Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पदवीधर निवडणुकीत NDA ची बाजी; पण महाराष्ट्रातील पराभव भाजपच्या जिव्हारी

महाराष्ट्रातील नागपूरचा पराभव हा फार सत्तारूढ पक्षाचा मोठा पराभव असल्याच्या बाता ठाकरेंपासून राहुल वगैरे सारे मारताहेत. पण ती जागा आधीही काँग्रेसकडेच होती. अभिजीत वंजारी हे मावळते आमदार होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 06, 2026 | 12:52 PM
पदवीधर निवडणुकीत NDA ची बाजी; पण महाराष्ट्रात भाजपला पराभवाचा झटका

पदवीधर निवडणुकीत NDA ची बाजी; पण महाराष्ट्रात भाजपला पराभवाचा झटका

Follow Us
Follow Us:
  • विधान परिषदांच्या द्वैवार्षिक निवडणुकांमध्ये NDAची बाजी
  • देशभरातील २८ जागांसाठी निवडणूक
  • महाराष्ट्रातील पाच जागांचा समावेश
विविध राज्यांतील विधान परिषदांच्या द्वैवार्षिक निवडणुका पार पडल्या. त्यातील पाच जागा महाराष्ट्रातील होत्या. देशभरातील 28 जागांची पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघांत ही निवडणूक पार पडली. त्यातील तेरा भारतीय जनता पक्षाने तर तीन त्यांच्या मित्रपक्षांनी अशा सोळा जागी एनडीएने विजय मिळवला आहे.

काँग्रेसला फक्त एका जागी विजय मिळाला. ती जागा महाराष्ट्रातील नागपूर पदवीधर ही आहे. उत्तर प्रदेशात या निवडणका महत्वाच्या एव्हढ्याच साठी होत्या की सुशिक्षित पदवीधर मतदारांवर काँग्रेससह विरोधी पक्षांनी सुरु केलेल्या, “ज्ञानू ब्रो! ” आंदोलनाचा कितपत परिणाम प्रत्यक्षात मतदारांवर झाला याचे ते मोजमाप होते. पुढच्या सहा महिन्यात उत्तरप्रदेशात नवे राज्य सरकार सत्तेत येईल. ते भाजपाचे असेल की समाजवादी पार्टीचे याची, चाचणी म्हणजे हे मतदान होते. त्यात भाजपाने 11 पैकी सहा जागा घेऊन संख्याबळ राखले असले तरी वाराणसी व लखनौमधील पराभव हा योगी मोदी शहांना बोचणारा नक्कीच आहे. तीच बाब पाटणातील पराभवाचीही आहे. थोडक्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय तसेच गडकरी व फडणवीसांचे मतदारसंघ असणाऱ्या नागपूरपासून ते पंतप्रधान मोदींचा मतदारसंघ वाराणसीपर्यंत, सुशिक्षित पदवीधर मतदारांनी भाजपाला धक्का दिला आहे.

त्याच वेळी कर्नाटकात जिथे काँग्रेसची सत्ता आहे तिथे विरोधी भाजपा जदयुने सर्व चारही जागा जिंकल्या, हा राहुल गांधींना सुशिक्षित मतदारांनी दिलेला संदेशच आहे. शिवाय या सर्व निवडणुका मतदान पत्रिकांवर घेतल्या जातात. यात निवडणूक यंत्रे वापरलीच जात नाहीत हेही विशेष. मतपत्रिकांवर निवडणुका घेऊन दाखवा असे विरोधकांचे आव्हान यामुळे आता हास्यास्पदच ठरेल.

महाराष्ट्रातील नागपूरचा पराभव हा फार सत्तारूढ पक्षाचा मोठा पराभव असल्याच्या बाता ठाकरेंपासून राहुल वगैरे सारे मारताहेत. पण ती जागा आधीही काँग्रेसकडेच होती. अभिजीत वंजारी हे मावळते आमदार होते. त्यांनीच ही जागा राखली. मात्र 2020 च्या वंजारींच्या विजयाच्या आधीच्या बहुतेक सर्व निवडणुकांमध्ये भजापाने ती जागा राखलेली होती ती आता गेलेली आहे.

मात्र वंजारींना त्यासाठी दुसऱ्या पसंतीच्या फेरीपर्यंत झगडावे लागले. पहिल्या फेरीत भजापाचे उमेदवार सुधाकर कोहळे आघाडीवर होते, ही फडणवीस व गडकरींसाठी थोडी दिसलासादायक बाब आहे. 28 पैकी रालोआकडे सोळा जागा गेल्या ही मोदींसाठी दिलासादायक बाब आहे. त्यांचे भागिदार एकनाथ शिंदेंची शिवसेना शिंदे, जनता दल युनायटेड (नीतीशकुमार) व जनता दल सेक्युलर (देवेगौडा) यांनी प्रत्येकी एक जागा घेतली. विरोधी इंडी आघाडी पैकी समाजवादी पार्टीने उत्तर प्रदेशात पाच, लालुंच्या राजदने बिहारमध्ये एक जागा घेतली, शरद पवारांच्या राकाँने महाराष्ट्रात दोन व तर काँग्रेसने फक्त एक जागा घेतली. या निवडणुकी आधी काँग्रेसकडे महाराष्ट्रातील दोन व कर्नाटकातील दोन अशा चार जागा होत्या. त्यांचे तीन जागांचे नुकसान यात झाले. बिहारमध्ये पाच, कर्नाटकात चार व महाराष्ट्रात तीन अशा बारा जागा लढूनही फक्त एका विजयावर राहुल सह ठाकरे नाचत आहेत ही यातली खरी गंमत आहे.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या लोकसभा मतदारसंघातील, पाटणा शिक्षक मतदारसंघात भाजपाचे पाच टर्म आमदार राहिलेले नवल यादव हरले आणि तिथे राजदचे कुमार जिंकले. प्रशांत किशोर यांच्या जन सुराजने दरभंगा शिक्षक मतदारसंघात विजय नोंदवला हे या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ठ्य ठरले. त्याच वेळी भाजपातून हकालपट्टी झालेले राहुल राज यांनी बिहारच्या सरन शिक्षक मतदारसंघात अपक्ष म्हणून विजय घेतला.

भाजपाला अंतर्गत कलहाचा फटका पुणे आणि नागपुरातही बसला यात शंका नाही. नागपूरमध्ये याच मतदारसंघाचे माजी आमदार अनिल सोले पक्षाकडे उमेदवारीचा दावा केला होता. मिळत नाही म्हटल्यावर त्यांनी बंड करून अपक्ष म्हणून अर्ज भरला. पण फडणवीसां बरोबरच्या चर्चेनंतर त्यांनी माघार घेतली खरी पण ती मुदतीत घेतली नाही. सहाजिकच मतपत्रिकेवर ते अपक्ष उमेदवार दिसतच होते. त्यांच्या समर्थकांपैकी पंधरा हजारांनी मतपत्रिका मुद्दाम बाद केल्याचा संशय आहे. कारण बाद झालेल्या मतपत्रिकांमध्ये पहिल्या पसंतीची मतेच दिली नव्हती. थेट दुसऱ्या पसंतीचे मतदान केले त्यात किमान दहा हजार मते कमळाची होती करण सुधाकरकोहळेंच्या नावांपुढे या बाद मतांवर क्रमांक दोन टाकलेला होता…! ती मते जर रीतसर कोहळेंकडे वळली असती तर ते पहिल्याच फेरीत विजयी जाहीर झाले असते.

कोहळे फक्त तीन हजारांच्या फरकाने हरले. काँग्रेसचे अभिजीत वंजारीं यांनी पहिल्या व दुसऱ्या फेरीत ६७ हजार २३१ मते पडली तर भाजपाचे सुधाकर कोहळेंना ६३९६० मते दोन्ही फेऱ्यांत मिळून पडली. नितेश कराळे हे इथले तिसरे तगडे उमेदवार होते. ते राष्ट्रवादी श.प. पक्षाचे होते. आघाडीमुले तायंना रा.काँचे तिकीट मिळणे शक्य न्वहते तायंनी बंड केले आणि तब्बल २६ हजार मते घेतली. त्यांची दुसऱ्या पसंतीची मते मोजली गेली ती भरली दहा हजार. त्यातून वंजारी यांना तब्बल आठ हजार मते मिळाली. तर भाजपाला दोन हजार मते मिळाली. शेवटी वंजारी हेही कोटा पूर्ण न करताच विजयी घोषित झाले.

या निवडणुकीमुळे राज्यातील महायुतीत मिठाचा मोठाच खडा पडला आहे. एकतर आधी जरांगेंनी फोडलेला टेप बाँब आणि आता पराभवाची बोच, यातून भाजपाचे प्रवक्ते आणि शिंदेंचे प्रवक्ते भांडताहेत. एकनाथ शिंदेंनी 2022 मध्ये ठाकरेंची साथ सोडल्यापासून त्यांचा व भजापाचा जो मनोमीलनाचा मधुर काळ सुरु होता तो आता संपल्याचे दिसते आहे. कटुता मोठ्या प्रमाणात वाढते आहे.

मंत्रींडळातील निर्णयांवरूनही रागवा रागवी होते आहे. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस हे शिक्षण असो वा परिवहन, शिंदेंच्या मंत्र्यांच्या निर्णयात बदल करत आहेत. त्याने रागावलेले सरनाईक आता थेट शिंदेंच्यावतीने आव्हानाची भाषा कराताहेत. नवनाथ बन हे संजय राऊतांना नडणारे भाजपा प्रवक्ते आता शिंदेंच्या धंगेकरांना अंगावर घेत आहेत. एकनाथ शिंदेंनी रवीन्द्र धंगेकरांसारखे आणखीही काही वावदुक वीर जमा केले आहेत. त्यांच्या विरोधात ते कारवाई वगैरे काही करत नाहीत. निवडणुकांत वारंवार हरणाऱ्या धंगेकरांप्रमाणे संभाजी नगरचे मंत्रीपद न मिळालेले अब्दुल सत्तार आणि परिषदेवर स्थान मिळवलेले अमरावतीचे बच्चु कडू असे काही वाचाळवीर शिंदेंकडे आहेत. भाजपाला झोंबणारे बोल ऐकवण्यासाठीच जणु शिंदेंनी त्यांना पदरी ठेवले आहे. धंगेकर व कडू हे अधुनमधून शिंदेंनाच राज्याचे मुख्यमंत्री केले पाहिजे असे बजावत असतात. सत्तार यांनी औरंगाबाद पदवीधरमध्ये राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांच्या विरोधात शरद पवारांच्या उमेदवाराला मदत केली.

एकेकाली पदवीधर व सिक्षक मतदारसंगांमध्ये भाजपाचे उमेदवार सहजतेने निवडून यायचे. आता मात्र विरोधकांचे प्राबल्य तिथे दिसते. विधान परिषदेच्या सात पदवीधर मतदारसंघांपैकी भाजपाकडे फक्त एक कोकणची निरंजन डावखरेंनी राखलेली जागा वगळता सर्व सहाही मतदारसंघ ठाकरे सेना, रा.काँशप व काँग्रेसकडे आहेत. मुंबई पदवीधरमध्ये ठाकरें सेनेचे अनिल परब सदस्य आहेत. नागपूरमध्ये अभिजीत वंजारी पुन्हा आले आहेत शेजारच्या अमरावतीत काँग्रेसचे धीरज लिंगाडे आहेतच. नासिकमध्ये काँग्रेसचे सत्यजीत तांबे हे अपक्ष लडून आमदार बनले आहेत. पुण्यात हर्षदा देशमुख जाधव (राष्ट्रवादी शरद पवार) व औरंगाबादमध्ये प्रतापसिंह पाटील रा.काँ.श.प हे दोघे आत्ता विजयी झाले आहेत.

सात पदवीधर आमदारांमध्ये दोन शप, दोन काँग्रेस, भाजप, शिवसेना ठाकरे व अपक्ष असे एकेक अशी मांडणी झाली आहे. अनेक ठिकाणी महायुतीचे घटक एकमेकांवर नारजाच होते. पुणे पदवीधरमध्ये अजितदादांचे सहकारी अरूण लाड हे आमदार होते. तिथे राष्ट्रवादी दादा गटा ऐवजी भाजपाचे कौस्तुभ गावडे लढले व जिंकले. इथे शिंदे सेनेने मैत्रीपूर्ण लढत दिली. अमरावतीत शिंदेंनी विद्यमान अपक्ष आमदार पक्षात घेतले व तिकीट दिले ते किरण सरनाईक जिंकले. पण त्यांना भाजपाची साथ नव्हती. औरंगाबादेत शिंदे सेनेचे आमदार उघडपणाने राष्ट्रवादी दादा गटाचे उमेदवार सतीश चव्हाणांना विरोध करत राहिले. चव्हाण पडले. असा साराच बेबनावाचा मामला होता.

  • अनिकेत जोशी.

FAQ

1. विधान परिषदांच्या द्वैवार्षिक निवडणुका किती जागांसाठी झाल्या?
देशभरातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील २८ जागांसाठी या निवडणुका झाल्या. त्यापैकी पाच जागा महाराष्ट्रातील होत्या.

2. NDA ने किती जागा जिंकल्या?
भाजपने १३ जागा, तर मित्रपक्षांनी ३ जागा जिंकल्या. त्यामुळे NDA ने एकूण १६ जागांवर विजय मिळवला.

3. काँग्रेसला किती जागा मिळाल्या?
काँग्रेसला केवळ एका जागेवर विजय मिळाला. ही जागा महाराष्ट्रातील नागपूर पदवीधर मतदारसंघाची आहे.

Web Title: Nda emerges victorious in graduate constituency elections but bjp suffers a setback in maharashtra nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 12:52 PM

Topics:  

  • Indian Political News
  • Maharashtra Legislative Council Election

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.