Step Mother Family Pension Rules: सर्वोच्च न्यायालयाने ‘आई’ या संकल्पनेचा अर्थ अधिक उदार व समावेशक ठेवण्याचा सल्ला देत, सावत्र आईलाही कुटुंब पेन्शन योजनेसह इतर सामाजिक कल्याणकारी योजनांच्या फायद्यांमध्ये समाविष्ट करण्याची गरज स्पष्ट केली आहे. न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस, न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती अभय ओका यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाने केंद्र सरकार आणि भारतीय हवाई दलाला निर्देश दिले की, आईची व्याख्या केवळ जैविक मर्यादांपुरती मर्यादित न ठेवता ती अधिक व्यापक असावी. त्यामुळे सावत्र आईलाही योजनेतील लाभ देणे गरजेचे ठरणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, जर एखादी सावत्र आई आपल्या पतीच्या मृत्यूनंतर पालकत्व निभावत असेल, तर केवळ तिचे जैविक नाते नसल्यामुळे तिला लाभांपासून वंचित ठेवणे ही अन्यायकारक बाब ठरते. सामाजिक कल्याणाच्या दृष्टीने नाते अधिक मानवी दृष्टीकोनातून समजून घेणे आवश्यक आहे.
Jharkhand Naxal Attack: झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी केला IED ब्लास्ट; CRPF चे दोन जखमी जवान
सामान्यतः कुटुंब पेन्शनचा लाभ मृत कर्मचाऱ्याच्या अधिकृत पत्नीला मिळतो. मात्र, जर वडिलांनी दुसरे लग्न केले असेल, आणि पहिली पत्नी मृत झालेली असेल किंवा घटस्फोटित असेल, तसेच दुसरी पत्नी अधिकृतपणे विवाहबद्ध असेल, तर तीही पेन्शनसाठी पात्र ठरते. पण अशा प्रकरणांमध्ये सावत्र आई असल्यास, तिचा समावेश अद्याप अस्पष्ट नियमांमुळे केला जात नव्हता. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या या निरीक्षणामुळे कायद्याने सावत्र आईचाही विचार होण्याची शक्यता वाढली आहे.
कायद्यानुसार, जर एखादी व्यक्ती सरकारी नोकरीत असेल आणि त्याचा मृत्यू झाला तर त्याची दुसरी पत्नी अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी पात्र राहणार नाही आणि तिला कुटुंब पेन्शन मिळणार नाही. पण जर त्याला मुले असतील तर त्यांना हक्क दिला जाईल. याशिवाय जर संबंधित मृत व्यक्तीला मुलगा असेल तर त्याला प्रौढत्व येईपर्यंत पेन्शन मिळेल, तर जर मुलगा मुलगी असेल तर तिला तिच्या लग्नापर्यंत पेन्शन मिळेल. जर वडिलांनी पहिली पत्नी जिवंत असताना दुसरे लग्न केले तर दुसऱ्या पत्नीला कुटुंब पेन्शन मिळत नाही. जरी दुसरी पत्नी कायदेशीररित्या विवाहित असली तरी.
हिंदू विवाह कायद्यानुसार, जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर दुसरे लग्न केले तर त्या परिस्थितीत, दोन्ही लग्नांची तारीख आणि पहिल्या पत्नीच्या मृत्यूची तारीख एकत्र करून, दुसऱ्या पत्नीचे सर्व अधिकार दुसऱ्या पत्नीला मिळू शकतात. या परिस्थितीत, दुसऱ्या पत्नीला पेन्शनचा तसेच इतर मालमत्तेवर अधिकार मिळतो. घटस्फोटाच्या बाबतीतही अशीच परिस्थिती उद्भवते. जर एखाद्या व्यक्तीने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर दुसरे लग्न केले तर त्याच्या दुसऱ्या पत्नीलादेखील मिळणारे सर्व हक्क मिळतील.
अलीकडेच सर्वोच्च न्यायालयात एका महिलेच्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. ज्यामध्ये संबंधित महिलेने पतीच्या पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर तिच्या मुलांना वाढवले होते. म्हणून ती कुटुंब पेन्शनची मागणी करत होती. त्यानंतर, जर एका महिन्याच्या मुलाची आई मरण पावली आणि वडील पुन्हा लग्न करतात, तर सावत्र आईला खरी आई मानले जाऊ शकत नाही का, असा सवाल न्यायमूर्ती कांत यांनी केंद्राच्या वकिलाला केला.
त्यावर त्यांनी सांगितले की, कायदेशीररित्या तुम्ही तिला सावत्र आई म्हणू शकता, परंतु प्रत्यक्षात ती आई आहे, कारण पहिल्या दिवसापासून तिने तिचे आयुष्य तिच्या मुलासाठी समर्पित केले होते. त्यानंतर वकिलाने भारतीय हवाई दलाच्या नियमाचा हवाला देत सांगितले की, सावत्र आईचा आईच्या व्याख्येत समावेश नाही. न्यायमूर्ती कांत यांनी वकिलाला सावत्र आईची पेन्शन किंवा इतर कोणताही लाभ समाविष्ट करण्यासाठी लवचिक दृष्टिकोन अवलंबण्यास सांगितले. तसेच यासाठी आईची व्याख्या उदार करणे आवश्यक असल्याचेही नमुद केले.