"राणेंच्या कार्यकर्त्यांकडून निविदा मॅनेज करण्यासाठी ठेकेदारांना धमक्या" ;परशुराम उपरकरांचा आरोप
कणकवली / भगवान लोके: सिंधुदुर्ग जिल्हा हा राणे कुटुंबियांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याच बालेकिल्ल्यात आता राणे कुटुंबियांच्या अडचणीत वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. नितेश राणे आणि त्यांचे कार्यकर्ते ठेकेदारांना धमक्या देत आहेत, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे. उपरकर म्हणाले की, सिंधुदुर्गात नारायण राणे यांचे दोन्ही पुत्र विकासकामांचा निधी आणला असे सांगतात. मात्र , कुठलीही विकासकामं सुरु झालेली नाहीत.
पुढे उपरकर असं म्हणाले की, कुडाळ कोर्टाच्या बांधकामाच्या निविदेसाठी टेंडर भरलेल्या ठेकेदाराला थेट फोन करुन मी निलेश राणेंच्या कार्यालयातून बोलतोय , ही निविदा भरु नका असे सांगत आहेत. तर दुसरा कार्यकर्ता आनंद शिरवलकर हे निलेश राणे यांच्या मतदारसंघातील हे काम करत आहे. असे सांगून धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे राणेंच्या कार्यकर्त्यांकडून निविदा मॅनेज करण्यासाठी ठेकेदारांना धमक्या जात आहेत. हे ऑडीओ रेकॉडिंगमुळे सिद्ध होत आहे, असं खळबळजनक स्पष्टीकरण उपरकर यांनी दिलं आहे.
हेही वाचा-“उद्धव ठाकरे यांनी केवळ मुख्यमंत्री होण्यासाठी…. “; रावसाहेब दानवेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
कणकवलीतील विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत उपरकरांना राणेंवरच्या आरोपाचा खुलासा केला. या पत्रकार परिषदेत उपरकर यांनी संबंधित दोन्ही फोनचे ऑडीओ रेकॉर्डिंग माध्यमांसमोर सादर केले. उपररप म्हणाले की, अशा पध्दतीने राणेंची दोन्ही मुले ठेकेदारीबाबत काम करतात मग निकृष्ठ दर्जाची ती कामे होतात. नवनवीन तरुण ठेकेदार आपापल्यापरीने कामे मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र , कोणतेही लोकप्रतिनीधी नसताना निलेश राणेंचे कार्यकर्ते ठेकेदारांना धमकावून निविदा मॅनेज करण्याचं काम करत आहेत.त्यामुळे आगामी काळात या विधानसभा निवडणूकीत राणेंच्या मुलाकडून लोकांना अशा पध्दतीने त्रास देवून ठेकेदारांकडून पैसे गोळा केले जातात. व तेच पैसे निवडणूकांमध्ये वापरले जातात.
हेही वाचा-“तोंडात सोन्याचा चमचा असणाऱ्यांना काय कळणार गरिबी ?”;खासदार श्रीकांत शिंदेंची विरोधकांवर टीका
नारायण राणेंची दोन्ही मुले सोज्वळ दाखवून विकासाला ध्यास दाखवत आहेत.एक मुलगा माझ्या बापाचा पराभव झाला त्याचा वचपा काढायचा आहे हे मतदारांना सांगत आहे मात्र, त्रास देणा-या या राणेंच्या मुलाला रोखलं पाहिजे. राणेंची घराणेशाही संपवण्यासाठी तीन्ही विधानसभेत मशाल चिन्हावरील उमेदवारांना मतदान केलं पाहिजे. असं आवाहन परशुराम उपरकर यांनी केले. दरम्यान या सगळ्या आरोप प्रत्यारोपांवर नितेश राणे यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र उपरकरांनी केलेल्या आरोपांवर आणि सदर पुराव्यांमध्ये कितपत तथ्य आहे? हे कोडं अजूनतरी अनुत्तरीतच आहे. या सगळ्यामुळे भाजप जिल्ह्यातील जनतेचा रोष ओढावून घेत नाही ना ? याचा महायुतीला मिळणाऱ्या मतांवर कितपत परिणाम होणार, कणकवलीकरांचा कोणत्या सरकारला कौण मिळणार हे पाहणं औस्तुक्य़ाचं ठरणार आहे.