Bihar Election 2025: 'राहुल गांधींचे जे हाल झाले तेच...'; प्रशांत किशोर थेट तेजस्वी यादवांना आव्हान देणार?
प्रशांत किशोर यांनी जाहीर केली उमेदवारांची यादी
बिहारमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार
जन सुराज पक्ष देखील लढणार निवडणूक
बिहारमध्ये विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. दोन टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 14 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. एनडीए आणि अन्य विरोधी पक्ष अशी मुख्य लढत आहे. तरी बिहारमध्ये ता आणखी एक पक्ष निवडणूक लढणार आहे. तो म्हणजे प्रशांत किशोर यांचा जन सुराज पक्ष. दरम्यान आता प्रशांत किशोर हे देखील निवडणूक लढण्याची शक्यता आहे. राघोपूर मतदारसंघातून ते लढण्याची शक्यता आहे.
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर म्हणाले, “मी राघोपूरला जाणार आहे. तिथे जाऊन मी नागरिकांना भेटणार आहे. राघोपूरची जनता जो निर्णय घेईल तो मी मान्य करणार आहे. तेजस्वी यादव यांना निवडणूक लढण्यासाठी दुसरी जागा शोधावी लागेल. त्यांची परिस्थिती देखील राहुल गांधी यांच्यासारखी होईल. त्यांना देखील अमेठी सोडून वायनाडला जावे लागले होते.”
काय म्हणाले प्रशांत किशोर?
उद्या आमच्या पक्षाची बैठक होणार आहे. ज्यामध्ये राघोपूर आणि अन्य जागांवर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. माझे राजकारण जनतेच्या मतावर अवलंबून आहे. त्यांच्या निर्णयाशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. नितीश कुमार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असतील मी देखील निवडणुकीच्या मैदानात उतरणार, असे प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केले होते.
राघोपूर हा तेजवी यादव यांचा गड समजला जातो. राजद पक्षाचे प्रमुख लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव यांचे राघोपूर मतदारसंघाशि जवळचे नाते आहे. प्रशांत किशोर जर देखील या मतदारसंघातून निवडणूक लढणार असले तर, तेजस्वी यादव यांच्यासाठी ही निवडणूक कठीण जाऊ शकते.
बिहार निवडणुकीदरम्यान PM मोदी निवृत्त होणार?
आज बिहार काँग्रेसची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ‘२० वर्ष विनाशाची’ चार्जशीट प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये नितीश कुमार यांच्या २० वर्षांचा कार्यकाळ मांडण्यात आला. यामध्ये एनडीए सरकारवर आरोप करण्यात आले. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी पत्रकार परिषद घेतली. भूपेश बघेल म्हणाले, ‘भाजप ७५ वर्षांवरील लोकांना निवृत्त करते. मोदी यांनी अडवाणी आणि जोशी यांना निवृत्त केले. आता मोदी स्वतः ७५ वर्षांचे झाले आहेत.” भूपेश बघेल यांच्या विधानामुळे पंतप्रधान मोदी यांच्या निवृत्तीचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.