Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“या सगळ्याचा आक्का बोका सर्व राणे कुटुंबीय…; विनायक राऊतांनी नारायण राणेंना पुन्हा एकदा डिवचले

शिवसेना ठाकरे गटाचे नेते व सिंधूदुर्गाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी राणे कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सर्वात जास्त ड्रग्स सप्लाय होत असल्याचे म्हणत आरोप केले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: May 19, 2025 | 01:57 PM
shivsena vinayak raut target narayan rane and nilesh rane

shivsena vinayak raut target narayan rane and nilesh rane

Follow Us
Close
Follow Us:

सिंधूदुर्ग : सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. येत्या चार महिन्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे सांगितल्यामुळे लवकरच महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये हालचालींना वेग आला आहे. नेत्यांचे आरोप प्रत्यारोप सुरु असून टीका केली जात आहे. सिंधूदुर्गाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी खासदार नारायण राणे यांच्यावर टीकास्त्र डागले आहे.

ठाकरे गटाचे नेते व माजी खासदार विनायक राऊत यांनी सिंधुदूर्गामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. विनायक राऊत यांनी आमदार आणि मंत्री नितेश राणे यांच्यावर टीका केली. राऊत म्हणाले की, “मी जरी निवडून आलो नाही तरी सातत्याने माझा संपर्क या मतदारसंघात आहे. नितेश राणे यांच्या कोणत्याही आरोपाला सिरियसली घेतलं नाहीये. त्यांना जे मंत्रिपद मिळालं आहे, त्यांची गुरमी आणि मस्ती त्यांच्या डोक्यामध्ये भिणली आहे. बिडवलकर प्रकरण असो किंवा सावडाव मारहाण प्रकरण असो या सगळ्या मागे एकनाथ शिंदे गटाचे म्होरके आहेत. निलेश राणे यांचे समर्थक आहेत, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे स्वतः गुंडांना पोसायचं, त्यांला खत पाणी घालायचं आणि इतरांच्या हत्या करायच्या हा जो राणेंचा प्रघात होता तो त्यांच्या दोन्ही मुलांनी चालू ठेवला आहे, हे सिंधुदुर्गाचं दुर्दैव आहे,” अशी टीका विनायक राऊत यांनी केली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

भाजप दोन्ही गटांचं विसर्जन करणार

पुढे ते म्हणाले की, “आम्ही एकजुटीने या जिल्ह्यामध्ये काम करतोय ते त्यांच्या डोळ्यात खूपतय आणि निवडून आलेले खासदार कुठे भूमिगत झाले आहेत असा सवाल सिंधुदुर्गकर, रत्नागिरिकर विचारत आहेत. महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ येत आहेत. तसं तसं या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष शिंदे गटाला नामशेष करण्याचा प्रयत्न करत आहे. शिंदे गट भाजपला नको आहे, ऍडजेस्टमेंट म्हणून अजित पवार गटाला ठेवतील. भाजपा आणि अजित पवार गट शिंदे गटाचे विसर्जन करतील,” असा गंभीर दावा विनायक राऊत यांनी केला आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

गळ्याचा आक्का बोका सर्व राणे कुटुंबीय

माजी खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्याबाबत गंभीर दावा केला आहे. ते म्हणाले की, “प्रशासन भ्रष्टाचारी झालेले आहे, संपूर्ण महाराष्ट्रात प्रशासकांवरती ज्या धाडी टाकल्या जात आहेत, करोड रुपयांचा घबाड त्यांच्या घरामध्ये मिळत आहे. त्यामुळे सध्याचे शासन आहे ते शासन आणि प्रशासन मिळून लूटमार करत आहेतअख्या महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात जास्त ड्रग्स सप्लाय होत आहे. गोवा बनावट दारू सर्वात जास्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहे. आणि हे सगळं सप्लाय करणारे सगळे भारतीय जनता पक्ष आणि नारायण राणे यांच्या गटाचे आहेत. त्यामुळे या संपूर्ण अवैध धंदे करायचे असतील तर शेकडो रुपये प्रशासनाला द्यावेच लागणार आहेत. त्यामुळे या सगळ्याचा आक्का बोका सर्व राणे कुटुंबीय आहेत,” असा टोला माजी खासदार विनायक राऊत यांनी लगावला आहे.

Web Title: Shivsena mp vinayak raut target narayan rane and nilesh rane over drug supply

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2025 | 01:57 PM

Topics:  

  • MP Narayan Rane
  • nilesh rane
  • Vinayak Raut

संबंधित बातम्या

थातुर मातुर उपाय काढून चालणार नाही…;  मराठा आंदोलनाबाबत काय म्हणाले विनायक राऊत?
1

थातुर मातुर उपाय काढून चालणार नाही…; मराठा आंदोलनाबाबत काय म्हणाले विनायक राऊत?

Sindhudurg : निलेश राणे आमदार व्हावेत, म्हणून कार्यकर्त्यांनी केला नवस
2

Sindhudurg : निलेश राणे आमदार व्हावेत, म्हणून कार्यकर्त्यांनी केला नवस

Sindhudurg : घोटगे-सोनवडे घाट लवकरच मार्गी लागणार, निलेश राणे यांची माहिती
3

Sindhudurg : घोटगे-सोनवडे घाट लवकरच मार्गी लागणार, निलेश राणे यांची माहिती

Vinayak Raut : सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींचा मुजोरपणा… विनायक राऊतांचा महायुती सरकारवर हल्लाबोल
4

Vinayak Raut : सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींचा मुजोरपणा… विनायक राऊतांचा महायुती सरकारवर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.