Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Santosh Bangar Viral Video : सत्ताधारी आमदारांचा वाढला रुबाब? संतोष बांगर यांनी थेट मतदान केंद्राचे नियम बसवले धाब्यावर

Santosh Bangar Viral Video : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकले आहेत. संतोष बांगर यांनी मतदान केंद्रामध्ये जाऊन घोषणाबाजी केली. तसेच फोनवर बोलत नियमांचे उल्लंखन केले.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 02, 2025 | 03:01 PM
Shivsena MLA Santosh Bangar viral video of sloganeering at polling booth and talking on phone hingoli news

Shivsena MLA Santosh Bangar viral video of sloganeering at polling booth and talking on phone hingoli news

Follow Us
Close
Follow Us:
  • शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांची व्हिडिओ व्हायरल
  • संतोष बांगर यांनी मतदार केंद्रामध्ये केली घोषणबाजी
  • विरोधकांची संतोष बांगरांवर कारवाईची मागणी
Santosh Bangar Viral Video: हिंगोली : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका (Local Body Elections) होत आहेत. यासाठी आज (दि.02) नगर परिषद आणि नगर पंचायतीसाठी मतदान होत आहे. त्यामुळे राज्यामध्ये मोठ्या उत्साह आहे. राजकीय नेत्यांनी देखील जोरदार प्रचार केला. महायुतीमध्ये प्रचारावेळीच वादंग निर्माण झाल्याचे दिसून आले. शिंदे गटाचे नेते आणि आमदार संतोष बांगर हे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी मतदान केंद्राच्या आतमध्ये जाऊन दादागिरी केली. तसेच मतदान केंद्रामध्ये घोषणाबाजी देखील दिली.

शिंदे गटाचे नेते शिवसेना आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. निवडणुकीच्या दिवशी त्यांचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये ते एका महिला मतदाराला मतदान केंद्राकडे चालत जात असताना “बटण दाबा” असे थेट निर्देश देत होते. मतदान केंद्रावर गोपनीयतेच्या नियमांचे उघड उल्लंघन केल्याच्या आरोपांमुळे हे प्रकरण तापले आहे.

लोकशाहीची ऐशी की तैशी? एकनाथ शिंदेंच्या बॅगांवरुन खासदार संजय राऊतांची टीका

संतोष बांगर यांनी घोषणाबाजी केली
संतोष बांगर आज सकाळी मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचले. मतदान करताना त्यांनी “बाळासाहेब ठाकरे जिंकू शकतील”, “एकनाथभाई शिंदे, पुढे चला” असे नारे दिले. मतदान केंद्रावर घोषणाबाजी करणे, मोबाईल फोन वापरणे किंवा निवडणूक गोपनीयतेचे उल्लंघन करणे हे आदर्श आचारसंहितेचे गंभीर उल्लंघन मानले जाते. त्यामुळे, या कृत्याबद्दल बांगर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी निवडणूक विभागाकडून करण्यात येत आहे.

भाजप आमदारांचा निशाणा

भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी या मुद्द्यावर बांगर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, संतोष बांगर यांनी मतदान केंद्रावर जाऊन एका महिलेला कोणते बटण दाबायचे हे जाहीर करणे आणि सांगणे हे लोकशाहीला कलंकित करणारे कृत्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या मतदानाच्या अधिकारानुसार निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष असाव्यात. तथापि, येथे नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे.

संतोष बांगरांनी सर्व नियम मोडले, मतदान केंद्रावर फोनवर गप्पा, बटण दाबण्यासाठी सांगितलं अन् घोषणाबाजी VIDEO pic.twitter.com/UYYFWu8lFs — Sumit Bhujbal (@SumitBhujb19648) December 2, 2025

मुटकुळे यांनी या प्रकरणाबाबत थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. बांगर यांच्या निवडणूक प्रचारात मोठ्या प्रमाणात काळा पैसा वापरला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी ही संपूर्ण निवडणूक पैशाच्या बळावर लढल्याचा गंभीर आरोप करत म्हटले आहे. ते प्रत्येक मतदाराला ५,००० रुपये देत असल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. त्यांच्याकडे दारू, मटका आणि वाळूच्या व्यवसायातून पैसे आहेत आणि ते पैसे वाटपासाठी वापरले जात आहेत.

“शिंदेंनीं मालवणला दोन बॅग मधून काय आणले? पैसे होते?” अंजली दमानियांचा सवाल

मुटकुळे असेही म्हणाले की, हिंगोलीचे लोक साधे असू शकतात, परंतु ते अहंकारी नाहीत. लोक सगळं पाहत आहेत. पैसे, धमक्या किंवा घोषणाबाजीने मते जिंकली जात नाहीत. लोकशाहीचा पाया जनतेच्या शहाणपणाच्या निर्णयांवर अवलंबून असतो आणि जनता त्यांना त्यांच्या जागी बसवेल. संतोष बांगर यांच्या व्हिडिओमुळे राजकीय वातावरण तापले आहे आणि सर्वांच्या नजरा आता निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर लागल्या आहेत. विरोधकांनी केलेल्या आरोपांमुळे हिंगोलीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Web Title: Shivsena mla santosh bangar viral video of sloganeering at polling booth and talking on phone hingoli news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 02:59 PM

Topics:  

  • Maharashtra Local Body Election
  • Santosh Bangar
  • shivsena

संबंधित बातम्या

“निवडणुका पुढे नेणे…, पुढच्या निवडणुकीत असं…”, निवडणूक आयोगाच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली तीव्र नाराजी
1

“निवडणुका पुढे नेणे…, पुढच्या निवडणुकीत असं…”, निवडणूक आयोगाच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली तीव्र नाराजी

Maharashtra Local Body Election : कोल्हापूरच्या निवडणुकीमध्ये मिठाचा खडा? कागलमध्ये मतदान केंद्रावर पोलीस अन् तृतीयपंथीचा वाद
2

Maharashtra Local Body Election : कोल्हापूरच्या निवडणुकीमध्ये मिठाचा खडा? कागलमध्ये मतदान केंद्रावर पोलीस अन् तृतीयपंथीचा वाद

भाजपवर टीका करुन शहाजी बापू पाटील फसले? चौकशीचा ससेमिरा अन् विरोधकांचे टीकास्त्र
3

भाजपवर टीका करुन शहाजी बापू पाटील फसले? चौकशीचा ससेमिरा अन् विरोधकांचे टीकास्त्र

Nagarparishad Election Result: मोठी बातमी! 2 डिसेंबरची मतमोजणी रद्द, निकालाची नवीन तारीख जाहीर, हायकोर्टाचा मोठा निर्णय
4

Nagarparishad Election Result: मोठी बातमी! 2 डिसेंबरची मतमोजणी रद्द, निकालाची नवीन तारीख जाहीर, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.