World Religion Day : जागतिक धर्म दिन म्हणजे आणि सुसंवादाच्या दिशेने एक महत्त्वाचा पाऊल ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
नवी दिल्ली : दरवर्षी जानेवारी महिन्यातील तिसऱ्या रविवारी साजरा होणारा जागतिक धर्म दिन हा धर्म आणि श्रद्धा प्रणालींमधील सुसंवाद आणि परस्पर समजुतीसाठी महत्त्वाचा संदेश देतो. विविध धर्मांच्या समुदायांना एकत्र येण्यासाठी आणि एकमेकांच्या श्रद्धा ऐकण्यासाठी हा दिवस एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देतो. यामुळे धर्म, संस्कृती आणि मानवी परस्परतेमधील फरक व समानता समजून घेण्याची संधी मिळते.
जागतिक धर्म दिनाचा इतिहास
1950 साली पहिल्यांदा जागतिक धर्म दिन साजरा करण्यात आला. या दिवसाची संकल्पना 1947 साली पोर्टलँड, मेन येथे झालेल्या बहाई धर्माच्या राष्ट्रीय आध्यात्मिक सभेच्या उपक्रमातून विकसित झाली. या सभेमध्ये विविध धर्मांमध्ये सुसंवाद साधण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यानंतर 1949 पर्यंत हा उपक्रम अमेरिकेत लोकप्रिय झाला आणि 1950 पासून तो “जागतिक धर्म दिन” म्हणून साजरा केला जाऊ लागला.
बहाई धर्माची मुळे पर्शियामध्ये (सध्याचा इराण) 1844 मध्ये रुजली. या धर्माचे तीन मुख्य तत्त्व आहेत. देवाची एकता, धर्माची एकता आणि मानवजातीची एकता. बहाई धर्म मानतो की सर्व धर्म समान आध्यात्मिक उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न करतात आणि धर्म ही एक सतत विकसित होणारी प्रक्रिया आहे.
जागतिक धर्म दिन साजरा करण्याचे उद्दिष्ट
जागतिक धर्म दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. आंतरधर्मीय व्याख्याने, चर्चा सत्रे आणि सांस्कृतिक उपक्रमांद्वारे लोकांना इतर धर्म, संस्कृती आणि परंपरांविषयी अधिक जाणून घेता येते. या कार्यक्रमांमध्ये प्रख्यात वक्ते आणि आध्यात्मिक नेते विविध धर्मांतील समान धागे शोधण्याचा प्रयत्न करतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : परदेशातील कटू सत्य! लंडनमध्ये एक लाख रुपयांच्या भाड्याच्या घरातही या माणसाला येतोय चाळीत राहिल्याचा फील; पाहा व्हिडिओ
जागतिक धर्मांचा विविधतेत एकात्मतेचा संदेश
जगभरात अंदाजे 4,200 धर्म आहेत. अनेक लोक आपले जवन धर्माशिवाय जगत असले तरी, एका उच्च शक्तीवर विश्वास ठेवणे ही संकल्पना जगातील अनेकांसाठी महत्त्वाची ठरते. ख्रिश्चन धर्म हा 2.3 अब्ज अनुयायांसह सर्वात मोठा आहे, तर इस्लाम धर्म 1.8 अब्ज अनुयायांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
आंतरधर्मीय सुसंवादाचे महत्त्व
धर्म हे केवळ श्रद्धा नसून एक सामाजिक आणि सांस्कृतिक अनुभव आहे. जागतिक धर्म दिन हा संवाद, ऐकण्याचे स्वातंत्र्य आणि विविध धार्मिक दृष्टिकोनांमधील समानता शोधण्यासाठी प्रेरित करतो. हा दिवस धर्मामुळे होणाऱ्या वादांचा मार्ग शांततेकडे वळवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : शेख हसीना यांचे खळबळजनक वक्तव्य; ‘माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, मृत्यू जवळच होता मी 25 मिनिटांनी वाचले’
प्रेरणादायी तथ्ये आणि महत्त्व
धर्म लोकांना एकत्र आणतो: जगभरातील धर्म एकता आणि मानवीय मूल्यांना प्रोत्साहन देतात.
आंतरधर्मीय सुसंवाद: विविध धर्मांतील समज आणि परस्पर संवाद शांततापूर्ण सहजीवनासाठी महत्त्वाचा ठरतो.
नवीन अनुभवांची संधी: धार्मिक उत्सवांमध्ये सहभागी होऊन आपली सांस्कृतिक जाण समृद्ध करता येते.
या दिवसाचे महत्त्व
जागतिक धर्म दिन हा मानवी समाजाला भेदभाव आणि धार्मिक वादांमधून उंचावून परस्पर समजुती आणि शांततेचा संदेश देतो. विविध धर्म, संस्कृती, आणि मानवी परंपरांचा सन्मान करत, हा दिवस आपल्याला एकत्र येण्याचे, शिकण्याचे, आणि फरक असूनही एकमेकांशी जुळवून घेण्याचे स्मरण करून देतो.