Who is Next PM: बिहार निवडणुकीदरम्यान PM मोदी निवृत्त होणार? 'या' नेत्याच्या विधानाने एकच खळबळ
बिहार विधानसभेची निवडणूक जाहीर
दोन टप्प्यात होणार निवडणूक
१४ नोव्हेंबरला जाहीर होणार बिहारचा निकाल
PM Narendra Modi: बिहार विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. बिहारची निवडणूक दोन टप्प्यात होणार आहे. १४ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. बिहारमध्ये सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. एनडीए विरुद्ध अन्य विरोधी पक्ष अशी लढत बिहारमध्ये होणार आहे. दरम्यान बिहार निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असताना पंतप्रधान मोदी निवृत्त होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामागे कारण ठरले आहे ते म्हणजे एका नेत्याचे विधान. काँग्रेसचा हा नेता नेमका काय म्हणाला आहे, ते जाणून घेऊयात.
आज बिहार काँग्रेसची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ‘२० वर्ष विनाशाची’ चार्जशीट प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये नितीश कुमार यांच्या २० वर्षांचा कार्यकाळ मांडण्यात आला. यामध्ये एनडीए सरकारवर आरोप करण्यात आले. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी पत्रकार परिषद घेतली. भूपेश बघेल म्हणाले, ‘भाजप ७५ वर्षांवरील लोकांना निवृत्त करते. मोदी यांनी अडवाणी आणि जोशी यांना निवृत्त केले. आता मोदी स्वतः ७५ वर्षांचे झाले आहेत.” भूपेश बघेल यांच्या विधानामुळे पंतप्रधान मोदी यांच्या निवृत्तीचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
भाजपची भूमिका काय?
दरम्यान ७५ वर्षे पूर्ण झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी निवृत्त होणार का? यावर भाजपच्या नेत्यांनी आपले मत स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला हा कार्यकाळ पूर्ण करतील आणि २०२९ मध्ये देखील पंतप्रधान होतील असे भाजप नेत्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे समजा पंतप्रधान मोदी यांनी निवृत्तीचा निर्णय घेतलाच तर भाजपकडून पुढील पंतप्रधान कोण असणार याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
नितीश कुमारांचा झाला गेम
बिहारमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. बिहारमध्ये दोन टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. 14 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. यंदा बिहारमध्ये एनडीए विरुद्ध अन्य विरोधी पक्ष अशी लढाई होणार आहे. मात्र विधानसभा निवडणूक होण्याआधीच नितीश कुमार यांना मोठा धक्का बसला आहे. अनेक नेत्यांनी नितीश कुमारांची साथ सोडली आहे.
Bihar Politics: नितीश कुमारांचा झाला गेम; निवडणुकीआधीच ‘या’ नेत्यांचा RJD मध्ये प्रवेश
जेडीयू म्हणजेच जनता दल युनायटेड हा पक्ष नितीश कुमार यांचा आहे. मात्र विधानसभा निवडणुकीआधी नितीश कुमार यांना धक्का बसला आहे. जेडीयू पक्षाचे माजी खासदार, आमदार यांनी तेजस्वी यादव यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. तेजस्वी यादव यांनी विधानसभा निवडणुकीआधीच नितीश कुमार यांना धक्का दिला आहे.