
नागपुरातच होणार हिवाळी अधिवेशन; 7 ते 18 डिसेंबरपर्यंत वेळापत्रक ठरले
यासंदर्भात झालेल्या बैठकीला विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, विधानसभा सदस्य सुधीर मुनगंटीवार, दीपक केसरकर, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड, सुनील प्रभू, अमीन पटेल, विधान परिषद सदस्य अनिल परब, विक्रम काळे, सतेज पाटील, प्रवीण दरेकर आणि विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
29 नोव्हेंबरपासून विधिमंडळ कार्यालयाचे कामकाज
विधीमंडळातील काही कर्मचारी २३ नोव्हेंबरलाच विधानभवन परिसराचा ताबा घेतील. रविवार, २९ नोव्हेंबरपासून विधीमंडळातील कर्मचारी कामकाजास सुरुवात करणार आहे. अधिवेशनासाठी प्रश्नोत्तरे सादर करण्याच्या कामासही सुरुवात झाली आहे. लक्षवेधी नागपुरात स्वीकारली जाणार आहे.
Q1. महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन २०२६ कुठे होणार आहे?
नागपुरात हिवाळी अधिवेशन २०२६ होणार आहे.
Q2. हिवाळी अधिवेशन कधीपासून सुरू होणार आहे?
हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
Q3. हिवाळी अधिवेशन किती तारखेपर्यंत चालणार आहे?
अधिवेशन १८ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.