Satara ZP Budget 2026-27 : ४५ कोटींच्या बजेटला प्रशासकीय हिरवा कंदील; विकासकामांना मिळणार गती
Rupali Thombare Patil Post: ‘बजाव ताली… चाकणकर फरार!’ रुपाली ठोंबरेंच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. एन. गावडे, प्रकल्प संचालक विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, ग्रा. पं. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, बांधकाम अभियंता मोहसिन मोदी, अमर नलवडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी अंनिस नायकवडी, माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, समाजकल्याण अधिकारी विद्यानंद चल्लावार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार, जिल्हा कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे आदींची यावेळी उपस्थिती होती.
सन २०२६-२७ साठी जिल्हा परिषदेचा एकूण अर्थसंकल्प ६४ कोटी ३२ लाख रुपयांचा असून, त्यामध्ये महसुली जमा ४५.४० कोटी व भांडवली जमा १८.९२ कोटी रुपयांचा समावेश आहे.याच प्रमाणे महसुली व भांडवली खर्च ठेवण्यात आला असून १ लाख रुपयांची शिल्लक राखण्यात आली आहे.दरम्यान, सन २०२५-२६ च्या सुधारित अंदाजपत्रकात महसुली जमा ११३.१२ कोटी ६७ हजार रुपये व भांडवली जमा २०.९२ कोटी रुपये गृहीत धरून १ लाख रुपयांची शिल्लक ठेवण्यात आली होती.
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती (अर्थसंकल्पीय अंदाज) नियम, १९६६ नुसार निश्चित कालावधीत अर्थसंकल्प मंजूर होणे अपेक्षित असते. मात्र, शुक्रवारी (दि. २० मार्च रोजी) अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक होणार असल्याने आवश्यक १२ दिवसांचा नोटीस कालावधी मिळू शकला नाही. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे याशनी नागराजन यांनी यावेळी सांगितले. तसेच, नव्याने स्थापन होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत हा अर्थसंकल्प अवलोकनार्थ सादर केला जाणार असून त्यानंतर अंतिम मंजुरी दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्ष-उपाध्यक्षांसाठी २.४० लाख, सभापती-उपसभापतींसाठी ३२.७६ लाख, सदस्य प्रवास भत्त्यासाठी स्वतंत्र तरतूद. शिक्षण विभाग गुणवत्ता विकास, क्रीडा स्पर्धा, प्रज्ञाशोध परीक्षा, मॉडेल स्कूल व शाळा दुरुस्तीसाठी निधी. बांधकाम विभाग ग्रामीण रस्ते, इमारती, निवासस्थाने व विश्रामगृह दुरुस्तीसाठी तरतूद. आरोग्य विभाग औषध पुरवठा, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वीज देयक व सार्वजनिक आरोग्य योजना कृषी व पशुसंवर्धन ताडपत्री, एचडी पाईप, यांत्रिकीकरण, शेळी गट वाटप व पशुवैद्यकीय सेवा समाजकल्याण: जोडरस्ते, समाजमंदिरे, दिव्यांग योजना व घरकुलासाठी निधी, महिला व बालकल्याण संगणक प्रशिक्षण, महिलांसाठी व्यवसायिक प्रशिक्षण, सायकल योजना व अंगणवाडी साहित्य.
| विभाग / तपशील | तरतूद (रुपये लाखात) |
| संकीर्ण ग्रामपंचायत | १७७४.०० |
| बांधकाम विभाग | ८००.०० |
| संकीर्ण अर्थ विभाग | ३५५.०० |
| समाजकल्याण विभाग | ३२२.०० |
| शिक्षण विभाग | १८०.०० |
| महिला बाल कल्याण | १६१.०० |
| सामान्य प्रशासन | १५०.०० |
| आरोग्य विभाग | १४०.०० |
| कृषि विभाग | ११०.०० |
| पशुसंवर्धन विभाग | ११०.०० |
| समाजकल्याण (५% दिव्यांग) | ८२.०० |
| शिक्षण (प्राथमिक देखभाल व दुरुस्ती) | ८१.०० |
| मानधन | ८०.०० |
| संकीर्ण (२०५३/२२३५/३६०४) | ६७.०० |
| सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी | ५०.०० |
| लघु पाटबंधारे विभाग | ४०.०० |
| आयुर्वेद | २०.०० |
| एकात्मिक बाल विकास प्रकल्प | १४.०० |
| वने | २.०० |
| सामूहिक विकास | २.०० |
| एकूण बजेट | ४५ कोटी ४० लाख रुपये |






