• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Politics »
  • Open Reservation For The Post Of Mayor In Karad Municipality

कराड नगरपालिकेत नगराध्यक्षपदासाठी खुले आरक्षण; राजकीय मोर्चेबांधणीस सुरुवात, नागरिकांमध्ये उत्सुकता

भारतीय जनता पार्टीकडून अद्याप नगराध्यक्षपदासाठी कोणाचेही नाव पुढे आलेले नाही. मात्र, ज्येष्ठ नेते विनायक पावसकर यांच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसानिमित्त नागरिकांसाठी विविध योजनांची घोषणा करण्यात आली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 07, 2025 | 11:02 AM
कराड पालिकेत नगराध्यक्षपदासाठी खुले आरक्षण

कराड पालिकेत नगराध्यक्षपदासाठी खुले आरक्षण (संग्रहित फोटो)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कराड : राज्यभरात प्रलंबित नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्या असून, नगराध्यक्षपदासाठीची आरक्षण सोडत सोमवारी (दि.6) झाली. यामध्ये कराड नगरपालिकेसाठी अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर खुल्या प्रवर्गाचे आरक्षण पडले आहे. यामुळे नगराध्यक्षपदासाठी खुल्या प्रवर्गातील इच्छुकांच्या समर्थकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. खुल्या प्रवर्गातून इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने पक्ष आणि स्थानिक आघाड्यांमधून नेमकी कोणती नावे पुढे येतात, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना न्यायालयाने स्थगिती दिली होती. दरम्यान, याबाबत न्यायालयाच्या निकालानंतर नगरपालिकांच्या प्रभाग रचना, त्यावरील हरकती मागवण्यात आल्या. तर सोमवारी नगराध्यक्षपदासाठीचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यामध्ये कराड नगरपालिकेत अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर खुल्या प्रवर्गाचे आरक्षण पडले आहे. त्यामुळे या प्रवर्गातील इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला. तसेच शहरातील काही भागात त्यांच्या समर्थकांनी फटाके फोडून आनंदही व्यक्त केला.

कराड नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी खुल्या प्रवर्गातून माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव हे दावेदार मानले जात आहेत. नगराध्यक्षपदासाठी खुल्या प्रवर्गाचे आरक्षण पडल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी फटाके फोडून आपला आनंद व्यक्त केला आहे. नुकत्याच झालेल्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील अनेक ठिकाणी भावी नगराध्यक्ष, शहर कुटुंबप्रमुख अशा आशयाचे शुभेच्छा फलक लागले होते. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी खुल्या प्रवर्गातील आरक्षण पडण्याआधीच त्यांनी व त्यांच्या समर्थकांनी नगराध्यक्षपदावर आपली दावेदारी सांगितली होती.

तर दुसरीकडे माजी उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील हेही नगराध्यक्षपदाचे दावेदार आहेत. त्यांना मानणारा मोठा गट असून, त्यांची कराड दक्षिणचे विद्यमान आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्याशी वाढती सलगी पाहता नगरपालिकेसाठी नेमके काय समीकरण समोर येणार आहे, याची नागरिकांना उत्सुकता लागून राहिली आहे.

तसेच भारतीय जनता पार्टीकडून अद्याप नगराध्यक्षपदासाठी कोणाचेही नाव पुढे आलेले नाही. मात्र, ज्येष्ठ नेते विनायक पावसकर यांच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसानिमित्त नागरिकांसाठी विविध योजनांची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे खुल्या प्रवर्गातून नगराध्यक्ष पदासाठी विनायक पावसकर यांचे नाव पुढे आल्यास, आश्चर्य वाटणार नाही.

त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडूनही अद्याप नगराध्यक्षपदासाठी कोणाच्याही नावाची चर्चा सुरू असल्याचे प्रकर्षाने समोर आलेले नाही. मात्र, राष्ट्रवादीकडे अभ्यासून नेतृत्व, माजी नगरसेवक सौरभ पाटील यांचेही नाव ऐनवेळी पुढे येण्याची शक्यता आहे. दरम्यान, या दोन्ही पक्षांची रणनीती नेमकी काय असेल, नगराध्यक्षपदासाठीचा चेहरा कोण असेल, याबाबतही नागरिक, कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.

मलकापुरात अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण

मलकापूर नगरपालिकेत नगराध्यक्षपदासाठी अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण पडले आहे. त्यामुळे या ठिकाणी खुल्या प्रवर्गातून इच्छुक असलेल्या मातब्बरांसह अनेकांच्या पदरी निराशा पडल्याचे दिसून आले. भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी कोणाचे नाव समोर येणार, याबाबत नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. तर काँग्रेसकडून कोणते नाव समोर येणार हेही पाहणे तितकेच औचित्याचे ठरणार आहे.

Web Title: Open reservation for the post of mayor in karad municipality

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2025 | 11:02 AM

Topics:  

  • Karad news
  • political news
  • Reservation Issue

संबंधित बातम्या

Political News : “चीनला उत्तर देण्याची वेळा आली तेव्हा..; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर जोरदार टीकास्त्र
1

Political News : “चीनला उत्तर देण्याची वेळा आली तेव्हा..; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर जोरदार टीकास्त्र

सभापतीपदासाठी जोरदार लॉबिंग; राष्ट्रवादीकडे स्पष्ट बहुमत; आमदार राजेश विटेकर घेणार अंतिम निर्णय
2

सभापतीपदासाठी जोरदार लॉबिंग; राष्ट्रवादीकडे स्पष्ट बहुमत; आमदार राजेश विटेकर घेणार अंतिम निर्णय

Hingoli News : लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचे आंदोलन! हिंगोली जिल्हा परिषद, पंचायत समितीचे कामकाज ठप्प
3

Hingoli News : लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचे आंदोलन! हिंगोली जिल्हा परिषद, पंचायत समितीचे कामकाज ठप्प

Maharashtra Politics : तब्बल ४८१ रिक्त पदांमुळे महापालिकेत प्रभारीराज; बिंदू नामावलीचा ठोस आराखडा असणे गरजेचे
4

Maharashtra Politics : तब्बल ४८१ रिक्त पदांमुळे महापालिकेत प्रभारीराज; बिंदू नामावलीचा ठोस आराखडा असणे गरजेचे

ताज्या बातम्या

पुढे वाचा
आयुष्य हे एक मोठा शिक्षक….!  स्वप्नांना बळ देण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी वाचायला हवेत ‘हे’ प्रेरणादायी सुविचार

आयुष्य हे एक मोठा शिक्षक….! स्वप्नांना बळ देण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी वाचायला हवेत ‘हे’ प्रेरणादायी सुविचार

Feb 25, 2026 | 05:30 AM
Job Alert : विविध क्षेत्रात भरती! देशात या प्रमुख कंपन्या देत आहेत रोजगाराची संधी

Job Alert : विविध क्षेत्रात भरती! देशात या प्रमुख कंपन्या देत आहेत रोजगाराची संधी

Feb 25, 2026 | 04:15 AM
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त FC कॉलेजमध्ये विशेष कार्यक्रम; स्मृतीस्थळ दर्शनासाठी राहणार खुले

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त FC कॉलेजमध्ये विशेष कार्यक्रम; स्मृतीस्थळ दर्शनासाठी राहणार खुले

Feb 25, 2026 | 02:35 AM
शर्ट काढून काँग्रेसचे विचित्र आंदोलन; भारत मंडमपमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रणकंदन

शर्ट काढून काँग्रेसचे विचित्र आंदोलन; भारत मंडमपमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रणकंदन

Feb 25, 2026 | 01:15 AM
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तिजोरीची चावी कोणाकडे? ‘या’ तारखेला होणार फैसला

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तिजोरीची चावी कोणाकडे? ‘या’ तारखेला होणार फैसला

Feb 25, 2026 | 12:30 AM
Nuclear War ची टांगती तलवार? रशिया, अमेरिका आणि चीनच्या ‘त्या’ गुप्त बैठकीने खळबळ; भारताचं टेन्शन वाढणार?

Nuclear War ची टांगती तलवार? रशिया, अमेरिका आणि चीनच्या ‘त्या’ गुप्त बैठकीने खळबळ; भारताचं टेन्शन वाढणार?

Feb 24, 2026 | 11:20 PM
लज्जास्पद! एकट्या Harry Brook ने लावली पाकिस्तानची वाट, T20 World Cup मधील अद्भुत शतक, PAK हरले

लज्जास्पद! एकट्या Harry Brook ने लावली पाकिस्तानची वाट, T20 World Cup मधील अद्भुत शतक, PAK हरले

Feb 24, 2026 | 10:36 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM
Latur Unseasonal Rainfall : अवकाळी पावसात घराचे पत्रे उडाले ,मूकबधीर कुटुंबाची दैना

Latur Unseasonal Rainfall : अवकाळी पावसात घराचे पत्रे उडाले ,मूकबधीर कुटुंबाची दैना

Feb 24, 2026 | 07:43 PM
शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

Feb 24, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.