Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MBMC Election : महाविकास आघाडी संकटात! मीरा–भाईंदरमध्ये जागावाटपावरून तणाव शिगेला

राज्यात नगरपालिकेच्या निवडणुकांचा रणसंग्राम सुरु अजून मीरा भाईंदरमध्ये महाविकास आघाडीत जागावाटपावरुन चढाओढ पाहायला मिळत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 29, 2025 | 05:57 PM
MBMC Election : महाविकास आघाडी संकटात! मीरा–भाईंदरमध्ये जागावाटपावरून तणाव शिगेला
Follow Us
Close
Follow Us:
  • महाविकास आघाडीमध्ये बिघाडी;
  • निवडणूकीच्या रिंगणात उमेदवारीवरुन टोकाचे वाद
  • मीरा–भाईंदरमध्ये जागावाटपावरून तणाव शिगेला
भाईंदर/ विजय काते : राज्यात नगरपालिकेच्या निवडणुकांचा रणसंग्राम सुरु अजून मीरा भाईंदरमध्ये महाविकास आघाडीत जागावाटपावरुन चढाओढ पाहायला मिळत आहे. मीरा–भाईंदर शहरात महायुती होताना दिसत नसल्याने राजकीय वातावरण आधीच तापले. अशातच आता महाविकास आघाडीमध्येही बिघाडी झाल्याचे चित्र दिसत आहे. जागावाटप, उमेदवारी आणि स्थानिक नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवरून आघाडीतील पक्षांमध्ये आरोप–प्रत्यारोप सुरू आहेत.

महाविकास आघाडीतील अन्य पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या जिल्हास्तरीय प्रतिनिधींवर मनमानी कारभार करत असल्याचा आरोप केला आहे. स्थानिक पातळीवर समन्वय न ठेवता एकतर्फी निर्णय घेतले जात असल्याने आघाडीतील नाराजी उघडपणे समोर येत आहे.

दरम्यान, मीरा–भाईंदरच्या राजकीय वर्तुळात आणखी एक गंभीर चर्चा रंगू लागली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या पदाधिकाऱ्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी दिली जात असल्याचा आरोप इतर पक्षांकडून केला जात आहे. यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये तीव्र अस्वस्थता पसरली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना मीरा–भाईंदरमध्ये केवळ १२ जागांवर उमेदवारीची मागणी करत आहे, तर काँग्रेसने २५ ते ३० जागांची मागणी केली आहे. दुसरीकडे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सुमारे ७० जागांवर दावा करण्यात आल्याची माहिती आहे. या असमतोल मागण्यांमुळे आघाडीतील तिढा अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे.

Aapla Dawakhana ठरला रुग्णांचा आधार, महिन्याला ३ लाख ८९ हजार रुग्णांनी घेतले उपचार

उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने आज संध्याकाळपर्यंत महाविकास आघाडीतील हा तिढा सुटतो की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, चर्चा निष्फळ ठरल्यास आघाडीला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इतकंच नव्हे तर, महाविकास आघाडीतील काही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून अशीही चर्चा बाहेर येत आहे की, शिवसेनेने मनमानी धोरण कायम ठेवले तर शिवसेनेला डावलून इतर राजकीय पक्ष एकत्र येऊन स्वतंत्रपणे आघाडी करून निवडणूक लढवू शकतात. त्यामुळे मीरा–भाईंदरच्या राजकारणात पुढील काही तास अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.

Mumbai Metro 3 : मुंबईकरांसाठी गुड न्यूज! थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मेट्रो ‘ॲक्वालाईन’ रात्रभर धावणार

Web Title: Mbmc election mahavikas aghadi in crisis tensions peak over seat sharing in mira bhayander

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 05:54 PM

Topics:  

  • Maharashtra elections

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.