Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli Municipal Election 2025: सांगलीत महायुती म्हणूनच लढणार! पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केली रणनीती

Chandrakant Patil Sangli News: सांगली महानगरपालिका निवडणुकीत महायुतीमध्ये फूट पडल्याच्या चर्चांना चंद्रकांत पाटील यांनी पूर्णविराम दिला. भाजपचाच महापौर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 19, 2025 | 10:07 PM
सांगलीत महायुती म्हणूनच लढणार! पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केली रणनीती

सांगलीत महायुती म्हणूनच लढणार! पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केली रणनीती

Follow Us
Close
Follow Us:

 

  • सांगलीत महायुतीची वज्रमूठ!
  • निवडणुकीसाठी चंद्रकांत पाटलांचा मास्टर प्लॅन
  • ‘भाजपचाच महापौर’ होण्याचे भाकीत
मिरज: सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका निवडणुकीत महायुतीमध्ये फूट पडली असल्याची चर्चा सुरू होती, याला पूर्णविराम देत आम्ही महायुती म्हणूनच लढणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी स्पष्टीकरण दिले. महायुतीतील घटक पक्ष आणि प्रमुख पक्षांची बैठक झाली. या बैठकीत आढावा घेण्यात आला आहे. यावेळी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पक्ष निवडणूक निरीक्षक अतुल भोसले, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, शेखर इनामदार, मकरंद देशपांडे, पृथ्वीराज पाटील, प्रकाश ढंग उपस्थित होते.

भाजप हा पक्ष लोकशाहीप्रधान पक्ष

सांगलीत मकरंद देशपांडे यांना प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली असून, शेखर इनामदार यांना बाजूला सरकवण्यात आले. असल्याचे वृत्त चुकीचे आहे. भाजप हा पक्ष लोकशाहीप्रधान पक्ष आहे. येथे बूथपासून राष्ट्रीय अध्यक्षांपर्यंत सर्व नियुक्त्या निवडणूकांवर आधारित होतात. यामुळेच पक्षाचे १८ कोटी सदस्य आहेत. सध्या मकरंद देशपांडे यांची निवड समन्वय साधण्यासाठी झाली असून, शेखर इनामदार हेचे निवडणूकीचे प्रमुख असतील असे स्पष्ठ केले.

युतीत चांगला समन्वय

महायुतीतील सहयोगी पक्षांना जागा वाटपाबाबत आज बैठक झाली. प्रत्येक पक्षाच्या इच्छुकांनी मुलाखती दिल्या. युतीत चांगला समन्वय आहे. महायुतीतील जागा वाटपाबाबत शिवसेनेला किती, राष्ट्रवादीलाही किती, तर नव्याने आलेल्या जयश्री पाटील व पृथ्वीराज पाटील यांना किती, यावर चर्चा होईल. मनपा उमेदवारीसाठी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेने एजन्सी नेमली आहे. २१, २२, २३ डिसेंबरला सर्वेक्षण अहवाल येईल. प्रभागनिहाय अ, ब, क, ड उमेदवारांची यादी एजन्सीकडून मिळेल. या एजन्सी सर्वेचे पक्षाकडून आकलन होईल. मग निर्णय होईल.

हे देखील वाचा: बिगुल वाजताच राजकीय हालचालींना वेग! कॉंग्रेसची सत्ता घालवण्याचा इतर पक्षांचा प्रयत्न

२९ महानगरपालिका निवडणुकांत महायुती म्हणून लढण्याचा संकल्प

दरम्यान केंद्रात एकनाथ शिंदे व अमित शहा यांची बैठक झाली असून, देवेंद्र फडणवीस शिवसेना-भाजप युतीसाठी आग्रही आहेत. सुहास बाबर बाहेर आहेत ते आल्यावर शेखर इनामदार व इतर कागद-पेन घेऊन प्रत्येक जागेवर रणनीती ठरवतील. सध्या युतीतील शिवसेना (शिंदे गट), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय), जनसुराज्य आणि काही ठिकाणी रयत क्रांती संघटनेसह महायुतीत सामील पक्षांबरोबर चर्चा झाल्या आहेत. महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकांत महायुती म्हणून लढण्याचा संकल्प आहे. राष्ट्रवादी (अजित गट) जिथे शक्य असेल तिथे सोबत घेण्याचा प्रयत्न आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांत राष्ट्रवादीत वेगळे चालल्याची माहिती मिळत आहे. असेही ते यावेळी म्हणाले.

महापौर भाजपचा हे विधिलिखित

आमदार नाईकवाडी यांनी पत्रकार परिषदेत “महापौर राष्ट्रवादाचा होईल” असे म्हटले. यावर “दादा” म्हणाले, प्रत्येक नेत्याला कार्यकर्त्यांना सोबत ठेवण्यासाठी असा दावा करावा लागतो. मात्र, विधिलिखित आहे की सांगलीचा महापौर हा भाजपचाच होईल. गेल्या दोन महिन्यांपासून महायुतीसाठी प्रयत्न आहेत, पण यश मिळवायचे आहे. राजकारणात क्षणात बदल होऊ शकतात. राष्ट्रवादी अजित गट एकत्र लढण्यास तयार झाल्यास ते स्वागत आहे.

मुस्लिमात चुकीचा प्रचार

नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांत जिथे जमेल तिथे एकत्र, न जमल्यास स्वतंत्र लढू. अजित गटात भाजप नगरसेवक गेले असल्याच्या प्रश्नावर पाटील म्हणाले, “आम्ही आधीच मोठे नेते पक्षात घेतले आहोत. मागील महापालिकेत ११ मुस्लिम उमेदवार उभे केले, काही निवडून आले. मुस्लिम समाजात चुकीचा प्रचार झाला, पण इतर पक्षांनी वर्षानुवर्षे त्यांचे मत गृहीत धरले. भाजपमध्ये फसवणूक नाही.

हे देखील वाचा: Maharashtra Politics : भाजपात ‘तात्पुरत्या कार्यकर्त्यांचा’ भरणा; संघटन बळकट की केवळ दिखाऊ विस्तार?

Web Title: The mahayuti alliance will contest the elections in sangli as a united front announced guardian minister chandrakant patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2025 | 10:07 PM

Topics:  

  • chandrakant patil
  • Maharashtra Local Body Election
  • Mahayuthi

संबंधित बातम्या

KDMC Election 2025 : केडीएमसी निवडणूकीत काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी उतरणार, राजाभाऊ पातकर यांचा निर्धार
1

KDMC Election 2025 : केडीएमसी निवडणूकीत काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी उतरणार, राजाभाऊ पातकर यांचा निर्धार

बिगुल वाजताच राजकीय हालचालींना वेग! कॉंग्रेसची सत्ता घालवण्याचा इतर पक्षांचा प्रयत्न
2

बिगुल वाजताच राजकीय हालचालींना वेग! कॉंग्रेसची सत्ता घालवण्याचा इतर पक्षांचा प्रयत्न

Maharashtra Politics : भाजपात ‘तात्पुरत्या कार्यकर्त्यांचा’ भरणा; संघटन बळकट की केवळ दिखाऊ विस्तार?
3

Maharashtra Politics : भाजपात ‘तात्पुरत्या कार्यकर्त्यांचा’ भरणा; संघटन बळकट की केवळ दिखाऊ विस्तार?

वडगाव मावळमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला; अंदाज–तर्क वितर्कांना उधाण, ढोल–ताशा पथकांची तयारी
4

वडगाव मावळमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला; अंदाज–तर्क वितर्कांना उधाण, ढोल–ताशा पथकांची तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.