BJP Politics : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोण? महाराष्ट्रातील 'या' नावाची जोरदार चर्चा सुरु

बिहार विधानसभा निवडणुकीत जदयू-भाजपच्या प्रचंड विजयानंतर ओडिशात आलेले केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे भव्य स्वागत करण्यात आले.
BJP Politics : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोण? महाराष्ट्रातील 'या' नावाची जोरदार चर्चा सुरु
BJP Politics : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोण? महाराष्ट्रातील 'या' नावाची जोरदार चर्चा सुरु (File Photo)
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यात जे. पी. नड्डा यांच्यानंतर भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असेल याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत जदयू-भाजपच्या प्रचंड विजयानंतर ओडिशात आलेले केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे भव्य स्वागत करण्यात आले. भुवनेश्वर विमानतळावर धर्मेंद्र प्रधान यांच्या जल्लोषी स्वागताच्या फोटोंमुळे भाजपने राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी या नवीन चाणक्यची निवड केल्याची अटकळ निर्माण झाली आहे.

धर्मेंद्र प्रधान सुरुवातीपासूनच या पदाच्या शर्यतीत आहेत. बिहारमध्ये पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या निवडणूक रणनीतीची अंमलबजावणी करून त्यांनी केवळ प्रचंड विजय मिळवला नाही तर बंगालसाठीही दिशा निश्चित केली. म्हणूनच धर्मेंद्र प्रधान यांना राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी एक प्रबळ दावेदार मानले जाते. बिहार निवडणुकीत एनडीएच्या प्रचंड विजयानंतर आणि भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आल्यानंतर, प्रधान ओडिशामध्ये पोहोचल्यावर विमानतळाबाहेर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

दरम्यान, बिहारमधील विजयानंतर, प्रधान यांनी भगवान जगन्नाथाचे दर्शन घेण्यासाठी पुरी मंदिराला भेट दिली. धर्मेंद्र प्रधान सध्या मोदी सरकारमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत. प्रधान यांच्याव्यतिरिक्त, महाराष्ट्राचे नेते विनोद तावडे यांचे नावही भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहे. धर्मेंद्र प्रधान हे ओडिसात मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. मात्र, पक्षाने मोहन मांझी यांची निवड केली.

पक्ष तरुण उमेदवारावर पैज लावण्याची शक्यता

बिहारच्या विजयापूर्वी आणि बंगालच्या निवडणुकीपूर्वी पक्ष तरुण उमेदवारावर पैज लावण्याची शक्यता आहे. विनोद तावडे ६२ वर्षांचे आहेत, तर मनोहर लाल खट्टर ७१ वर्षांचे आहेत. धर्मेंद्र प्रधान वयाच्या निकषावर इतर उमेदवारांना मागे टाकतात.

धर्मेंद्र प्रधान असतील तिसरे नेते 

जर धर्मेंद्र प्रधान भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष झाले, तर ते पक्षाच्या ३६ वर्षांच्या इतिहासात राष्ट्रीय शाखेचे नेतृत्व करणारे आणि नंतर भाजपचे अध्यक्ष होणारे तिसरे नेते असतील. सध्या, हा विक्रम राजनाथ सिंह आणि जे. पी. नड्डा यांच्या नावावर आहे. राजनाथ सिंह वयाच्या ३७ व्या वर्षी भाजप युवा मोर्चाचे प्रमुख झाले. त्यानंतर त्यांना दोनदा राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची संधी मिळाली, तर दुसरीकडे जे. पी. नड्डा यांचा भाजप अध्यक्ष म्हणून दीर्घकाळ कार्यकाळ आहे. कलराज मिश्रा यांना भाजप युवा मोर्चाचे पहिले अध्यक्ष होण्याचा मान आहे. ते वयाच्या ३७ व्या वर्षी या पदावर पोहोचले. उमा भारती वयाच्या ३५ व्या वर्षी युवा मोर्चाच्या प्रमुख झाल्या.