राजकीय पातळीवर या आरक्षणामुळे सर्वच पक्षांनी आता महिला नेतृत्वावर अधिक भर देण्याची गरज भासणार आहे. अनेक ठिकाणी पुरुष इच्छुकांना मागे हटावे लागणार असून महिला उमेदवारांना संधी मिळणार आहे.
आरक्षणानुसार, अनुसूचित जाती, मागासवर्गीय आणि सर्वसाधारण अशा सर्व गटांमध्ये महिलांना समान संधी देण्यात आली आहे. यंदाच्या सोडतीत सामाजिक न्यायाचे उत्तम संतुलन राखण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
भारतीय जनता पार्टीकडून अद्याप नगराध्यक्षपदासाठी कोणाचेही नाव पुढे आलेले नाही. मात्र, ज्येष्ठ नेते विनायक पावसकर यांच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसानिमित्त नागरिकांसाठी विविध योजनांची घोषणा करण्यात आली होती.