माझ्यावर जनतेने टाकलेला विश्वास २३ तारीखला दिसेल, नितेश राणे यांचं वक्तव्य
सिंधुदुर्ग /भगवान लोके: “मतदान करणं ही देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे”, याचं भान राखत जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरीक, महिला, पुरुष, दिव्यांग व्यक्तीं, नवमतदार यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविताना दिसून आले. सर्व मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. पिण्याचे पाणी, मंडप किंवा शेड, मतदार सहाय्य्यता केंद्र, प्रथमोपचार पेट्या, तसेच आरोग्याशी संबंधित अडचणीसाठी आरोग्य केंद्र, अंगणवाडी व बालसंगोपन केंद्र, व्हीलचेअर या सह सर्व प्रकारच्या पूरक सोयी सुविधा जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध करुन दिल्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी समाधान व्यक्त केले.
मतदारांचा कौल कुणाला? Exit Poll चे अंदाज लवकरच, ओपिनियन पोलपेक्षा किती वेगळे? जाणून घ्या एका क्लिकवर
याचपार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. राणे म्हणाले की, लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे निवडणूक आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सकाळपासुन ते शेवटपर्यंत उत्साह पाहील्यानंतर मुंबईचे चाकरमानी असो किंवा या मतदार संघातील शेवटच्या गावातील मतदार असो. प्रत्येकांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान केले आहे. हे आम्हा सर्वांना अपेक्षीत होत. जेवढे जास्त मतदान होते, तेवढा जास्त लोकशाहीचा विश्वास पक्का होतो. निश्चीतपणे २३ तारीखला त्यावर शिक्कामोर्तब झालेला असेल. माझ्यावर जनतेने टाकलेला विश्वास २३ तारीखला दिसेल, अशी प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी दिली आहे. वरवडे फणसनगर येथील प्राथमिक शाळा मतदान केंद्रावर कणकवली विधानसभा महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांनी आपल्या मतदानाचा हक्क सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास बजावला आहे.
…अन् मतदान केंद्रावर सोडला प्राण, अपक्ष उमेदवाराचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू
आमदार नितेश राणे म्हणाले, मला तर विश्वास आहे की, मतदानाचा उच्चांक वाढेल. मला समाधान वाटतं की, कानाकोपऱ्यातील आमचे कार्यकर्ते मतदारांना जागृत करण्याचे काम करत होते. त्या कार्यकर्त्यांनी गावागावात बैठका घेवुन मेहनत घेतली आहे. त्याला लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. शेवटी एकच टप्यात ही निवडणुक होत आहे. मला समाधान वाटते की, ज्यासाठी असंख्य परिवारातील कार्यकर्त्यांनी गावोगावी बैठका घेवून मतदानाचा हक्क बजावला, तसेच जास्तीत जास्त मतदान झालेले आहे. लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. लोकांची सेवा 10 वर्ष प्रामाणिक मी करत आलेलो आहे. त्याची जाणीव मतदारांना आहे. माझ्या मतदार संघातील २६३ गावाचा विकास झाला पाहीजे, या हेतुने काम करत आहे. त्यांचा विश्वास मतदारानी दाखविलेला विश्वास २३ तारीखला पोहचेल. त्यामुळे मी पुर्णपणे समाधानी असल्याचे त्यांनी म्हटले.
जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघात आज सकाळी मतदानास सुरुवात होताच शहरासह ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी स्वत: रानबांबुळी, कुडाळ हायस्कूल, न्यू इंग्लिश स्कूल, येथील आणि इतर अन्य मतदान केंद्राला भेट देवून केंद्रांची पाहणी केली. यावेळी त्यांनी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, बंदोबस्तावरील पोलीसांना आवश्यक त्या सूचना दिल्यात. स्वत: जिल्हाधिकारी अनिल पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या वेबकास्टिंगच्या माध्यमामातून जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रांसह संपूर्ण मतदान प्रकियेवर बारकाईने लक्ष ठेवून होते.