Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धैर्यशील कदम यांचा दमदार उमेदवारी अर्ज, भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीची रणशिंग

सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी सोमवारी मोठ्या उत्साहात आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.

  • By विवेक
Updated On: Jun 02, 2026 | 02:51 PM
Dhairyashil Kadam submits candidature form, Satara Sangli Vidhan Paraishad Election 2026, Vidhan Paraishad Election 2026,

Dhairyashil Kadam submits candidature form, Satara Sangli Vidhan Paraishad Election 2026, Vidhan Paraishad Election 2026,

Follow Us
Follow Us:

सातारा : सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी सोमवारी मोठ्या उत्साहात आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून भाजपने या निवडणुकीतील आपली ताकद दाखवत विजयाचा निर्धार व्यक्त केला.

धैर्यशील कदम यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सातारा जिल्ह्यातील मतदारांची संख्या लक्षणीय असल्यामुळे या निवडणुकीत साताऱ्याची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे भाजपने दोन्ही जिल्ह्यांतील संघटनात्मक यंत्रणा सक्रिय करत निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

Vidhan Parishad Election 2026: पार्थ पवारांची मध्यस्थी यशस्वी, मनधरणीनंतर सुनील टिंगरेंची माघार

उमेदवारी निश्चित होण्यापूर्वी पक्षांतर्गत विविध नावांची चर्चा होती. खासदार उदयनराजे भोसले यांनी सुनील काटकर यांच्या नावाला पाठिंबा दिल्याची चर्चा होती, तर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे पृथ्वीराज देशमुख यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील असल्याचे बोलले जात होते. मात्र, पक्ष नेतृत्वाने सर्व पर्यायांचा विचार करून धैर्यशील कदम यांच्यावर विश्वास दाखवला.

राजकीय प्रवासात विविध पक्षांमध्ये काम केलेल्या कदम यांनी गेल्या काही वर्षांत भाजपमध्ये संघटनात्मक पातळीवर सक्रिय भूमिका बजावली आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या निर्णयाला प्राधान्य देत त्यांनी उमेदवारी मागे घेतल्याने त्यांच्या पक्षनिष्ठेचीही चर्चा झाली होती. त्यानंतर त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदासह विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या.

विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी मतदानासाठी पक्षाने नियोजनाला गती दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांशी संपर्क वाढविण्यासह विजयासाठी व्यापक रणनीती आखली जात असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली.

CM Devendra Fadnavis News: लाडकी बहीण योजनेतील ८० लाख लाभार्थी का वगळले? मुख्यमंत्री फडणवीसांचा खळबळजनक खुलासा

Web Title: Dhairyashil kadam submits candidature form for satara sangli vidhan paraishad election 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 02:51 PM

Topics:  

  • Vidhan Parishad Election

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.