
Shilpa Keluskar duplicate BJP AB form Amit Satam letter to the Election Commission election news
Maharashtra Politics : मुंबई : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. येत्या 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. आठ वर्षानंतर होणाऱ्या या निवडणुकीसाठी जोरदार राजकीय लढत रंगली आहे. पक्षाचे तिकीट मिळण्यासाठी उमेदवारांनी अपार कष्ट केले. मात्र अनेकांचा हिरमोड झाल्याने राज्यात नाराजीनाट्य पसरले आहे. उमेदवार अर्ज दाखल करण्याची मुदत आता संपली. मात्र मुंबईमधील एका भाजपच्या इच्छुक उमेदवाराने पक्षाने तिकीट न दिल्यामुळे वेगळाच उपद्व्याप केला. यामुळे भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांना निवडणूक आयोगाला पत्र लिहावे लागले.
महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक असूनही पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराने चक्क डुप्लीकेट एबी फॉर्म जोडून अर्ज केल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईमध्ये हा प्रकार घडला असून यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. वॉर्ड क्रमांत 173 मधून शिल्पा केळुसकर यांनी त्यांच्या अर्जासोबत चक्क डुप्लीकेट एबी फॉर्म जोडला आणि त्यासह हा अर्ज सादर केलं. ही धक्कादायक घटना उघडकीस येताच एकच खळबळ माजली. यामुळे भाजपच्या इच्छुकाने केलेले प्रताप समोर आले आहेत. या प्रकरणामुळे मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी याप्रकरणी तातडीने पावलं उचलत निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली. उमेदवाराने डुप्लीकेट फॉर्म जोडल्याचे नमूद करत त्यांनी हा एबी फॉर्म रद्द करण्याचीही मागणी केली आहे.
हे देखील वाचा : आयाराम–गयारामची राजकारणाला लागली कीड; महापालिकेत सर्वच पक्षांसमोर विश्वासार्हतेचे आव्हान
सोमवारी (दि.30) महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांनी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र पक्षाकडून एबी फॉर्म मिळेपर्यंत अनेक नेते हे वाट पाहत होते. मुंबईमध्ये देखील हा प्रकार दिसून आला. भाजपकडून मुंबईत अनेक इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले. मुंबईतील वॉर्ड 137 मध्ये शिल्पा केळुसकर या निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होता. मात्र त्यांना पक्षाकडून नजरचुकीने फॉर्म देण्यात आला होता. ते लक्षात आल्यावर भाजपने केळुसकर यांच्याडून तो फॉर्म परत घेतला. निवडणूक लढवण्याची इच्छआ असूनही उमेदवारी न मिळाल्याने केळुसकर यांनी शक्कल लढवली आणि चक्क पक्षाचा डुप्लिकेट एबी फॉर्म जोडत आपला उमेदवारी अर्ज सादर केला.
हे देखील वाचा : फडणवीसांविरोधात ते वक्तव्य भोवलं! भाजप उमेदवार पूजा मोरेंची निवडणुकीतून रडत रडत माघार
मात्र हा प्रकार उघडकीस आल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये एकच वाद निर्माण झाला. तसेच आश्चर्य व्यक्त केले जाऊ लागले. डुप्लिकेट एबी फॉर्म जोडल्याचे समोर आल्यानंतर भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी नाराजी व्यक्त करत थेट निवडणूक आयोगाला या संदर्भात पत्र लिहित तक्रार केली आहे. अमित साटम यांनी तातडीने पावलं उचलून निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवलं. केळुसकर यांनी बनावट फॉर्म भरल्याचे नमूद करत तो अर्ज रद्द करावा अशी मागणी या पत्रातून साटम यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली असून तक्रारही नोंदवण्यात आली आहे. मात्र आता केळुसकर यांचा हा अर्ज रद्द होतो की कायम ठेवला जातो हे पाहणं महत्वाचं ठरेल.