Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

यंदाची विधानसभा रंगणार ! राज्यामध्ये आणखी एक नवीन पक्ष तयार; निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?

राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. यासाठी सर्वच प्रमुख पक्ष कामाला लागले आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये नवीन पक्ष उदयास आला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी या पक्ष स्थापन केला असून याला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 01, 2024 | 06:25 PM
Sambhajiraje Chhatrapati founded the new Maharashtra Swarajya Party

Sambhajiraje Chhatrapati founded the new Maharashtra Swarajya Party

Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यासाठी महायुतीसह महाविकास आघाडी तयारीला लागली आहे. राज्यातील सर्व प्रमुख पक्षांनी प्रचाराचा धुराळा उडवला असून जोरदार राजकारण रंगले आहे. निवडणूक आयोग देखील आढावा घेऊन गेले असून लवकरच निवडणुकीची तारीख जाहीर होणार आहे. राज्यामध्ये अनेक प्रमुख पक्ष आणि युती असून आता आणखी एक पक्ष निर्माण झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी आणखी एक पक्षाची स्थापना झाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोल्हापूर गादीचे वंशज संभाजीराजे छत्रपती हे सक्रीय राजकारणामध्ये आले आहेत. मागील वर्षी त्यांनी स्वराज्य संघटना स्थापन केली होती. राजकीयदृष्टीनेच ही संघटना तयार करण्यात आली होती. पुण्यामध्ये या संघटनेचा भव्य लोकार्पण सोहळा पार पडला होता. त्याचबरोबर स्वराज्य भवन देखील स्थापन करण्यात आले होते. आता राज्यामध्ये परिवर्तन महाशक्ती अशी तिसरी आघाडी तयार झाली आहे. यामध्ये प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू, स्वराज्य संघटनेचे संभाजीराजे छत्रपती तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी एकत्रित येत ही तिसरी आघाडी निर्माण केली आहे. यानंतर आता संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या स्वराज्य संघटनेचे रुपांतर पक्षामध्ये केले आहे.

हे देखील वाचा : मोदी सरकारमध्ये पहिली ठिणगी? लोकप्रिय तरुण नेत्याने केले मंत्रिपदाला लाथ मारण्याचे वक्तव्य

संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांची स्वराज्य संघटनेचे रुपांतर आता राजकीय पक्षामध्ये केले आहे. महाराष्ट्र स्वराज्य पक्ष असे त्यांच्या पक्षाचे नाव यापुढे असणार आहे. याला निवडणूक आयोगाने देखील मान्यता दिली आहे. त्याचबरोबर आयोगाकडून पक्षाला चिन्ह देखील देण्यात आले आहे. सप्तकिरणांसह पेनाची निब” हे पक्षचिन्ह संभाजीराजे छत्रपती यांच्या पक्षाला मिळाले आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आनंदवार्ता…! स्वराज्य संघटनेचे सर्व कार्यकर्ते, चाहते व हितचिंतक तसेच तमाम महाराष्ट्रवासियांना कळविणेस अत्यंत आनंद होतो की, दि. 09 ऑगस्ट 2022 रोजी तुळजाभवानी मातेच्या साक्षीने आणि हजारो शेतकरी, कष्टकऱ्यांच्या साथीने स्थापन झालेली “स्वराज्य संघटना” आता भारतीय निवडणूक आयोगाकडे “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” या नावाने एक राजकीय पक्ष म्हणून अधिकृतपणे नोंदणीकृत झालेला आहे. अर्थातच, स्वराज्य संघटना आजपासून “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” म्हणून ओळखला जाईल. याचबरोबर, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला “सप्तकिरणांसह पेनाची निब” हे निवडणूक चिन्ह प्राप्त झालेले आहे.मागील वर्षभरात आपण आपली संघटना एक पक्ष म्हणून घराघरात पोहोचवलीच आहे, आता अधिक जोमाने आपल्याला मिळालेले निवडणूक चिन्ह देखील सर्व मतदारांपर्यंत पोहोचवणे आपले कर्तव्य आहे. महाराष्ट्रातील जनतेचे आपल्यावर असलेले प्रेम, पक्ष संघटनेचे कार्यकर्ते व हितचिंतकांचे कष्ट, राज्याच्या राजकारणाला असलेली एका नवीन व सुसंस्कृत पर्यायाची आवश्यकता ही आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करत, परिवर्तन महाशक्तीस सत्तास्थानी घेऊन जाईल, हे निश्चित ! जय स्वराज्य !”

आनंदवार्ता…!
स्वराज्य संघटनेचे सर्व कार्यकर्ते, चाहते व हितचिंतक तसेच तमाम महाराष्ट्रवासियांना कळविणेस अत्यंत आनंद होतो की,
दि. ०९ ऑगस्ट २०२२ रोजी तुळजाभवानी मातेच्या साक्षीने आणि हजारो शेतकरी, कष्टकऱ्यांच्या साथीने स्थापन झालेली “स्वराज्य संघटना” आता भारतीय निवडणूक आयोगाकडे… pic.twitter.com/9hzkmXYegJ — Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) October 1, 2024

Web Title: Kolhapur sambhajiraje chhatrapati founded the new maharashtra swarajya party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2024 | 06:25 PM

Topics:  

  • Sambhajiraje Chhatrapati
  • Vidhansabha Elections 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.