राजकारणात मोठा भूकंप होणार? देवेंद्र फडणवीस उपपंतप्रधान होणार; बड्या नेत्याचे खळबळजनक विधान
या देशातील राजकीय हवा बदलाला सुरुवात झाली आहे. नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानपदी राहत नाहीत, मोदी-शहांची अवस्था संघपरिवारात अत्यंत वाईट आहे. जर ते त्या पदावर राहिले तर त्यांना संपूर्ण सरकारच बदलावं लागेल. मोदी-शहांची अवस्था त्यांच्या पक्षात आणि संघात अत्यंत वाईट आहे. संघाला त्यांच ओझं झाल आहे. देशाला आणि भापला तर आधीच झालं आहे. पण आता संघालाही झालं आहे. सर्वच बाजूंनी त्यांचा द्वेष करत आहेत. मोदींना जावं लागेल, त्याआधी ज्ञानेश कुमारही गेले असतील.
भूकंप होण्याआधी भूगर्भातून आधी छोटेमोठे धक्के बसतात, खाटा हलतात, पंखे हलतात. तसे आता देशात आणि भाजपच्या अंतर्गत सध्या तेच सुरू झालेत. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीत फार मोठे भूकंपाचे धक्के राजकाणामध्ये बसतील. पं असं सूचक विधान संजय राऊत यांनी केलं आहे.
कोणी कितीही नाही म्हणल तरी, फडणवीस यांना उपपंतप्रधान म्हणून जागा मिळावी, तेच मोदींचे वारसदार असावे, अशी भूमिका भाजप आणि संघात वरिष्ठ स्तरावर सुरू आहे. संघात तशी चर्चा आहे. असं घडत असेल तर फडणवीस यांना आवाहन आहे, त्यांनी महाराष्ट्रात लोकशाहीची पायाभरणी करावी. काल फडणवीस यांनी ज्याप्रमाणे सीजेपीच्या आंदोलनाला नकार दिला, हे चुकीचं आहे.
Sangli News: पुनर्वसन केल्याशिवाय हटणार नाही! सांगलीत हातगाडी चालक आक्रमक
मोदी लोकशाही विरोधी आहेत, म्हणून त्यांना जावं लागणार आहे. हा धडा फडणवीस यांनी जाण्याआधी घेतला पाहिजे. मोदींविरोधात नागरिकांनी बंड का पुकारलं आहे.या देशात तुम्ही कितीही मोठे असाल, उद्योगपतींचा पाठिंबा असुद्या . जर एकदा का लोक चिडून रस्त्यावर उतरले तर लोक पळून पळून तुम्हाला मारतील. ती वेळ येऊ नये म्हणून अनेक काही लोकं सरकारपासून दूर होण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा राऊतांनी केला आहे.






