जीबी सिंड्रोमचा राज्यात दुसरा बळी, ससूनमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू; रुग्णसंख्या १२७ वर
पुणे : मागील अनेक दिवसांपासून राज्यात गुलियन बॅरे सिंड्रोमचे (GBS) या दुर्मिळ आजारांचे रुग्ण आढळत आहेत. यामुळे सर्वांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे. GBS च्या रुग्णात वाढ झाली आहे. पुण्यामध्ये या आजाराचे अधिक रुग्ण आढळत आहेत. पुण्यात GBS या आजाराचे तब्बल 74 रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. या रुग्णांपैकी 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर पुण्यात एकाचा मृत्यू देखील झाला आहे.
पुणे शहरामध्ये गुलियन बॅरे सिंड्रोमचे (GBS) अनेक रुग्ण आढळत आहेत. आत्तापर्यंत 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून तर पाच रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या रोगाचा उपचार करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सूचनेनुसार पुणे महापालिकेने पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात जीबीएसच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. यासाठी 15 आयसीयू बेड आरक्षित करण्यात आले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुण्यात गुलियन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS चे बरेच रुग्ण आढळले असून त्यांची संख्याही वाढली आहे. आता पुण्यात रुग्णाची संख्या 74 वर गेली आहे. तर पुण्यातील एका तरुणाचा गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराने मृत्यू झाला आहे. बाधित होऊन मृत्यू झाला असून हा तरूण डीएसके विश्वमध्ये वास्तव्यास होता. तो मूळचा सोलापूरचा होता, पण काही काळापासून पुण्यात रहात होता. या तरुणाला काही दिवसांपूर्वी गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराची लागण झाली होती. GBS मुळे तब्येत खालावल्याने त्याला सोलापूरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं होतं. त्यानंतर तो तरूण बरा होऊन काहीच दिवसांपूर्वी अतिदक्षता विभागातून बाहेरही आला होता. पण त्याला परत श्वासनाचा त्रास झाल्याने त्या तरूणाचा अचानक मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
पुण्यात वाढणाऱ्या या रुग्णामुळे प्रशासन देखील तयारीला लागले आहे. पुणे महानगरपालिकेकडून तयारीला सुरुवात झाली आहे. तसेच दक्षता घेतली जात आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागातील महापालिकेचे असलेल्या कमला नेहरु रुग्णालयात GBS आजारावर मोफत उपचार केले जाणार आहेत. सध्या GBS या आजाराचे पुण्यात 74 रुग्ण आहेत. त्यापैकी 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर पाच रुग्णांना आज डिस्चार्ज दिला जाणार आहे. GBS रुग्णांसाठी 50 बेड तर 15 आय सी यू बेड हे कमला नेहरू रुग्णालयात आरक्षित करण्यात आले आहेत. पुणे महापालिका आयुक्त सर्व आरोग्य विभागाची थोडा वेळात बैठक घेणार आहेत.