रेवंता खादी फाउंडेशन सातत्याने कार्यरत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून कावडी येथे आयोजित महिला व्यवसाय प्रशिक्षण शिबिराचा प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात पार पडला.
९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आयोजित केलेल्या ज्येष्ठ लेखक-प्रकाशक सत्कार सोहळ्याचे. या सोहळ्यात लक्ष्मण गायकवाड आणि ज्येष्ठ प्रकाशक बाबूराव मैंदर्गीकर यांचा आज (दि. ३) विशेष सन्मान करण्यात आला.
संमेलनाच्या ग्रंथदिंडीपासून प्रत्येक कार्यक्रमात ते उत्साहाने सहभागी झाले असून साहित्य संमेलनाचा ते मनसोक्त आनंद घेत आहेत. मराठीशी आपले घट्ट नाते जपलेले हे खासदार म्हणजे श्रीनिवास ठाणेदार.
स्वराज्यरक्षक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरीत ग्रंथदिंडी आणि राज्य पोलिस बँडच्या निनादात ध्वजारोहण होताच 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कार्यक्रमांचा उत्साहात प्रारंभ झाला.
साताऱ्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. फडणवीसांनी साहित्य रसिकांना संबोधित केले.
१ जून ते ३१ मे हे कोयना धरणातील पाणीसाठ्याचे तांत्रिक वर्ष आहे. कृष्णा पाणी वाटप लावादानुसार ६७.५ टीएमसी पाणी वीज निर्मितीसाठी राखीव ठेवले जाते. तर उर्वरित पाणी सिंचनासाठी वापरले जाते.
Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यामध्ये 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. ग्रंथ पालखी संमेलन स्थळाच्या दिशेने निघण्यापूर्वी ग्रंथ दिंडीची सुरुवात मराठमोळ्या शाही पद्धतीने करण्यात आली.
मून मॉथ सहसा घनदाट जंगल परिसरात दिसतो आणि शहरी भागात त्याचे दर्शन होणे फारच दुर्मिळ आहे. त्यामुळे महाविद्यालयाचा परिसर जैवविविधतेच्या दृष्टीने समृद्ध असल्याचे हे एक सकारात्मक लक्षण आहे.
शिवसेनेचे नवी मुंबई संपर्कप्रमुख अंकुशबाबा कदम यांच्या नेतृत्वाखाली मेढा नगरपंचायतीत शिवसेनेने भाजपसमोर कडवे आव्हान उभे केले होते. शेवटच्या दिवसापर्यंत भाजप व शिवसेना नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली.
फलटण नगरपरिषदेचे शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी विरोधकांना पुन्हा एकदा इशारा दिला आहे.
सातारा नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ५ (ब) साठी दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.
नाडोली येथील चार घरांना अचानक आग लागली. त्यावेळी चारही घरातील माणसे कामानिमित्त शेतात गेली होती. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. मात्र, वित्तहानी मोठी झाली आहे.
नाशिकमधील पंचवटी-तपोवान येथील साधू ग्रामा प्रकल्पासाठी १८२५ वृक्ष तोड थांबवणे आवश्यक आहे जर ती नाही थांबवली तर मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा सह्याद्री वाचवा मोहीमेचे पर्यावरणप्रेमींनी दिला आहे.
पेन्शनमध्ये वाढ, शासकीय अनुदानातील 30 लाख रुपये निधी खर्च करण्याची परवानगी, निराधार योजनेची 25 वर्षाची अट रद्द करणे अशा विविध मागण्यांसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या दिव्यांग बांधवांनी रास्ता रोको केला.