Koyna Dam Water: '६५ वर्षे काय झोपा काढल्या?' विरोधकांना सदाभाऊ खोतांचा सवाल तर सरकारच्या योजनेचे केले समर्थन

Sadabhau Khot on Koyna Dam Water: कोयना धरणातील वीजनिर्मितीनंतर वशिष्ठी नदीमार्गे समुद्रात जाणारे पाणी मुंबईला देण्याच्या प्रस्तावावरून राजकीय वातावरण तापले आहे. आमदार सदाभाऊ खोत यांनी या योजनेचे समर्थन करत विरोधकांना '६५ वर्षे काय झोपा काढल्या?' असा सवाल केला.
कोयना धरणाच्या पाण्यावरून महाराष्ट्रात राजकीय वाद, सदाभाऊ खोत यांचा विरोधकांना सवाल
कोयना धरणाच्या पाण्यावरून महाराष्ट्रात राजकीय वाद, सदाभाऊ खोत यांचा विरोधकांना सवालकोयना धरणाच्या पाण्यावरून महाराष्ट्रात राजकीय वाद, सदाभाऊ खोत यांचा विरोधकांना सवाल
Published on: 
Updated on: 
  • कोयना धरणाच्या पाण्यावरून महाराष्ट्रात राजकीय वाद

  • सदाभाऊ खोत यांचा विरोधकांना सवाल

  • सरकारच्या योजनेचे खोतांकडून समर्थन

मुंबई : कोयना धरणातील पाणी मुंबई महानगर प्रदेशाला देण्याच्या प्रस्तावावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या मुद्द्यावर आता रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी उडी घेतली आहे. सरकारच्या प्रस्तावाचे समर्थन करत त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. '६५ वर्षे काय झोपा काढल्या? सावित्री नदीतून हे पाणी का उचलले नाही?' असा सवाल खोत यांनी उपस्थित केला.

कोयना प्रकल्पातून वीजनिर्मितीसाठी सुमारे ६५ टीएमसी पाण्याचा वापर होतो. वीजनिर्मितीनंतर समुद्राकडे जाणाऱ्या पाण्याचा मुंबईसाठी उपयोग करण्याचे नियोजन असल्याचे काही नेत्यांनी सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना खोत यांनी या पाण्याचा यापूर्वी योग्य वापर का केला नाही, असा प्रश्न विरोधकांना विचारला.

सरकार एखादी योजना आणत असेल तर त्याचे स्वागत करण्याऐवजी विरोध करणे योग्य नाही. स्वतःच्या नाकर्तेपणावर पांघरूण घालण्यासाठी विरोध केला जात असल्याची टीकाही त्यांनी केली. विरोधकांची अवस्था काळ्या मांजरीसारखी आडवी येण्यासारखी झाली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

कोयना धरणाच्या पाण्यावरून महाराष्ट्रात राजकीय वाद, सदाभाऊ खोत यांचा विरोधकांना सवाल
'पुण्याच्या कायदा-सुव्यवस्थेचे अक्षरशः तीनतेरा वाजलेत...' शिवाजीनगर गोळीबार घटनेवरून सुप्रिया सुळेंचा संताप

कोयनेचे पाणी मुंबईला देण्यावरून वाद का?

कोयना धरण सातारा जिल्ह्यात असतानाही जिल्ह्यातील माण, खटाव, कोरेगाव आणि इतर दुष्काळी भागांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे आधी स्थानिक भागांची पाण्याची गरज पूर्ण करावी आणि त्यानंतरच मुंबईला पाणी देण्याचा विचार करावा, अशी मागणी होत आहे.

खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार सुहास बाबर आणि माजी खासदार संजयकाका पाटील यांनीही स्थानिक सिंचनाचा प्रश्न महत्त्वाचा असल्याची भूमिका मांडली आहे.

कोकणातील नेत्यांचाही विरोध

वीजनिर्मितीनंतर पाणी वशिष्ठी नदीमार्गे कोकणात येते. त्यामुळे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील गावांसह औद्योगिक क्षेत्राच्या पाण्याच्या गरजांचा विचार आधी करावा, अशी मागणी कोकणातील काही सत्ताधारी नेत्यांनी केली आहे. गरज पडल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

पाणी मुंबईला की आधी स्थानिकांना?

एकीकडे मुंबई महानगर प्रदेशाची वाढती पाण्याची गरज, तर दुसरीकडे सातारा, सांगली आणि कोकणातील स्थानिक पाणीटंचाई, असा हा सगळा पेच आहे. त्यामुळे कोयना पाणी योजनेचा अंतिम आराखडा, पाणीवाटपाचे प्रमाण आणि स्थानिकांच्या गरजांचा विचार कसा केला जाणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

सध्या तरी या प्रस्तावावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असून, सरकार याबाबत नेमकी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोयना धरणाच्या पाण्यावरून महाराष्ट्रात राजकीय वाद, सदाभाऊ खोत यांचा विरोधकांना सवाल
Laxman Hake: 'पवार कुटुंबाचं राजकारण संपेल!' सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर लक्ष्मण हाके स्पष्टच बोलले