Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“उद्धव ठाकरे यांनी केवळ मुख्यमंत्री होण्यासाठी…. “; रावसाहेब दानवेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल

अहिल्यानगर जिल्ह्यात महायुतीच्या प्रचारसभेत रावसाहेब दानवेंनी कडव्या शब्दांत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 10, 2024 | 02:05 PM
"घरी बसून चालणारे सरकार नको तर जनतेत मिसळणारे सरकार सत्तेवर आणा"; रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल

"घरी बसून चालणारे सरकार नको तर जनतेत मिसळणारे सरकार सत्तेवर आणा"; रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल

Follow Us
Close
Follow Us:

अहिल्यानगर  / गिरीश रासकर : विधानसभा निवडणूकीसाठी सर्वच पक्ष आता राज्यभर प्रचारसभा घेत आहे. या प्रचारसभेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्यासाठी सगळ्याच नेत्यांची जोरदार तयारी सुरु आहे. अशातच आता राहुरी विधानसभा मतदार संधात सभा घेत महायुतीचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी जनतेशी संवाद साधला आहे.भेत रावसाहेब दानवे म्हणाले की, ” राज्यात 2019 मध्ये जनतेने भाजप-शिवसेना युतीला सत्ता दिली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी केवळ मुख्यमंत्री होण्यासाठी जनादेश नाकारून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली”. मुख्यमंत्री म्हणून काम करताना त्यांनी शेतकरी, जनतेच्या हिताचा एकही निर्णय घेतला नाही. कोविड काळात जनतेचे हाल होत असताना भाजपचे नेते रस्त्यावर उतरून लोकांना मदत करत होते. शेतकऱ्यांच्या बांधावर जात होते. त्यावेळी उद्धव ठाकरे मातोश्रीवर बसून माझे कुटुंब, माझी जबाबदारी म्हणत होते.

पुढे ते असंही म्हणाले की,  देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 2014 मध्ये सरकार आल्यावर विकासाला चालना मिळाली . या विकास प्रक्रियेला राज्यात महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळात खीळ बसली. आता मात्र भाजप महायुतीला बहुमताने विजयी करून शिवाजीराव कर्डिले यांच्या सारखा जनतेसाठी अहोरात्र काम करणारा आमदार राहुरी मतदारसंघातून विधानसभेवर पाठवा असे आवाहन भाजप नेते, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी केले.

हेही वाचा-कल्याण पश्चिमेत वाहतूक कोंडी सोडण्यासाठी सचिन बारसेंना निवडून द्या ! शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंचे आवाहन

राहुरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत रावसाहेब दानवे पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, आदींसह वांबोरी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दानवे पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा खरा लाभ मोदी सरकार आल्यावर मिळू लागला. शेतकरी सन्मान योजना राबवून शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजार रुपयांची मदत दिली जाते. महिलांसाठी लाडकी बहिण योजना राबवून राज्यातील महायुती सरकारने महिला भगिनींना सन्मान केला आहे. भाजप जनहिताचे निर्णय घेत असताना महाविकास आघाडीकडून चांगल्या योजनांना खीळ बसवण्याचे काम होत आहे. आज दिल्लीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मजबूत सरकार आहे. राज्यातही त्याच विचारांचे सरकार नक्की येईल असा दावा दानवे यांनी केला.

हेही वाचा-“योजना फसवी आहे म्हणता मग तुम्हीच अधिकचे पैसे महिलांना का देता”?; विखे पाटलांचा विरोधकांना टोला

दरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, महायुती आणि महाविकास आघाडीच्या सरकारची तुलना केली तर महायुती सरकारच्या काळातील चांगले काम सहज दिसून येईल. आम्ही ‘लाडकी बहिण योजना’ सुरू केली तर महाविकास आघाडी योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेली. त्यामुळे आता ते मत मागायला तुमच्या दारात आले तर बहिणींनी त्यांना उभे सुद्धा करू नये. त्यांच्या सरकारच्या काळात जिल्ह्याला तीन मंत्री होते. एकालाही राहुरी तालुका किंवा जिल्ह्यात‌ एखादी मोठी योजना आणता आली नाही. त्यामुळे यावेळी महायुतीच्या हातात स्पष्ट बहुमताची सत्ता द्यावी असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले म्हणाले, ‘मी उमेदवारी अर्ज भरल्यापासून सर्वसामान्य जनतेमध्ये असलेला उत्साह गर्दीतून दिसून येत आहे. वांबोरी येथे तर विक्रमी संख्येने मतदार आले आहेत. त्यामुळे माझा विजय निश्चित असून राहुरी तालुक्यातील मतमोजणीतच मी विजयी होईल. खरं तर मागील वेळी ज्यांना संधी मिळाली ते आपल्या कामाचा ठसा उमटवू शकले नाहीत. माझ्या काळात मंजूर झालेल्या योजनांमध्ये आडकाठी आणली गेली. त्यामुळे राहुरी शहर व तालुक्यात विकासकामे झाली नाहीत’. ऊस उत्पादकांना योग्य भाव दिला नाही, ‌शेजारच्या प्रवरा कारखान्याने 3200 रुपये भाव देऊन शेतकऱ्यांची खरी काळजी कोण घेतो हे दाखवून दिले. आतापर्यंत जी काही विकासकामं झाली ती कोणत्या सरकरच्या काळात झाली हे जनतेचा चांगलच माहित आहे. त्यामुळे कोणत्या सकराला निवडून आणावं हे सर्वस्वी जनतेच्या हातात आहे. असं वक्तव्य शिवाजीराव कर्डिले यांनी केलं आहे.

Web Title: Raosaheb danve has criticized uddhav thackeray in bitter words at the campaign meeting of mahayuti in ahilyanagar district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2024 | 02:04 PM

Topics:  

  • Maharashtra Asselbly Election 2024
  • Raosaheb Danve

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.