'बाबा ऐकत नाहीत…', शरद पवारांना अॅडमिट केल्यानंतर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवत दिली प्रकृतीची माहिती दिली आहे. तसेच बाबा ऐकत नसल्याचे मतही सुप्रिया सुळेंनी व्यक्त केले.
Sharad Pawar admitted to Breach Candy Hospital Supriya Sule react.jpg
शरद पवार यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल केल्यानंतर सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया (फोटो - सोशल मीडिया)
Published on: 
Updated on: 
  • खासदार शरद पवार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल

  • सुप्रिया सुळे तातडीने रुग्णालयात दाखल

  • व्हॉट्सअप स्टेटस ठेवत दिली प्रकृतीची माहिती

Sharad Pawar Admit in Breach Candy Hospital : पुणे : राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शरद पवारांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर खासदार सुप्रिया सुळे या बैठक संपवून तातडीने रुग्णालयात दाखल झाल्या आहेत.

शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी काळजी व्यक्त केली. यानंतर सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअँपवर स्टेटस ठेवले होते. यामध्ये त्यांनी बाबा ऐकत नसल्याची तक्रार केली होती. तसेच शरद पवार यांची प्रकृती सध्या बरी असल्याची माहिती दिली होती. 

काय होते सुप्रिया सुळेंचे स्टेटस?

खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसला ‘बाबांना ब्रीच कॅडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डी-हायड्रेशन झाल्यासारखे वाटत आहे. त्यांनी थोडं हळू जायला हवं आणि प्रवास कमी करायला हवा. बाबा काहीच ऐकत नाहीत. त्यांना त्यांचे काम प्रचंड आवडते. तुम्ही करत असलेल्या सर्व काळजीबद्दल धन्यवाद’ असे त्यांनी स्टेटसमध्ये लिहिले आहे. 

शरद पवार यांना रुटिन चेक-अपसाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात येते. यापूर्वी त्यांना दिवाळीच्या आधी 4 नोव्हेंबर रोजी शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कॅडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हाही सुप्रिया सुळे यांनी स्टेट्सद्वारे माहिती दिली होती.

शिवाजीनगर न्यायालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! काल गोळीबार अन् हल्ल्याचा थरार अन् आज पुन्हा धमकीचा मेल

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांना प्रकृतीशी संबंधीत समस्यांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती कशी आहे? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुणे शहर विद्रूपीकरण पुरस्कारात सत्ताधारी पक्षाचे नेते अव्वल! स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांना ‘साहेब’ किताब

काल शरद पवार बारामतीतील त्यांचे निवासस्थान असलेल्या गोविंद बागेत शेतातील उसाची पाहणी करताना दिसले. यावेळी त्यांच्यासोबत युगेंद्र पवार हे उपस्थित होते.

Q

शरद पवार यांना रुग्णालयात का दाखल करण्यात आले आहे?

A

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना डिहायड्रेशन झाल्याचा अंदाज सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे.

Q

शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत सुप्रिया सुळे यांनी काय माहिती दिली?

A

सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सॲप स्टेटसद्वारे शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती दिली. बाबा काहीच ऐकत नाहीत, त्यांना कामाची प्रचंड आवड आहे. त्यांनी थोडे हळू काम करावे आणि प्रवास कमी करावा, असे त्यांनी स्टेटसमध्ये म्हटले आहे. तसेच सध्या त्यांची प्रकृती बरी असल्याचेही सांगितले.

Q

शरद पवार यांना यापूर्वी कधी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते?

A

शरद पवार यांना यापूर्वी ४ नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या आधी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळीही सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सॲप स्टेटसद्वारे त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली होती.