Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shiv Sena Symbol Case : निकालानंतर रडण्यासाठी वातावरण निर्मिती ;शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांची उबाठा गटावर खरमरीत टीका

Shiv Sena Symbol Case : सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत सुनावणी सुरु असून या खटल्यात उबाठाला समोर पराभव स्पष्ट दिसत आहे. 'शिवसेना' हे नाव आणि 'धनुष्यबाण' हे चिन्ह एकनाथ शिंदे यांनाच मिळणार, याची खात्री त्यांनाही पटली आहे. निकालानंतर रडण्यासाठी न्यायसंस्थेच्या नावाने खडे फोडण्यासाठी ते वातावरण निर्मिती करत आहे .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 13, 2026 | 08:02 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • संजय राऊत ,असीम सरोदेंवर टीका
  • जिंकण्याचा विश्वास
दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

संजय राऊत ,असीम सरोदेंवर टीका

खासदार म्हस्के म्हणाले की, सध्या रोज उबाठा नेत्यांची आणि त्यांनी पाळलेल्या पोपटांची टिवटिव सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबत अजून पूर्ण सुनावणी झालेलीच नाही, तरीही उबाठा गटाचे नेते अर्धवट माहितीच्या आधारे जी काही टिवटिव करत आहेत, ती अत्यंत हास्यास्पद आहे, असा टोला खासदार म्हस्के यांनी लगावला.

संजय राऊत, असीम सरोदे आणि त्यांच्या कच्च्याबच्च्यांचं एक नवीनच ‘घटनापीठ’ तयार झालं आहे. चॅनलच्या माईकसमोर ते त्यांचा स्वतंत्र खटला चालवत आहेत. हे स्वतःलाच न्यायमूर्ती समजून रोज टीव्हीवर बसून जजमेंट द्यायला लागले आहेत. यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच आहे, असे खासदार म्हस्के म्हणाले.

Rahul Gandhi: ‘…RSS ला पाठिंबा देईन, मी त्यांचे रक्षण करेन’, राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण

खासदार म्हस्के म्हणाले की, ईडी आणि सीबीआयची नोटीस द्यायची असती तर उद्धव ठाकरेंना आणि आदित्य ठाकरेंना का नाही दिली. केवळ संजय राऊत यांनाच दिली होती. आपला पक्ष का संपतोय याचे त्यांनी कधीतरी आत्मपरीक्षण करायला हवे, असे सल्ला खासदार म्हस्के यांनी दिला. निवडणूक आयोगाने त्यांच्या अधिकारात निर्णय घेतले आहेत.

निवडणूक आयोगाने यांच्या बाजूने निर्णय दिला नाही म्हणून त्यांच्यावर टीका करत आहेत. आता खटला लांबणीवर पडावा, यासाठी सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे प्रकरण सोपवण्याची ते मागणी करतात. कारण त्यांना पराभव डोळ्यांसमोर दिसत आहेत. निकालानंतर पराभव झाला की हे रडायला मोकळे, सकाळी भुंकायला मोकळे, अशी घणाघाती टीका खासदार म्हस्के यांनी केली.

Shiv Sena Symbol Case: ‘२०१८ ची शिवसेना पक्षघटना मान्य नव्हती तर…’, कपिल सिब्बल यांचा शिंदे गटावर जोरदार युक्तिवाद

जिंकण्याचा विश्वास

ते पुढे म्हणाले की, उबाठा गटाला आतून पक्की जाणीव झाली आहे की, त्यांची बाजू कायदेशीरदृष्ट्या अत्यंत लंगडी आणि तोकडी आहे! जेव्हा आमचे आदरणीय वकील न्यायालयात उभे राहतील, तेव्हा उबाठाचा सर्व पोकळ युक्तिवाद धडाधड खोडून काढला जाईल आणि त्यांचे दात त्यांच्याच घशात जातील,

असे खासदार म्हस्के म्हणाले. ते पुढे म्हणाले की, आमचा न्यायव्यवस्थेवर आणि संविधानावर पूर्ण विश्वास आहे. जनतेच्या न्यायालयात शिवसेना कोणाची हे आधीच सिद्ध झालं आहे आणि घटनापीठासमोरही ते सिद्ध होईल, असे खासदार म्हस्के म्हणाले. शिवसेनेचे सर्व आमदार, खासदार आणि लाखो कार्यकर्ते खंबीरपणे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे निकाल शंभर टक्के कायदेशीर बाजूने आणि शिवसेनेच्याच म्हणजेच एकनाथ शिंदेंच्या बाजूने लागेल, असा विश्वास खासदार म्हस्के यांनी यावेळी व्यक्त केला.

Web Title: Shiv sena symbol case creating an atmosphere to cry after the verdict shiv sena mp naresh mhaskes scathing criticism of the ubt faction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 08:02 PM

Topics:  

  • MP Sanjay Raut
  • Naresh Mhaske
  • Shiv Sena

संबंधित बातम्या

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून शिंदे गटाचा आज युक्तिवाद; अंतिम निर्णय आता नेमकी कधी?
1

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून शिंदे गटाचा आज युक्तिवाद; अंतिम निर्णय आता नेमकी कधी?

Sunil Prabhu Car Accident: ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांच्या कारची पादचाऱ्याला धडक; विलेपार्लेत अपघात, एक जण जखमी
2

Sunil Prabhu Car Accident: ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांच्या कारची पादचाऱ्याला धडक; विलेपार्लेत अपघात, एक जण जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.