sanjay raut targets bjp for taking name of aditya thackeray in disha salian
मुंबई : अभिनेता सुशांत सिंग रजपूत याची सिक्रेटरी दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पाच वर्षापूर्वी दिशा सालियन हिचा मृत्यू झाला होता. यामध्ये ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे नाव समोर येत होते. आता पुन्हा एकदा दिशा सालियन हिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. यामध्ये या प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा तसेच तिच्यावर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये ठाकरे गटाच्या नेत्यांची नावे समोर येत असल्यामुळे याबाबत खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
खासदार संजय राऊत मुंबईमध्ये यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दिशा सालियन प्रकरणावर मत मांडले आहे. हे ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्यासाठी असल्याचे देखील राऊत म्हणाले आहेत. ते म्हणाले की, “हे प्रकरण पुन्हा काही लोकांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे. जे प्रकरणच नव्हतं. त्या वडीलांचे जे म्हणणं आहे की त्यांच्यावर दबाव होता. खरंतर त्यांच्यावर आता दबाव आहे. हे प्रकरण तुम्ही नव्याने सुरू करा,” असा आता त्यांच्यावर दबाव असावा हे मला स्पष्ट दिसतंय,” असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “माझे असे विचार आहेत की एखाद्या मुलीवर अत्याचार झाले असतील तर तिचे आई वडील पाच वर्षे गप्प बसत नाही. हक्कासाठी आणि न्यायासाठी लगेच समोर येतात. मात्र हे पाच वर्ष गप्प बसले. पोलीस तपासाला सहकार्य करतात. पाच वर्षांनंतर त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्यावर दबाव होता, यावर तुम्ही कसा विश्वास ठेवणार आहात? या माध्यमातून ठाकरे कुटुंबाला आणि आमच्या संपूर्ण शिवसेना परिवाराला बदनाम करण्याचा सातत्याने जो प्रयत्न सुरू आहे तो स्पष्ट दिसतो आहे.” असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.
राज्यामध्ये औरंगजेब कबरवरुन मागील दोन आठवड्यापासून राजकारण सुरु आहे. मात्र यावरुन मुख्यमंत्र्यांच्याच नागपूरमध्ये दंगल झाली. यामुळे राज्यामध्ये वातावरण तापले. हाच मुद्दा मागे टाकण्यासाठी सरकारने हे प्रकरण पुन्हा एकदा उकरुन काढले असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. खासदार संजय राऊत यांनी देखील भाजपवर गंभीर आरोप केला आहे. खासदार राऊत म्हणाले की, “एका तरूण नेत्याच्या भविष्यावर अशा प्रकारे चिखल उडवणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. किती खालच्या स्तराला जायचं हे महाराष्ट्राच्या राजकारण्यांनी ठरवले पाहिजे,” असे मत खासदार संजय राऊत यांनी मांडले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे संजय राऊत म्हणाले की, “औरंगजेबाला साडे तीनशे-चारशे वर्षांनंतर कबरीतून बाहेर काढल्यानंतर अशा अनेक कबरी तुम्ही खोदत आहात त्या कबरीमध्ये तुम्हाला जावे लागेल. भारतीय जनता पक्षाचे राज्य आल्यापासून आणि भाजपामध्ये काही बाडगे गेल्यापासून एकनाथ शिंदेंनी पक्ष फोडल्यापासून त्यांचे जे अस्वस्थ आत्मे आहेत, त्यांच्या हाताला फारसं काही लागत नाही, त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात प्रतिष्ठा मिळत नाही, सत्ता आली तरी ते अस्वस्थ आहेत, त्यातून त्यांना या अशा कागळ्या सुचत आहेत,” अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.