India Allience : ज्ञानेश कुमार 'गो बॅक'; इंडिया आघाडीचा सुप्रिम कोर्टावर धडक मोर्चा, राहुल-खरगेंसमवेत अनेक नेत्यांचा समावेश, सौजन्य : आयएएनएस
इंडिया आघाडीचे वरिष्ठ नेते हरीश रावत म्हणाले की, ज्ञानेश कुमारांचा तातडीने राजीनाम घ्यायला हवा. हा विरोध लोकशाही आणि मतदान करण्याच्या अधिकाराच्या संरक्षणासाठी आहे. हे सर्वसाधारण लोकांच्या मतदानाच्या अधिकाराला सुरक्षित ठेवण्यासाठी आहे. मत सुरक्षित राहिले, तरच लोकशाही वाचेल आणि लोकशाही वाचेल तरच संविधान व देश वाचेल.
काँग्रेस नेत्यांच्या मते, ही राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात देशाला वाचवण्याची लढाई आहे. या आंदोलनाबाबत काँग्रेसचे खासदार मुकुल वासनिक म्हणाले की, आम्ही पुढे जात राहणार आणि आपल्या मागणीवर बळकटीने दटून राहू.
ही फक्त विरोधी पक्षाची मागणी नाही. ही संपूर्ण भारतात त्या सर्व लोकांची मागणी आहे, जे संविधान आणि लोकशाहीवर विश्वास ठेवतात. आम्ही पूर्ण दृढतेसह या लढाईला अखेरपर्यंत लढू.
काँग्रेस नेते अशोक गहलोत म्हणाले की, संपूर्ण देशाला ठाऊक असायला हवे की, गृहमंत्रालयाअंतर्गत काय होत आहे आणि तरुण, महिला आणि पत्रकारांसोबत कशाप्रकारचा व्यवहार केला जात आहे.
जंतर-मंतरला आंदोलन स्थळांच्या यादीतून दिल्ली पोलिसांनी वगळल्यामुळे यावर काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी जोरदार टिका केली. ते म्हणाले की, या देशात आपलं म्हणणं मांडण्यासाठी स्वातंत्र्य आहे. आंदोलन करणे, धरणे धरणे, पदयात्रा करने हे सर्व आपली मागणी मान्य करून घेण्यासाठी लोकशाही मार्ग आहेत.
आता जंतर-मंतरला आंदोलन स्थळातून त्यांनी हटवले, तर मला सांगा, आम्ही कुठे जायचे? देशाच्या राजधानीत ती कोणती जागा आहे, जिथे जात आपले गाऱ्हाणे मांडू शकतो.
इंडिया आघाडीच्या आंदोलनाबाबत ते म्हणाले की, आज संपूर्ण देश रस्त्यावर उतरले आहेत. राहुल गांधींच्या नेतृत्त्वात असंख्य काँग्रेस कार्यकर्ते देशभरातून येथे जमलेत. त्या सर्वांची एकच मागणी आहे की, सुप्रिम कोर्टाने आमचे म्हणणे ऐकूण घ्यावे. सीईसीने जे काम केले, ते बैकायदेशीर होते, असंविधानिक होते व त्यांना आपल्या पदावरून राजीनामा हा द्यावाच लागेल.






