sanjay raut over supreme court lady statue of justice
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने न्यायदेवता बाबत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढण्यात आली असून ड़ोळे उघडे करण्यात आले आहेत. त्याचबरोबर हातामधील तलवार देखील काढण्यात आली असून न्यायदेवतेच्या हातामध्ये संविधान देण्यात आले आहे. या ऐतिहासिक निर्णयाचे सर्वांकडून स्वागत केले जात आहे. यावरुन मात्र ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. माध्यमांशी संवाद साधताना न्यायदेवतेच्या या नवीन बदलावरुन त्यांनी टीका केली आहे. संविधानाच्या 10 शेड्युलवर तुम्ही निर्णय घेऊ शकला नाहीत पट्टी काढून काय होणार? संविधान हातात घेणं भाजप आरएसएसची परंपरा आहे, असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.
न्यायदेवतेच्या निर्णावरुन टीका करताना खासदार संजय राऊत म्हणाले की, न्यायालयाचे काम आहे की संविधानाचे रक्षण करणे. पण सर्वोच्च न्यायालयात हे होत आहे का? संविधान दिलं हातात पण संविधान तुम्ही तर संपवताय. आमच्या पक्षाने न्याय देवीचा अनुभव घेतला. असंवैधानिक सरकार सर्वोच्च न्यायालयाने डोळ्यावर पट्टी बांधून न्याय दिला नाही. संविधानाची हत्या रोज होत आहे. संविधानाचा पुस्तक हातात देऊन न्यायालय आरएसएसचा अजेंडा पसरवत आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी न्यायव्यवस्थेवर केला आहे.
पुढे ते म्हणाले की, न्यायदेवतेच्या हातातील तलवार अन्याय करणाऱ्यांचा मुंडका उडवून टाकण्यासाठी असते. समोर किती मोठी व्यक्ती आहे ती श्रीमंत आहे की शक्तिमान आहे ते पाहून मी न्याय करणार नाही यासाठी डोळ्यावर पट्टी असते. पण गेल्या चार वर्षात असं काही न्याय झाला नाही. न्यायालयाच्या काही लोकांनी भारतीय जनता पक्षाला मदत करायचं ठरवलं आहे. उघड्या डोळ्यांनी आता भ्रष्टाचार पाहा. त्यासाठी त्यांनी न्यायदेवतेच्या हातातील तलवार काढली डोळ्यावरील पट्टी काढली. विधान हातात घेणं ही तर भाजप आणि आरएसएसची परंपरा आहे, असे म्हणत संजय राऊतांनी टीकास्त्र डागलं आहे.
हे देखील वाचा : समीर वानखेडे उतरणार निवडणुकीच्या रिंगणात; ‘या’ मतदारसंघातून लढवणार निवडणूक?
खासदार संजय राऊत म्हणाले की, ईव्हीएम संदर्भात घोटाळा होतो परंतु तुम्ही तीन चीट दिली आहे. कायद्याचा कारभार करून विरोधी पक्षाला खतम केला जात आहे आणि हे तुम्ही सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत आहात हा प्रोपोगंडा आहे. तपास घेण्यासाठी किती तुम्ही घेणार आहात. याला जातीय आणि धार्मिक रंग दिला जातो या देशात मुस्लिमांनी ख्रिश्चनांनी जैन समाजाने मतदान करायचं नाही का? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.