Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Operation Tiger : राजकारणात पुन्हा भूकंप होणार, ठाकरे गट फुटणार? ‘ऑपरेशन टायगर’ सक्सेस होणार

गेल्या काही दिवसांपासून राज्यात “ऑपरेशन टायगर”च्या चर्चांना सुरू आहेत. ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून ठाकरे गटाचे काही खासदार थेट भाजपात प्रवेश करणार असल्याच्याही चर्चा सुरू आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 07, 2025 | 10:01 AM
Operation Tiger : राजकारणात पुन्हा भूकंप होणार, ठाकरे गट फुटणार? ‘ऑपरेशन टायगर’ सक्सेस होणार
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्याच्या राजकारणात  ठाकरे गटाचे सहा खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून “ऑपरेशन टायगर”ची चर्चा सुरू होती. मात्र, पक्षांतर बंदी कायद्यामुळे हे खासदार संभ्रमावस्थेत होते. या कायद्याच्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी ठाकरे गटातील नऊ पैकी सहा खासदारांचे विभाजन आवश्यक होते, त्यामुळे त्यांना मन वळवण्यासाठी वेळ घेतला गेला.

आता “ऑपरेशन टायगर” यशस्वी झाल्याचे बोलले जात असून, ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी शिंदे गटासोबत जाण्यास तयारी दर्शवली आहे. त्यामुळे शिंदे गट लवकरच ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे. या सहा खासदारांचा शिंदे गटामध्ये लवकरच प्रवेश होणार असून, हे खासदार येत्या संसदीय अधिवेशनाआधी अधिकृतरित्या शिंदे गटात सामील होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

‘लाडक्या बहिणी’च्या केवळ प्रचारासाठी तीन कोटींची तरतूद; राज्य सरकारकडून निर्णय जारी

 

1. भविष्याची चिंता – महायुतीचे मजबूत सरकार असल्याने अनेक खासदारांना आपल्या राजकीय भविष्यासंदर्भात असुरक्षितता वाटत आहे.

2. विकासासाठी निधीचा अभाव – ठाकरे गटाच्या खासदारांना त्यांच्या मतदारसंघांसाठी आवश्यक असलेला निधी मिळवण्यात अडचणी येत आहेत, ज्यामुळे त्यांना विकासकामे करणे कठीण जात आहे.

3. सत्तेचा फायदा – केंद्र आणि राज्य दोन्हीकडे महायुतीचे सरकार असल्याने त्याचा फायदा घेत खासदारांना अधिक विकासकामे करण्याची संधी मिळेल.

पाकिस्तानातील स्वित्झलँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या व्हॅलीचे आधी होते भारतीय नाव

4. शिंदे गटाला जनतेचा स्वीकार – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला जनतेने स्वीकारले आहे, त्यामुळे भविष्यातही त्यांच्यासोबत राहणे फायदेशीर ठरू शकते.

5. भाजपची साथ आणि विकासाची संधी – भाजपसोबत राहिल्यास केंद्र सरकारच्या सहकार्यामुळे मतदारसंघातील विकासकामांना गती मिळण्याची शक्यता आहे.

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी देखील ऑपरेशन टायगरला हिरवा कंदिल दिल्याचे सांगितले जात आहे. या अंतर्गत ठाकरे गटातील खासदार फोडले जाणार आहेत. विशेष म्हणजे ठाकरेंचे नऊपैकी सहा खासदार भाजपमध्ये सामील होणार असल्याचे बोलले जात आहे. यासोबतच सहापैकी पाच खासदारांची ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देण्याची पूर्ण तयारी झाली आहे. पण केवळ एका खासदारामुळे भाजपप्रवेश अडल्याचे सांगितले जात आहे. तर एका खासदार अद्याप ठामपणे निर्णय घेऊ शकत नाहीये. पक्षांतर बंदी कायदा लागू होऊ नये म्हणून नऊ पैकी सहा खासदार फुटणे आवश्यक आहे. अन्यथा या फुटीर गटांवर पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत कारवाई होऊ शकते. पक्षांतर बंदी कायद्यातून वाचायचे असेल तर सह खासदारांनी फुटणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी (MVA) ला धक्का देण्यासाठी, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ‘ऑपरेशन टायगर’ सक्रिय केले आहे. दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर (पुणे – कसबा जागा) आणि शिवसेनेचे (यूबीटी) माजी आमदार महादेव बाबर (पुणे – हडपसर जागा), माजी आमदार सुभाष बने (रत्नागिरी – संगमेश्वर जागा), माजी आमदार गणपत कदम ( माजी आमदार चंद्रकांत मोकाटे (रत्नागिरी- राजापूर जागा), माजी आमदार चंद्रकांत मोकाटे (पुणे- कोथरूड जागा) आणि विद्यमान आमदार यांच्यासह महाविकास आघाडीचे काही मोठे नेते शिवसेनेच्या संपर्कात आहेत.

Web Title: There will be another earthquake in politics the thackeray group will split operation tiger will be a success nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2025 | 09:26 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.