Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP Protest Against Gyanesh Kumar Live: फडणवीस साहेब या महाराष्ट्राचा वारसा विसरू नका’; अभिजीत दिपकेंचे आवाहन

CJP Protest Against Gyanesh Kumar Live: जर गांधी या देशाचा आत्मा आहेत तर आंबेडकर या भारताच्या पाठीचा कणा आहेत. तर जवाहरलाल नेहरू हे देशाचे मन आहेत. त्यांच्याशी तुमची तुलना होऊच शकत नाही. पण हे लोक आज काय करत आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 02, 2026 | 05:53 PM
CJP Protest Against Gyanesh Kumar Live: फडणवीस साहेब या महाराष्ट्राचा वारसा विसरू नका’; अभिजीत दिपकेंचे आवाहन
Follow Us
Follow Us:
  • ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी २ ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्कात CJP चे आंदोलन.
  • हक्कांसाठी लढणे हीच महात्मा गांधींना खरी श्रद्धांजली – अभिजित दीपके यांचे विधान.
  • इंग्रजांपेक्षा संघी लोकांनी देशवासीयांना जास्त त्रास दिल्याचा अभिजित दीपकेंचा गंभीर आरोप.
 

CJP Protest Against Gyanesh Kumar Live: या आंदोलनातून महात्मा गांधींना सर्वात मोठी श्रद्धांजली आहे. आपल्या अधिकारांसाठी लढणं हेच गांधींजींना वंदन  आहे.  महात्मा गांधी यांना इंग्रजांनी जितका त्रास दिला नव्हता, इतका त्रास या संघी लोकांनी आपल्याला दिला आहे. पण गांधी कधी मरू शकत नाही, गांधी या देशाचा आत्मा आहे. अशी टिका सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी केली आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी CJPकडून मुंबईत आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या गेट क्रमांक ६ जवळ सीजेपीने आज (२ ऑक्टोबर) पासून आंदोलन सुरू झाले आहे.

CJP Protest Shivaji Park Live: ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी शिवाजी पार्कवर तरुणांचा लोंढा; दादरमध्ये तणाव

अभिजीत दिपके म्हणाले की,  गोडसेंसारखे हजारो लोक येतील आणि जातील, गोडसेसारखे लोक भित्रे आहेत. पण गांधी या देशाचा आत्मा आहे. हा देश गांधींच्या विचारांचा आहे. गोडसेंच्या विचारधारेच्या लोकांना मी सांगू इच्छितो की , गांधींना कोणी संपवू शकत नाही. पण कोणीतरी येऊन सांगेन की, पण एक महाभाग स्वत:ला नॉनबायोलॉजीकल म्हणवतो, आम्हाला माहितीये तुम्ही माणूस नाही आहात.  गांधी, नेहरू, आंबेडकर यांच्याशी तुलना करण्याची यांची लायकी पण नाही. गांधी कधीही संपणार नाही.

जर गांधी या देशाचा आत्मा आहेत तर आंबेडकर या भारताच्या पाठीचा कणा आहेत. तर जवाहरलाल नेहरू हे देशाचे मन आहेत. त्यांच्याशी तुमची तुलना होऊच शकत नाही. पण हे लोक आज काय करत आहेत. निवडणूक जिंकून तुम्ही त्यांच्याहून मोठे होऊ शकत नाहीत. गांधी, नेहरू, आंबेडकर हे देशासाठी त्याग करून, आंदोलने करून मोठे झाले होते. ज्यांना त्यांचे अधिकारही माहिती नव्हते त्यावेळी यांनी त्या लोकांना त्यांचे अधिकार दिले. पण आजचे हे सरकार देशातील नागरिकांचे अधिकार हिसकावू लागले आहेत.  तुम्ही देशाला अजून किती लुटणार आहात. नोटबंदी, कोरोना मध्ये देशातील नागरिकांना रस्त्यावर रांगेत उभे केले, अशी टिकाही दिपके यांनी केली.

Abhijeet Dipke Viral Video: ‘चला, चहा घेऊ…’ म्हणत मुंबई पो

यावेळी बोलताना ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. प्रोटेस्टला जाल तर तीन दिवस जेलमध्ये जावे लागेल,   तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात. या महाराष्ट्राला एक पंरपरा आहे. फडणवीस साहेब या महाराष्ट्राचा वारसा विसरू नका.  तुम्ही विसरले असाल आम्ही नाही. फडणवीस साहेब तुम्हाला आम्हाला जेलमध्ये टाकायचं होतं ना. आता टाका आम्हाला जेलमध्ये. असे आव्हानही त्यांनी राज्य सरकारला दिले.

या देशात जनता सरकारची निवड करते. पण या नॉनबायोलॉजिकल महामानवाच्या मते, सरकार ठरवणार त्यांचे मतदार कोण असतील आणि नसतील. पण हेच जर आधीच्या सरकारने केले असते तर तुम्ही आजही चहाच्या दुकानात चहा विकला असता.

 

Web Title: Politicsabhijeet dipke statement on gyanesh kumar resignation protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 05:51 PM

Topics:  

  • abhijeet dipke

संबंधित बातम्या

CJP Protest Shivaji Park Live: ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी शिवाजी पार्कवर तरुणांचा लोंढा; दादरमध्ये तणाव
1

CJP Protest Shivaji Park Live: ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी शिवाजी पार्कवर तरुणांचा लोंढा; दादरमध्ये तणाव

Cockroach Janta Party Protest: शिवाजी पार्कमध्ये आवाज घुमणार! ज्ञानेश कुमारांविरोधात सीजेपीचे आजपासून ‘जेलभरो’ आंदोलन
2

Cockroach Janta Party Protest: शिवाजी पार्कमध्ये आवाज घुमणार! ज्ञानेश कुमारांविरोधात सीजेपीचे आजपासून ‘जेलभरो’ आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.