Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli Political News: कोण होणार सांगली जिल्हा परिषदेचा ‘ कलेक्टर’; आज सत्तेचा फैसला

खानापूर-आटपाडी मतदारसंघातील आ. सुहास बाबर व भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांच्यातील पूर्वीचे टोकाचे मतभेद बाजूला ठेवत नव्या समीकरणांची चर्चा रंगली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 18, 2026 | 10:11 AM
Sangli ZP Election 2026 Today, Sangli Zilla Parishad President Election,

Sangli ZP Election 2026 Today, Sangli Zilla Parishad President Election,

Follow Us
Close
Follow Us:
  • सांगली जिल्हा परिषदेतील सत्तेचा तिढा अखेर आज (दि. १८) सुटणार
  • शिवसेना शिंदे गटाचे २ सदस्य आघाडीच्या संपर्कात असल्याची चर्चा
  • महाविकास आघाडीने अजित पवार गटासोबत समझोता करत सत्ता स्थापनेची तयारी केली
Sangli Political News: सांगली जिल्हा परिषदेतील सत्तेचा तिढा अखेर आज (दि. १८) सुटणार असून अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती पर्दाच्या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचे कारभारी कोण ठरणार, याचा फैसला आजच्या मतदानातून होणार आहे. ६१ सदस्यांच्या जिल्हा परिषदेत बहुमतासाठी ३१ आकड्याची गरज आहे. सध्याच्या स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट १८, काँग्रेस ११ आणि शिवसेना उबाठा गट १ असे महाविकास आघाडीचे ३० सदस्य आहेत. दुसरीकडे भाजप १६, शिवसेना शिंदे गट ७, राष्ट्रवादी अजित पवार गट ६, जनसुराज्य १ आणि रयत क्रांती १ असे समीकरण असून, कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही.

सदस्यांच्या सहलीमुळे सत्तासंघर्ष अधिकच चुरशीचा बनला

शिवसेना शिंदे गटाचे २ सदस्य आघाडीच्या संपर्कात असल्याची चर्चा असून, ते पक्षाच्या भूमिकेला पाठिंबा देणार की बंडखोरी करणार, यावर सत्तेचे गणित अवलंबून आहे. उर्वरित काही सदस्य तटस्थ राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, पालकमंत्री वंद्रकांतदादा पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे काही सदस्य आमच्या संपर्कात असल्याचा दावा करत ‘अध्यक्ष आमचाच होईल,’ असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे सतासंघर्ष अधिकच दुरशीचा बनला आहे.

KDMC महासभेत राड्याचा इतिहास राहिला आहे तर पोलीस बंदोबस्ताला विरोध कशाला?

युती एकत्र असली तरी काही तालुक्यांमध्ये अंतर्गत मतभेद कायम

महाविकास आघाडीने अजित पवार गटासोबत समझोता करत सत्ता स्थापनेची तयारी केली आहे. पहिल्या टप्प्यात अध्यक्षपद शरद पवार गटाला, तर सव्वा वर्षानंतर अजित पवार गटाला देण्याचा फॉर्म्युला चर्चेत आहे. आघाडीने आपले सदस्य सुरक्षित ठेवण्यासाठी सहलीवर पाठवून ‘सेफ झोन’ तयार केला आहे. दुसरीकडे भाजपनेही सावध पवित्रा घेत आपल्या १६ सदस्यांसह जनसुराज्य व रयत क्रांतीचे प्रत्येकी १ सदस्य असे एकूण १८ जणांना कोल्हापुरात एकत्रित ठेवले आहे. शिवसेना शिंदे गट, भाजप व मित्रपक्ष अशी युती एकत्र असली तरी अंतर्गत मतभेद कायम आहेत.

 

सध्याचे राजकीय चित्र

महाविकास आधाडी (श.प.गट काँग्रेस + उबाठा) = ३०
अजित पवार गट (६) = निर्णायक भूमिकेत
भाजप + मित्रपक्ष = १८
शिवसेना (शिंदे गट) = (७)

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) १८
भारतीय जनता पक्ष १६
काँग्रेस ११
शिवसेना (शिंदे गट) ७
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ६

US Iran War : ‘अमेरिकेच्या ग्रीन झोन’मध्ये घुसला इराण; बगदादमधील दूतावासावर भीषण ड्रोन हल्ल्याने रडार सिस्टमही निकामी, VIDEO

शिवसेना (उबाठा गट) १
जनसुराज्य पक्ष १
स्थत क्रांती पक्ष १
बहुमताचा आकडा ३१

मतभेद बाजूला ठेवत नव्या समीकरणांची चर्चा सुरू

याशिवाय, खानापूर-आटपाडी मतदारसंघातील आ. सुहास बाबर व भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांच्यातील पूर्वीचे टोकाचे मतभेद बाजूला ठेवत नव्या समीकरणांची चर्चा रंगली आहे. त्यांच्या समर्थकांची कोल्हापुरातील एकत्रित उपस्थितीही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. आजच्या मतदानात क्रॉस कोटिंग, तटस्थ भूमिका आणि ‘लास्ट मिनिट’ राजकीय खेळी यावरच सत्ता कोणाच्या बाजूला झुकणार हे ठरणार आहे. त्यामुळे सांगली जिल्हा परिषदेत सतेचा अंतिम अंक आज रंगणार असून, ‘मिनी मंत्रालयाचे कारभारी कोण होणार याचा थरार शिगेला पोहोचला आहे, सता स्थापनेसाठी अजित पवार गट किया शिवसेनेतील संभाव्य फुट पडणार की तटस्थ राहणार या भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद सतासमीकरण अजूनही अत्यंत चुरशीचे आणि अनिश्चित आहे.

 

 

 

Web Title: Who will become the collector of the sangli zilla parishad the verdict on power is today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 10:11 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.