"तोंडात सोन्याचा चमचा घेऊन येणाऱ्यांना काय कळणार पंधराशे रुपयांची किंमत";खासदार श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांना सुनावले
सध्या राज्यात निवडणूकीचे वारे वाहत आहेत. ठिकठिकाणी सगळ्याच पक्षांची प्रचारसभेसाठी जय्यत तयारी सुरु केली आहे.याचपार्श्वभीवर कल्याण पश्चिम मतदार संघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या प्रचारादरम्यान शक्तीप्रदर्शन करण्यात आलं होतं. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते. या प्रचारादरम्यान श्रीकांत शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कडव्या शब्दांत टीकास्त्र सोडलं आहे.
प्रचारादरम्यान विरोधकांवर टीका करताना श्रीकांत शिंदे म्हणाले की, “स्वत:च्या घरातून बाहेर निघाले नाही. दुसऱ्याचे घर पंधराशे रुपयात कसे चालते त्यांना कळणार नाही. ताेंडात सोन्याचा चमचा घेऊन येणाऱ्यांना कळणार नाही, गरीबी काय असते? गरीब लोकांचे घर कसे चालते ? आज त्यांना एक आधार देण्याचे काम लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून आमच्या सरकारने केले. अशा सावत्र भावांपासून सावध राहा. फसवगेगिरी करताहेत त्यांच्या पासून सावध राहा. महायुतीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन खासदार शिंदे यांनी करीत महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोला लगावला आहे.
हेही वाचा-या सर्वांना पाडून टाका…; मनोज जरांगे पाटलांचे नेमके मराठा समाजाला सांगणे तरी काय?
कल्याण पश्चिम मतदार संघातून उमेदवार भोईर यांना शिंदेगटाने उमेदवारी दिली आहे. भोईर यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. भोईर यांच्या प्रचारासाठी दुर्गाडी चौकातून या रोड शोला सुरुवात झाली खासदार शिंदे यांनी रोड शोचं आयोजन केलं होतं.. या सगळ्याला नागरीकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी नागरीकांनी खासदार शिंदे आणि उमेदवार भोईर यांचे जंगी स्वागत केले. याच दरम्यान खासदार शिंदे यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना लाडकी बहिण योजनेवरुन महाविकास आघाडी नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला.
हेही वाचा-“उद्धव ठाकरे यांनी केवळ मुख्यमंत्री होण्यासाठी…. “; रावसाहेब दानवेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
यावेळी खासदार शिंदे यांनी सांगितले की, “हा किती विरोधाभास आहे. ज्यांनी अगोदर सांगितले आम्ही सरकारमध्ये आल्यावर मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना बंद करु. सुनिल केदार हे न्यायालयात गेले. त्यांनी लाडकी बहिण योजना बंद करा अशी मागणी केली. आत्ता बघा घाबरून त्यांना पराभव समोर दिसू लागला आहे. मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिण आपला जो हाशर करणार आहे. त्यांना परिमाण समोर दिसू लागला आहे”. लाडक्या बहिणी या महायुतीसोबत आहे.
पुढे ते असंही म्हणाले की, महायुतीचा प्रत्येक उमेदवार निवडून येणार आहे. एकीकडे योजना बंद करु तर दुसरीकडे लोकांना खोटे सांगायचे आम्ही तीन हजार देऊ. लोकांनी हिमाचल, कर्नाटक, तेलंगणाचे उदाहरण घेतले पाहिजे. जिथे खोटी आश्वासन दिली गेली. अमूक एक रक्कम देऊ. सत्तेत आल्यावर सर्व आश्वासनं विसरले. सांगितलं प्रिटींग मिस्टेक आहे. आमच्याकडे कुठलीच प्रिटिंग मिस्टीक होत नाही. आम्ही जी कमिटमेंट करतो. ती पूर्ण करतो. त्यामुळे त्यांच्या पासून सावध राहा. असं श्रीकांत शिंदे म्हणाले.