आम्ही टीम म्हणून काम केल्याचे सांगत त्यांनी येत्या काळात लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं ते म्हणाले. महायुती सरकारच्या काळात झालेलं काम पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न राहिलं, त्यासोबतच विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे दिली जातील, असंही त्यांनी म्हटलं आहे.
‘आज मंत्रिमंडळ विस्तार झाला. सर्व माध्यम मंत्रिमंडळचं वाटप करत होते आणि आम्ही पाहत होतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली खातेवाटप होईल. नागपूरकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देतो म्हणून ते पुन्हा आले. प्लेयर तेच आहेत, मॅच नवीन आहे’.
‘आम्ही टीम म्हणून काम केले. गेल्यावेळी सभागृहात म्हणालो होतो की, आम्ही दोघे मिळून दोनशे आमदार निवडून आणू, असे म्हणालो होतो. अजितदादा सोबत असल्याने 232 बोनस सहित आले. आम्ही जनतेच्या प्रती उत्तरदायी आहे. विदर्भाला न्याय देण्यासाठी आम्ही निर्णय घेतले, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
‘आम्ही लोकाभिमुख सरकार असल्याचं दाखवून दिलं. आमचा स्ट्राईक रेट देशात नंबर 1 होता, म्हणून विरोधकांना जनतेने नाकारत जागा दाखवली. विरोधकांना विरोधीपक्ष नेता म्हणूनही संख्याबळ आणता आलं नाही. लोकसभा निकालानंतर महाविकास आघाडीने मंत्रिमंडळ वाटून टाकले, पण जनतेने आम्हाला कौल दिला. विरोधकांची परंपरा आहे. जनतेने विरोधकांवर बहिष्कार टाकला आहे. सुदृढ लोकशाहीचे संकेत दिले. सरकार चुकत असेल तर त्यांनी बोलावे. विरोधाला विरोध म्हणून बोलू नये’, असाही ते म्हणाले.