जनता आणि पक्ष नेतृत्वाचा विश्वास नक्कीच सार्थकी लावू; विश्वनाथ भोईर यांची प्रतिक्रिया
कल्याण :- विधानसभा निवडणुक जागावाटपासाठी सर्वच पक्षांकडून उमेदवार यादी जाहीर करण्यात येत आहे. अशातच आता निवडणुकीसाठी कल्याणमध्ये शिंदे गटाने विश्वनाथ भोईर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर भोईर आणि शिंदे गटाचे इतर कार्यकर्ते यांनी दुर्गाडीयेथील भवानी आईचं दर्शन घेतलं आहे.
सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहाताना दिसत आहे. सर्वंच पक्ष या रिंगणात उतरले असून काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. कल्याणमध्येसलग दुसऱ्यांदा उमेदवारी देऊन माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. अशा भावना विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केल्या आहेत. इथली जनता आणि पक्ष नेतृत्वाने दाखवलेला विश्वास आपण नक्कीच सार्थकी लावू ,अशा शब्दांत शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार विश्वनाथ भोईर यांनी आभार मानले आहेत. उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल विश्वनाथ भोईर यांनी कल्याणचे ग्रामदैवत असलेल्या किल्ले दुर्गाडी येथील दुर्गादेवीचे दर्शन घेतले आहे.
हेही वाचा- माहीम विधानसभा मतदारसंघात येणार रंगत; अमित ठाकरेंविरोधात भाजप देणार नाही उमेदवार? पण…
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी अर्ज भरण्यात आला. गेल्या 5 वर्षांमध्ये आपल्याकडून झालेल्या कामाची पोचपावती म्हणून पक्षाने पुन्हा एकदा उमेदवारी देऊन आपल्यावर विश्वास दाखवला, असं भोईर यांनी यावेळी सांगितले. गेल्या 2019 च्या निवडणुकीत ज्यावेळी एबी फॉर्म मिळाला होता. तेव्हा आपण किल्ले दुर्गाडी नवरात्रौत्सव समितीचे अध्यक्ष होतो. देवीचा आशिर्वाद आपल्या पाठीशी असल्याने ही आठवण मनामध्ये ठेवून आज पुन्हा एकदा देवीचे दर्शन घेण्यासाठी आलो असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. कल्याणकर जनतेने दाखवलेला विश्वास आणि सर्वांचे सकारात्मक सहकार्य उभे राहिल्यामुळे पक्षाने हा निर्णय घेतला असून आपण कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाहीही विश्वनाथ भोईर यांनी दिली.
यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह शिवसेनेचे विधानसभा संघटक प्रभूनाथ भोईर, माजी नगरसेवक जयवंत भोईर, दुर्योधन पाटील, विद्याधर भोईर, गोरख जाधव, युवासेनेचे सुचेत डामरे, प्रतिक पेणकर वैभव भोईर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. उद्या 29 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता आपण आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहितीही भोईर यांनी यावेळी दिली. तत्पूर्वी खडकपाडा येथून ते मुंबई विद्यापीठ उपकेंद्रापर्यंत मोठी मिरवणूक काढण्यात येणार असून त्याद्वारे आपला जीव अर्ज भरण्यासाठी जाणार असल्याचे ते म्हणाले आहेत. एकीकडे महायुती आणि महाविकास आघीडीत उमेदवारी न मिळालेले कार्यकर्ते नाराज आहेत तर दुसरीकडे पक्ष स्वत:हून काही आमदारांना उमेदवारी जाहीर करत आहेत. त्यामुळे राज्यात विधानसभेच्या यंदाच्या निवडणुकीत चुरशीची लढत असल्याचं पाहायला मिळत आहे.