लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालात काँग्रेसने दणदणीत यश संपादन करत जिल्ह्यात पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. विलासराव देशमुख यांच्या विचारांना मतदारांनी पाठिंबा दिला.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी शनिवारी मतदान झाले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला. ही निवडणूक त्यांच्यासाठी खूप महत्वाची…
पनवेल तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली होती. अनेक गट व गणांमध्ये दुरंगी, तिरंगी ते चौरंगी लढती झाल्या असल्याने राजकीय समीकरणे गुंतागुंतीची झाली आहेत.
चिपळूण तालुक्यातील ४०-४५ मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतदान प्रक्रियेला मोठा फटका बसला आहे. या प्रकारामुळे मतदारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जिल्हा परिषदेच्या ७३१ तर आणि पंचायत समित्यांच्या १ हजार ४६२ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. एकूण ७ हजार ४३८ इतके उमेदवार निवडणूक रिंगणात असून, सर्व मिळून एकूण २ कोटी ८…
सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे सत्ताधारी भाजप व मित्रपक्ष राष्ट्रवादीच्या स्थानिक लोकप्रतिनिधींचे धोरण असून निवडणुकीच्या काळात मतांचा बाजार मांडणाऱ्यांना जनता धडा शिकवेल असा विश्वास आ. अमित देशमुख यांनी व्यक्त…
राज्यभर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच रायगडमध्ये राजकीय उलथापालथ झाली आहे. मनसे पक्षाने महाविकास आघाडीतून अधिकृतपणे बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे. यासंबधित सविस्तर बातमी…
लातूर जिल्हा परिषद निवडणूक विकास, मूलभूत प्रश्न आणि योजनांच्या चौकटीबाहेर जाऊन सत्तेसाठीच्या थेट रणसंग्रामात रूपांतरित झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने एकमेकांविरोधात पूर्ण ताकद पणाला लावली आहे.
लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून संपूर्ण जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये सध्या अटीतटीची लढत सुरू…
रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी उरण तालुक्यात जोरात सुरू असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची घटना घडली.
धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी धाराशिव तालुक्यातील तेर आणि पळसप गटात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या. जाणून घ्या सविस्तर बातमीत..
पुरंदर तालुक्यात जिल्हा परिषद आणि समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा राजकीय रणसंग्राम चांगलाच तापला असून, उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी झालेल्या मोठ्या प्रमाणावरील माघारींमुळे निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले.
सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवतारे यांच्यात लढत असल्याने दोघांमधील संघर्ष चांगलाच पेटणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २७ जानेवारी असून, त्याच दिवशी निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
भाजपने ७ गट आणि १३ गणांमध्ये उमेदवार देत निवडक ठिकाणी ताकद केंद्रित करण्याची रणनीती अवलंबल्याचे दिसते. शिंदे गटाच्या शिवसेनेने ५ गट आणि १४ गणांमध्ये उमेदवार देत ग्रामीण भागात आपला प्रभाव…
पुरंदर तालुक्यासह संपूर्ण राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची नैसर्गिक महाविकास आघाडी आहे. तर शिवसेना भाजपची महायुती आहे. सत्तेच्या सारीपाटात शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादीचे दोन गट झाले.