महापालिकेने खडकवासला येथील जलसंपदाच्या जागेवर जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. यासाठीचे पूर्वगणनपत्रक (एस्टिमेट) तयार करण्याचे काम सुरू आहे.
जीबीएस हा गंभीर स्वरूपाचा आजार असून त्यामध्ये शरीराचे स्नायू कमकुवत होतात. काही प्रकरणात पक्षाघात होण्याची शक्यता वर्तविली जाते. हा आजार संसर्गजन्य नसला तरी तो पाणी आणि न शिजलेल्या अन्नावाटे पसरतो.
सिंहगड रस्ता भागात पुन्हा एकदा ‘गुईलेन बॅरे सिंड्रोम’ (जीबीएस) चे नवीन रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेने सिंहगड रस्ता भागातील एकुण ४३ आर ओ प्लांट बंद केले आहेत.
जानेवारी महीन्यात जीबीएस आजार हा अशुद्ध पाण्यामुळे हाेत असल्याचे आढळून आले हाेते. त्यानंतर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून महापालिकेकडून या भागातील आरओ प्रकल्पांच्या पाण्याची तपासणी केली होती.
शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या १४४ टाक्या असून, त्यापैकी ५२ टाक्यांची स्वच्छता पूर्ण झाल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी दिली.
महापालिकेने १२ गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी केलेल्या प्रकल्प आराखड्यानुसार खडकवासला धरणाच्या पायथ्याशी १०० एमएलडीचे प्रत्येकी दोन जलशुद्धीकरण केंद्र, पंपहाऊस व जॅकवेल बांधण्यात येणार आहेत.
गेल्या महिनाभरापासून शहरात विशेषत: सिंहगड रस्ता भागातील नांदेड, किरकटवाडी , नांदाेशी आदी परीसरात जीबीएस या आजारांचे रुग्ण माेठ्या प्रमाणावर आढळून आले. यामुळे शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले हाेते.
पुण्यात जीबीएस आजाराचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जीबीएस आजार मोठ्या प्रमरणात पसरत आहे. दूषित पाण्यामुळे हा आजार पसरत असल्याचे म्हटले जात आहे.
गेल्या महिन्यात शहरात विशेषत: सिंहगड रस्ता भागातील किरकटवाडी, नांदाेशी, नांदेड आदी भागात माेठ्या प्रमाणावर जीबीएस या आजारांचे रूग्ण आढळून आले होते. सदर आजार दुषित पाण्यामुळे हाेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा रोग नवीन नसून, तो अनेक वर्षांपासून ओळखला जातो. हा संसर्गजन्य रोग नसला, तरी काही वेळा जीवाणू किंवा विषाणूच्या संसर्गानंतर तो विकसित होऊ शकतो.
जीबीएस हा एक ऑटोइम्यून आजार आहे. आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती चुकीने आपल्याच नसांवर हल्ला करते. सहसा हा आजार होण्यापूर्वी १ ते ६ आठवड्यांमध्ये एखादे पोटाचे किंवा श्वसनसंस्थेचे इन्फेक्शन होते.
उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पुण्यातील जीबीएस आजाराविषयी चर्चा झाली. हा आजार दुषित पाण्यामुळे हाेत असल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू संस्थेने दिला हाेता.
एनआयव्हीकडून आलेल्या अहवालानुसार जीबीएस आजार हा दुषित पाण्यामुळे हाेत असल्याचे स्पष्ट हाेत असुन, काही प्रमाणात प्राण्याच्या विष्ठेमुळे देखील ताे हाेऊ शकताे, असे अतिरीक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. म्हणाले.
कोथरूड परिसरातील भारतीनगर ते भिमाले टॉवर दरम्यानच्या नाल्यात दररोज ४ ते ५ डुकरे मृतावस्थेत आढळून येत आहेत. गेल्या पाच दिवसांपासून मृत डुकरे सापडत आहेत.
गेल्या महिन्याभरापासून शहरात विशेषत: सिंहगड रस्ता भागातील नांदेड, किरकटवाडी , नांदोशी आदी परिसरात जीबीएस या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून आले. यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
पीएमसी प्रशासनाला गेल्या आठवड्यात जीबीएस-प्रभावित भागात दररोज 800 फेऱ्या करणाऱ्या 15 खाजगी पाण्याच्या टँकर सेवा प्रदात्यांकडून घेतलेल्या नमुन्यांमध्ये बॅक्टेरियाचे दूषित घटक आढळले.