Jan Aakrosh Morcha In Chhatrapati Sambhajinagar due to Santosh Deshmukh murder case
छत्रपती संभाजीनगर : बीडमधील हत्या प्रकरणावरुन राज्याचे राजकारण तापले आहे. मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली. यामुळे राज्यातील सत्ताधारी आमदारांसह विरोधकांनी देखील टीकेची झोड उठवली आहे. संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये पूर्ण कारवाई करुन त्यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी केली जात आहे. यासाठी महाराष्ट्राभरामध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये संतोष देशमुख यांची हत्या झाल्यामुळे न्यायासाठी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. यासाठी मोठा जनसमुदाय लोटला आहे. या जनआक्रोश मोर्चामध्ये मराठा नेते मनोज जरांगे पाटील सामील झाले आहेत. त्याचबरोबर भाजप आमदार सुरेश धस देखील आहेत. मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले असून न्यायाची मागणी केली जात आहे. छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या निषेध मोर्चा देशमुख कुटुंबीय आम्ही सहभागी होणार आहोत. गरज पडली तर आमचं कुटुंब थांबणार नाही. समित्या स्थापन झाल्या आहेत. त्यांच्याकडून एकच अपेक्षा आहे न्याय भेटला पाहिजे. अजित पवारांकडून अपेक्षा आहे, असे मत संतोष देशमुख यांच्या परिवाराकडून व्यक्त केले जात आहे.
नवराष्ट्र विशेष लेख वाचा एका क्लिकवर
बीड हत्या प्रकरणामध्ये सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे. या कृष्णा आंधळेचा तपास सुरू आहे. वाल्मिक कराड याच्यासह इतरांवर मोक्काही लावण्यात आला आहे. दुसरीकडे बीडच्या पालकमंत्री पदाची सूत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हाती घेतील आहेत. तरीही या प्रकरणातील संताप संपलेला दिसत नाही. ज्या क्रूर पद्धतीने ही हत्या करण्यात आली आणि सुरुवातीला प्रकरण ढिलाईने हाताळण्यात आले त्यावरून ही संताप कायम असल्याचे दिसून येते. दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये आज जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
बीडचे पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांची संधी नाकारण्यात आली आहे. त्याऐवजी अजित पवार यांनाच बीडचे पालकमंत्री देण्यात आले आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये देखील जोरदार चर्चा सुरु आहे. वाल्मिक कराड यांच्यासोबत असलेल्या संबंधांमुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. विरोधकांसह मित्रपक्षाच्या आमदारांनी देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यामुळे बीडचे पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांना संधी देण्यात आलेली नाही.
बीडचे पालकत्व अजित पवार यांच्याकडे आल्यामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यावर मस्साजोगमधील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. आजपर्यंत झालेल्या तपासावर आम्ही समाधानी आहोत कारण मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता शेवटचा गुन्हेगार संपत नाही तोपर्यंत आम्ही हा तपास बंद करणार नाही.ज्या अर्थी अजित दादांनी पालकमंत्री पद घेतल ते ही गुंडगिरी संपवण्यासाठी घेतलं आहे, असा विश्वास मस्साजोगवासियांनी व्यक्त केला. दादा वाद्यावर पक्के असतात, त्याच्यामुळे आम्हाला शंभर टक्के वाटतं दादा न्याय देतील, असा विश्वास गावकरी देखील व्यक्त करत आहेत.