Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! मोदी सरकारमधील बड्या मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला; ‘त्या’ फोटोमुळे अडचणींत वाढ?

काँग्रेसने म्हटले की, केंद्र सरकारला हे सांगावेच लागेल की हा फोटो चुकीचा आहे की बरोबर. चुकीचा असेल तर विरोध दर्शवणारे पत्र जारी करावे आणि बरोबर असेल तर पुरी यांचा राजीनामा घेण्यात यावा.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 24, 2026 | 07:54 AM
पेट्रोलियममंत्री हरदीप पुरींवर राजीनाम्याचा दबाव वाढला

पेट्रोलियममंत्री हरदीप पुरींवर राजीनाम्याचा दबाव वाढला

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच पेट्रोलियममंत्री हरदीप पुरी यांना मंत्रिपदावरून हटवण्याचा दबाव मोदी सरकारवर सातत्याने वाढत चालला आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ मुंबईत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेत असतानाच, अमेरिकेतील कुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीन सोबतचा त्यांचा फोटो अलीकडेच व्हायरल झाला. काँग्रेसने यावरुन भाजपवर निशाणा साधला आहे.

ज्या दिवशी आपल्या परराष्ट्रमंत्र्यांशी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री भेटत होते, त्याच दिवशी अमेरिकेच्या न्याय विभागाने पुरी आणि एपस्टीन यांच्या एकांतातील भेटीचा फोटो व्हायरल करून कोणाला ब्लॅकमेल केले? अमेरिकेने कोणाला राजकीय धमकी किंवा संदेश दिला हे समजण्यासारखे आहे. परंतु, या फोटोने हे स्पष्ट झाले की, पुरी आणि एपस्टीन यांच्यात मैत्री होती आणि त्यांच्या भेटीगाठी होत राहिल्या आहेत, असे काँग्रेसने म्हटले. तसेच, हरदीप पुरी यांचा आपण कधीही एपस्टीनला वैयक्तिकरीत्या किंवा एकांतात भेटलो नाही, हा दावा खोटा असून, असे असेल तर केंद्र सरकारने अमेरिकेला अशा प्रकारची खोटी छायाचित्रे प्रसिद्ध केल्याबद्दल नोटीस का पाठवली नाही? असा सवाल काँग्रेसने केला.

PM Modi : हैदराबाद हाऊसमध्ये मोदी-टस्क भेट, व्यापार 6 वरून 10 अब्ज डॉलरवर नेणार; पोलंडच्या पंतप्रधानांचा महत्त्वाचा भारत दौरा

काँग्रेससह सपाचाही हल्लाबोल

काँग्रेसशिवाय तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षानेही सरकारवर हल्ला चढवला आहे. या प्रकरणात पंतप्रधान मोदी यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले पाहिजे, असे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना पंतप्रधान कोणत्या भीतीपोटी पुरी यांना मंत्रिमंडळात कायम ठेवून आहेत, असा सवाल विरोधकांनी उपस्थितीत केला.

…तर बाकीचे सदस्य कुठंय?

टीएमसी खासदार महुआ मोइत्रा म्हणाल्या की, पुरी म्हणाले की ते एपस्टीनला तीन-चार वेळा शिष्टमंडळासोबत भेटले होते, मग दोन्ही फोटोंमध्ये बाकीचे सदस्य कुठे आहेत? पुरी यांच्याकडे असे कोणते गुपित आहे, हे पंतप्रधानांनी स्पष्ट केले पाहिजे.

केंद्र सरकारने स्पष्टीकरण द्यावे

काँग्रेसने म्हटले की, केंद्र सरकारला हे सांगावेच लागेल की हा फोटो चुकीचा आहे की बरोबर. चुकीचा असेल तर विरोध दर्शवणारे पत्र जारी करावे आणि बरोबर असेल तर पुरी यांचा राजीनामा घेण्यात यावा. सोळा वर्षांच्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या व्यक्तीशी मैत्री ठेवणाऱ्या व्यक्तीला मंत्रिमंडळात ठेवून पंतप्रधान कोणत्या विशिष्ट संस्कृतीचा संदेश देत आहेत?

पुरी पदावर कायम राहणार?

हा दबाव अशा वेळी येत आहे, जेव्हा भाजप पुरी यांना पुन्हा एकदा मध्य प्रदेशातून राज्यसभेवर आणण्याबाबत विचार करत आहे. पश्चिम आशियातील संकटाच्या वेळी पुरी यांनी देशात ऊर्जा सुरक्षा कायम ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे जगात तेल संकट कायम असल्याने त्यांना पदावर कायम ठेवण्यात येऊ शकते.

FAQ

हरदीप पुरींवर राजीनाम्याचा दबाव का वाढला? Epstein फाईल्स काय आहे?
– दोन कारणांनी दबाव वाढला. Epstein Files वाद – फेब्रुवारी 2026 पासून सुरु आहे. अमेरिकेच्या Department of Justice ने Jeffrey Epstein संबंधित फाईल्स प्रसिद्ध केल्या. त्यात हरदीप पुरी यांचे नाव आणि ईमेल असल्याचा दावा.

भाजपने राज्यसभा तिकीट का नाकारले? आता राजीनामा द्यावा लागणार का?
– 5 ऑक्टोबर 2026 – भाजपने UP राज्यसभेची 8 नावांची यादी जाहीर केली – त्यात हरदीप पुरी यांचे नाव नाही – त्यांची टर्म 25 नोव्हेंबर 2026 रोजी संपत आहे.

विरोधकांची नेमकी मागणी काय?
– विरोधक (Congress, TMC, SP) निदर्शने करत आहेत. “Who’s grip, who’s choke” “तात्काळ राजीनामा, स्वतंत्र चौकशीची मागणी सुरु आहे.

Web Title: Pressure from the opposition for hardeep singh puri resignation has intensified nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 07:54 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.