राज्याच्या राजकारणात भूकंपाचे; शिंदेंचे ३५ आमदार नाराज!
Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून महायुतीतील शिवसेना शिंदे गट व भाजपात संघर्ष सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील काही नेते व पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वावर नाराज आहेत. शिवसेनेच्या आमदारांनी देखील त्यांची नाराजी उघड केली आहे. अशातच शिंदे यांनी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. मात्र, या भेटीवेळी शाह यांनी शिंदे यांना जुमानले नाही.
भाजपा ऑपरेशन लोटस या मोहिमेअंतर्गत शिवसेनेचे (शिंदे) ३५ आमदार फोडणार आहे, असा दावा शिवसेना (उबाठा) पक्षाने केला आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाने म्हटले की, महाराष्ट्रात सध्या जे ‘नाराजी’ महानाट्यट्य चालू आहे, ते गांभीर्याने घेण्याची गरज नाही. उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीत अमित शाह यांना भेटले आणि त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची तक्रार केली, हे लोक आमचा पक्ष फोडत आहेत. चव्हाण पैशांचा वापर करून आमचे पदाधिकारी विकत घेत आहेत. हे






