Samajwadi Party leader Abu Azmi's first reaction on the Waqf Amendment Bill
मुंबई : देशभरामध्ये सध्या वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरुन राजकारण तापले आहे. लोकसभेमध्ये वक्फ बोर्ड दुरूस्ती विधेयकावरुन खडाजंगी झाल्यानंतर पहाटेच्या सुमारास हे विधेयक पारित करण्यात आले. यानंतर आता राज्यसभेमध्ये वक्फ बोर्ड विधेयक सादर केले जाणार आहे. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी हे विधेयक सादर केले. यानंतर यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार हल्लाबोल केला आहे. दरम्यान, वक्फ बोर्ड सुधारित विधेयकावर समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला जोरदार विरोध केला. इरादे ‘खंजर के नेक तो हो नहीं सकते’ असे म्हणत त्यांनी घणाघात केला आहे. यावेळी अबू आझमी म्हणाले की, “सरकार आल्यानंतर या लोकांनी कधीच मुस्लीम समाजाच्या हितासाठी एकही काम केले नाही. मुस्लीम मशीदींच्या खाली मंदिरं शोधली जात आहेत. मंदिर भाविकांनी भरल्यानंतर दर्शनासाठी लोक मंदिराच्या बाहेर थांबू शकतात. मात्र ईदच्या दिवशी मशीद भरल्यानंतर बाहेर नमाज पडू दिले जात नाही,” अशा शब्दांत समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी एनडीए सरकार विरोधात आपली भूमिका मांडली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “मशिदीच्या बाहेर नमाज पठन केले तर त्यांचे पासपोर्ट आणि लायसन्स रद्द केले जाते. जे लोक बिल सादर करत आहेत ते लोक कधीच मुस्लीम समाजाच्या हितासाठी बिल आणणार नाहीत. त्यांना फक्त जमिनी हव्या आहेत. आमच्या पूर्वजांनी त्यांच्या जमिनी या कबरस्तान आणि मशीदींसाठी राखीव ठेवल्या जात आहेत. या जमिनींवर त्यांची नजर आहे. हे मुस्लीम समाजाच्या हिताचे काम करुच शकणार नाहीत. ह्यांनी आत्तापर्यंत जे काम केले आहे ते मुस्लीम विरोधी केले आहे. मुस्लीमांना दोन नंबरचे शहरी बनवणे, हे हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी उचललेले पाऊल आहे. पण हे मुस्लीम समाजाच्या विरोधात पूर्णपणे अन्याय करणारे विधेयक आहे,” असे मत अबू आझमी यांनी व्यक्त केले आहे.
VIDEO | Mumbai: Here’s what Samajwadi Party MLA Abu Azmi (@abuasimazmi) said on Waqf (Amendment) Bill passed by Lok Sabha:
“Those who have not done a single work in favour of Muslim after forming government… they are looking for temples beneath the mosques… such people can… pic.twitter.com/qjM9YsVArc
— Press Trust of India (@PTI_News) April 3, 2025
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अबू आझमी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “हे विधेयक अद्याप राज्यसभामध्ये पारित होणे बाकी आहे. त्यामुळे यावर पार्टीमध्ये देखील चर्चा केली जाईल. यांच्याकडे बहुमत आहे. त्यामुळे बहुमताच्या जोरावर विधेयक पास केले जात आहे. देशामध्ये देखील यांचे बहुसंख्यता आहे. याचमुळे बाबरी मशीदीच्या जागेवर मंदिर बनवण्यात आले आहे. देशाचे बहुमताला जे हवे आहे की मंदिर बनवले पाहिजे म्हणून मंदिर बनवले. या बहुमताच्या अहंकारामध्ये ते कोणतेही बिल पास करतात. पण आम्ही खूप कडक असा विरोध या वक्फ बोर्ड विधेयकाला करत आहोत,” असे स्पष्ट मत समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी व्यक्त केले आहे.